
कॉर्पाेरेट जिहाद’चा विषय ताजा असतांनाच आता ‘टाटा’ आस्थापनाचाच ‘टाटा एथिकल फंड’चा विषय समोर आला आहे. एका बाजूला हिंदूंची गळचेपी केली जात आहे, तर दुसर्या बाजूला अल्पसंख्यांकांच्या दाढ्या कॉर्पाेरेट पद्धतीने कुरवाळल्या जात आहेत. सामाजिक ‘स्पेक्ट्रम’च्या एका बाजूला ‘लेन्सकार्ट’सारखी आस्थापने आहेत, जी हिंदूंना त्यांच्या धर्मपरंपरांचा अवलंब करण्यापासून रोखत आहेत. एकप्रकारे त्यांच्या परंपरांना ‘बुरसटलेली’ आणि ‘कालबाह्य’ ठरवतांना मुसलमान महिलांना हिजाब घालण्यासाठी मात्र पायघड्या घालत आहेत. या सामाजिक परिदृश्याच्या दुसर्या बाजूला ‘टाटा’च्या शरीयत कायद्याला पूरक ‘टाटा एथिकल फंड’ नावाची ‘म्युच्युअल फंड’ गुंतवणूक योजना गेल्या ३० वर्षांपासून कार्यरत आहे. या योजनेतून मुसलमानांना त्यांचा पैसा ‘हराम’ने (इस्लामनुसार निषिद्ध मार्गाने) कमवला गेला असेल, तरी त्याला शुद्ध करण्यासाठी, म्हणजे हलाल प्रमाणित करण्यासाठी ही योजना आहे. या अंतर्गत जमा होणारा निधी इस्लामनुसार ‘हराम’ असलेल्या ‘व्याजदरावर आधारित कर्ज, मद्य, तंबाखू, जुगार’, अशा गुंतवणुकीच्या साधनांमध्ये गुंतवला जात नाही. ही योजना मुसलमानांना भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशात त्यांच्या धर्मानुसार गुंतवणूक करण्यासाठी कटीबद्ध आहे. येथे धर्मस्वातंत्र्याला विरोध नाही; परंतु कट्टर इस्लामी विचारधारेला ‘मेनस्ट्रीम’ (मुख्य प्रवाह) करण्याचा टाटांचा हा प्रयत्न धिक्कारास्पद आहे. थोडक्यात इस्लामी कट्टरतेला लक्षावधी हिंदु समभागधारकांच्या बळावर उभारलेल्या टाटा आस्थापनाकडून अनुमोदन दिल्याचा हा प्रकार होय.
अर्थगणित !
शरीयतला अनुसरून गुंतवणूक आणि व्यवसाय हा जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात होत आहे. ‘स्टँडर्ड चार्टर्ड बँके’ने घोषित केलेल्या आकडेवारीनुसार ‘जगभरात साधारण ५ ट्रिलियन डॉलर, म्हणजे तब्बल ४७१ लाख कोटी रुपयांचा हा इस्लामाधारित व्यवसाय आहे. हा आकडा भारताच्या एकूण अर्थव्यवस्थेपेक्षाही अधिक आहे. हा आकडा वर्ष २०२८ पर्यंत साडेसात ट्रिलियन डॉलरच्या घरात जाईल’, असेही बँकेचे म्हणणे आहे. यातून याची गतीमानता लक्षात येते. प्रामुख्याने आखाती देशांत असलेला हा व्यवसाय भारतातही वाढत आहे. यात ‘टाटा एथिकल फंड’ हे सर्वांत मोठे आस्थापन असून ‘टॉरस म्युच्युअल फंड’, ‘निप्पॉन इंडिया’, ‘क्वांटम एथिकल फंड’ आदी आस्थापनेही शरीयतचे पालन करून गुंतवणूक करतात. एकट्या ‘टाटा एथिकल फंड’चा निधीच साधारण साडेतीन सहस्र कोटी रुपयांच्या घरात आहे.
घटनाबाह्य नाही, तर विरोध का ?
