सनातनचा युवा साधक यदुनंदन अजिंक्य वरेकर गुणवत्ता शोध परीक्षेत राज्यात द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण !

कु. यदुनंदन वरेकर

जयसिंगपूर (जिल्हा कोल्हापूर) – ‘सांगली शिक्षण संस्था बाह्य शिक्षण विभाग’ आयोजित गुणवत्ता शोध परीक्षेत सनातनचा साधका कु. यदुनंदन वरेकर हा ३०० पैकी २८६ गुण मिळवून राज्यात द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला. तो सनातनचे साधक आधुनिक वैद्य अजिंक्य वरेकर यांचा मुलगा असून सनातनचे साधक श्री. अण्णासाहेब वरेकर यांचा नातू आहे. तो येथील मालू हायस्कूलचा विद्यार्थी आहे. हे यश सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, तसेच शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन यांमुळेच मिळाल्याचे त्याने कृतज्ञतापूर्वक सांगितले.