‘जैश-ए-महंमद’कडून भरती मोहीम !

चंडीगड (पंजाब) – पाकिस्तानी आतंकवादी संघटना ‘जैश-ए-महंमद’ आणि ‘लष्कर-ए-तोयबा’ या आतंकवादी संघटना महिला आत्मघातकी पथकांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती करत आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये आक्रमण करण्यासाठी ही महिला आत्मघातकी पथके सिद्ध करण्यात येत आहेत. या महिला आत्मघातकी पथकांच्या एका महत्त्वाच्या बैठकीविषयी गुप्तचर माहिती आणि छायाचित्रे प्राप्त झाली आहेत. ही आत्मघातकी पथके सिद्ध करण्याचे दायित्व ‘जमात-उल्-मोमिनात’ या ‘जैश-ए-महंमद’च्या महिला शाखेकडे सोपवण्यात आले आहे. या आतंकवाद्यांनी अमरनाथ यात्रेच्या महत्त्वाच्या ठिकाणांची टेहळणी केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी सीमा सुरक्षादल सतर्क झाले असून नुकतेच श्रीनगरमध्ये एका महिलेसह ४ आतंकवाद्यांना अटक करण्यात आली.
गुप्तचर संस्थांशी संबंधित अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ एप्रिलला पाकिस्तानात आयोजित करण्यात आलेल्या महिला आत्मघातकी पथकांची भरती आणि प्रशिक्षण शिबिरे यांविषयीचे सविस्तर तपशील केंद्रीय सुरक्षादलांकडे यापूर्वीच सुपुर्द करण्यात आले आहे. पाकिस्तानच्या सैन्यदलाचेही संपूर्ण लक्ष सध्या महिला आत्मघातकी पथके सिद्ध करण्यावर केंद्रित झाल्याची माहिती या सूत्रांनी दिली.
सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बुरुजाच्या पायथ्याचे काही दगड कोसळले !
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’