एखादा तर्क लावेल की, जर भारतात ‘टाटा एथिकल फंड’सारख्या योजना ३ दशके कार्यान्वित आहेत, तर त्या कायद्याला पूरक असतीलच. यात तथ्य आहे. राज्यघटनेतील कलम १४ नुसार कायद्यासमोर सर्व धर्म समान असल्याने शरीयत आधारित गुंतवणूक योजना ही घटनाविरोधी नाही. याचे कारण टाटा अथवा अन्य खासगी आस्थापनांनी त्यास केवळ मुसलमानांसाठीच राबवण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. दुसरीकडे सरकार स्वत: अशा प्रकारची योजना आणू शकत नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळेच आजपासून साधारण १० वर्षांपूर्वी रिझर्व्ह बँकेने इस्लामला पूरक अशा प्रकारची ‘इस्लामिक बँकिंग’ योजना आणणार असल्याचे सुतोवाच केले होते. तेव्हा त्यास हिंदूंनी तीव्र विरोध केल्यामुळे सरकार आणि बँक यांनी ती गुंडाळून ठेवून दिली. राज्यघटनेतील ‘व्यापार आणि व्यवसाय यांचे स्वातंत्र्य’ देणार्या कलम १९ नुसारही टाटाची ही गुंतवणूक योजना घटनेत बसते. ‘धर्मस्वातंत्र्य’ प्रदान करणारे कलम २५ ही या विषयाला हिरवा कंदील देते. त्यामुळे या योजनेला घटनाबाह्य म्हणता येणार नाही. खरेतर हा विषय घटनेला पूरक अथवा घटनाबाह्य असा नाही, हे भारतियांनी लक्षात घेतले पाहिजे. तथापि यातून निर्माण होणारा पैसा योग्य कामांमध्येच जात असेल, हे कशावरून ? यातून निर्माण होणारा लाभ संबंधित मुसलमान गुंतवणूकदार समाजविघातक कारवायांसाठी देत नसतील, हे कशावरून ? याचे उत्तर टाटासारखी आस्थापने देणार का ? ‘केन रिसर्च’ या आस्थापनानुसार भारतात १० टक्क्यांहूनही अल्प मुसलमान अशा प्रकारच्या योजनांमध्ये पैसा गुंतवतात. यातून हेही स्पष्ट होते की, शरीयतला अनुसरून गुंतवणूक करणारे कट्टर (फेथफुल) मुसलमान नागरिक असले पाहिजेत. याचा एक पुरावा असा. नोव्हेंबर २०२३ मध्ये ‘हलाल कौन्सिल ऑफ इंडिया’, ‘जमियत उलेमा-ए-हिंद’, ‘हलाल ट्रस्ट’, ‘हलाल इंडिया’, ‘जमियत उलेमा महाराष्ट्र’ यांसारख्या संघटना हलाल प्रमाणित प्रमाणपत्र देऊन त्यातून मिळवत असलेला कोट्यवधींचा निधी आतंकवादी कारवायांसाठी पुरवत असल्याचे आरोप झाले होते. त्यांच्या विरोधात गुन्हे नोंदवून काही अटकसत्रेही झाली. यामुळेच शरीयत प्रमाणित योजना राबवून एकप्रकारे टाटासारखी आस्थापने देशाला धोक्यात टाकत आहेत. हा दावा ना अतार्किक आहे आणि ना अतिशयोक्ती ! त्यामुळे राष्ट्रप्रेमी हिंदूंनी इस्लामी धोरणे राबवत असलेल्या राष्ट्रद्रोही ‘टाटा’च्या या योजनांचा प्राणपणाने विरोध केला पाहिजे.

हिंदूंनो, अंतर्मुख व्हा !
याकडे आता एका अन्य भिंगातून पहायलाही हिंदूंनी शिकले पाहिजे. मुसलमान कट्टर असल्यामुळेच राजकीय जगच नाही, तर आर्थिक जगतही त्यांच्यासमोर झुकते – मग ते त्यांच्या परंपरांचा आदर राखून अथवा त्यांच्या धर्माला पूरक असलेल्या योजना राबवून. हिंदूंना मात्र कुत्रेही विचारत नाही, अशी हिंदूंची लाजिरवाणी स्थिती आहे. कौटिल्यचे अर्थशास्त्र किती हिंदूंनी वाचले आहे ? त्याचा अंगीकार किती हिंदू स्वत:चे अर्थगणित ठरवतांना वापरतात ? महाभारतातील ‘अनुशासन पर्वा’त भीष्माचार्यांनी अर्थार्जनाविषयी युधिष्ठिराला केलेला अमूल्य उपदेश किती हिंदूंना ठाऊक आहे ?
याचे उत्तर अभावानेच हो असणार. चीनचा महान तत्त्वज्ञ कन्फ्यूशिअस याच्या वाक्याचा उल्लेख होणे येथे आवश्यक आहे. त्याने म्हटले होते, ‘स्वत:चा आदर करा, मगच अन्य लोक तुमचा आदर करतील.’ हिंदूंना स्वधर्माचा अभिमान नाही; कारण त्यांना त्याचे ज्ञान नाही. त्यांना कुठेच त्याचे िशक्षण दिले जात नाही आणि कुणी शिक्षण देऊ केले, तरी ते नाक मुरडतात. ‘टी.सी.एस्.’ असो कि ‘लेन्सकार्ट’ कि ‘टाटा म्युच्युअल फंड’, अशा घटना सातत्याने समोर येत असल्याने आतातरी हिंदूंनी अंतर्मुख होऊन स्वधर्माचे शिक्षण घेतले पाहिजे. इंग्रजीत एक म्हण आहे, ‘वेअरिंग धर्मा ऑन युवर स्लीव्ह’. थोडक्यात ‘उघडपणे धर्माचरण करा, धर्माला स्वत:च्या जीवनाचा अविभाज्य घटक बनवा आणि तो जगाला स्वीकारायला लावा !’ तर आणि तरच हिंदूंकडे पहाण्याची जगाची दृष्टी पालटेल अन् हिंदूंसमोर राजकारणीच नाहीत, तर प्रथितयश आस्थापनेही झुकतील !
(म्हणे) ‘विप्रो’मध्ये महिला कर्मचार्यांचे कल्याण, प्रतिष्ठा आणि सन्मान यांना सर्वोच्च महत्त्व दिले जाते !’ – Wipro’s Explanation
श्रीनगरमध्ये अमली पदार्थ तस्कर शेख तसदुकची सरकारी भूमीवरील अवैध ३ मजली इमारत जमीनदोस्त !
संपादकीय : मंदिरे अध्यात्मासाठीच !
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !
Corporate Jihad SUD Life Insurance : विमा आस्थापनेतील मुसलमान व्यवस्थापकाकडून हिंदु तरुणीचा छळ !
बेंगळुरूमध्ये कचरा वेचणार्या सैबुलने विद्यार्थिनीवर केला बलात्काराचा प्रयत्न !