हिंदुत्वनिष्ठ गौतम खट्टर यांच्यावर ‘द्वेषयुक्त भाषण’ केल्याकारणाने गोव्यात गुन्हा नोंद झाल्याचे प्रकरण
गौतम खट्टर यांनी जे वक्तव्य केले, त्यावरून वादंग माजलेला आहे. असे जेव्हा होते, तेव्हा एक चुकीची गोष्ट आपोआप घडत जाते. ती म्हणजे ‘हिंदुत्वनिष्ठ आहात, तर खट्टरचे समर्थन करा आणि नसाल किंवा ख्रिस्ती असाल, तर त्याचा विरोध करा’, ही विभागणी होते. खट्टर जे काही बोलले, त्यातील किती योग्य आणि किती चूक याचे विश्लेषण करायच्या भानगडीत कुणीच पडत नाही. त्यामुळे निर्माण होते ती केवळ आणि केवळ झुंडशाही !

१. खट्टर यांचे समर्थन करायला नकोच !
आक्रमकता आणि विचार मांडणे यांत एक सूक्ष्म रेषा असते. ती ओलांडली की, वक्ता अभद्रतेच्या दिशेने वहावत जातो. ते मुळीच समर्थनीय असत नाही. अनेकदा जो मूळ मुद्दा (खरोखरच वैध आणि सत्य) असतो, त्याचीच हानी होते. भावनेला न दुखावताही सत्य मांडता येते. ते सत्य इतके प्रखर व नाकारता न येण्यासारखे असते, तिथे भावनांचे काहीही अस्तित्व उरत नाही. उलट भावना असण्यावरच शंका उपस्थित होते.
‘फ्रान्सिस झेविअर ‘गोंयचो सायब’ किंवा संत नाही’, हे सांगण्यासाठी त्याच्या पार्थिवाच्या अवशेषांची अवहलेना करण्याची काहीच आवश्यकता नव्हती. याची जाणीव झाल्यानंतर आयोजकांपैकी किंवा आमदार, मंत्री यांपैकी कुणीतरी चिठ्ठी पाठवून भाषण थांबवायला सांगितले. त्याचा उल्लेख खट्टर यांनी केला, तेव्हा प्रेक्षकांतून बोलत रहाण्याचा एक आवाज आला की, जो अत्यंत चुकीचा होता. यासाठी खट्टर आणि तो आवाज देणारा या दोघांचीही कठोर शब्दांत निंदाच योग्य आहे. त्याचे समर्थन होऊच शकत नाही. त्यासाठी जी शिक्षा खट्टर यांना मिळायला हवी, ती बिनदिक्कत दिलीच पाहिजे. कुठल्याच हिंदूने याविषयी खट्टरचे समर्थन करू नये.
२. फ्रान्सिस झेविअरने हिंदूंवर लादलेले भयंकर ‘इन्क्विझिशन’ (धर्मच्छळ)

फ्रान्सिस झेविअरच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी हिंदूंनी जाणे सर्वथैव चुकीचे आहे. हा मुद्दा जो खट्टर यांनी मांडला तो योग्यच आहे. फ्रान्सिस झेविअर ना संत आहे, ना ‘गोंयचो सायब’ आहे. फ्रान्सिस झेविअरने १६ मे १५४५ या दिवशी पोर्तुगालचा राजा तिसरा जॉन याला पत्र लिहून गोव्यासाठी ‘इन्क्विझिशन’ची (धर्मच्छळाची) मागणी केली आणि त्याचाच परिपाक म्हणून ते पुढील ५ वर्षांत लादलेही गेले.
‘मुलांना त्यांच्या पालकांसमोर फटके मारले जात आणि हळूहळू त्यांचे अवयव कापले जात; पालकांनी हे सर्व पहावे, याची खात्री करण्यासाठी त्यांच्या पापण्या कापून टाकल्या जात. शरिराचे हात-पाय अत्यंत काळजीपूर्वक कापले जात, जेणेकरून एखादी व्यक्ती केवळ धड आणि डोके शिल्लक असतांनाही शुद्धीवर रहावी. पत्नीसमोर पुरुषांची जननेंद्रिये काढून जाळली जात, महिलांचे स्तन कापले जात आणि पतींना पहायला लावून तलवारींनी त्यांच्या गुप्तांगावर वार केले जात… आणि हे सर्व २०० वर्षे चालले.’ (संदर्भ : पॉल विल्यम्स रॉबर्टस, ‘द एम्पायर ऑफ द सोल : सम जर्नीज इन इंडिया’, न्यूयॉर्क, १९९७)
३. ख्रिश्चॅनिटी पसरली ती क्रौर्याच्या जोरावर !
ख्रिस्ती करण्यासाठी आणि ख्रिस्ती झाल्यानंतर ख्रिस्ती रहाण्यासाठी जो अमानुष अन् नृशंस नरसंहार झाला, त्याचे उत्तरदायित्व आजही चर्च घेत नाही. झाडून सगळे विचारवंत त्याचे बिल पोर्तुगीज सत्तेवर फाडतात. शांततेतून आणि सेवेतून ‘शुभवर्तमाना’चा अन् ख्रिश्चनिटीचा प्रसार झाला, हे सांगायला चर्च मोकळी रहाते. केवळ गोव्यातच नव्हे, तर जगभरात तसे अजिबात घडले नाही. ख्रिश्चनिटी पसरली ती क्रौर्याच्या जोरावर.
गोवा पोलिसांनी गौतम खट्टरच्या भावाला अटक करणे अतिशय भयंकर !

गोवा पोलिसांनी माधव खट्टर या युवकाला केलेल्या अन्याय्य अटकेचा मी तीव्र निषेध करतो. ‘जे सार्वजनिक भाषण गौतम खट्टर यांनी गोव्यात केले, ते माधवने लिहून दिले’, असा हास्यास्पद आरोप आता करण्यात आला आहे. गौतम खट्टर काय बोलले, यापेक्षा पोलिसांच्या दहशतीचे जे राज्य गोव्यात निर्माण केले जात आहे, त्यावर चर्चा होणे महत्त्वाचे आहे. दाऊदच्या कृत्यासाठी दाऊदच्या भावाला अटक होऊ शकत नाही; पण गौतम खट्टर सापडला नाही, तर मात्र त्याच्या निरपराध भावाला धरून आणतात, हे अतिशय भयंकर आहे. बाँबस्फोट घडवून ८०० ते १००० लोकांची हत्या करणार्याच्या भावाला आणि बहिणीला जे अधिकार आहेत, ते या देशातील हिंदूंना नाहीत, असा याचा अर्थ होतो. एका मृत ख्रिस्ती व्यक्तीची अप्रतिष्ठा करणे, हे ८०० ते १००० निष्पाप भारतियांची हत्या करण्यापेक्षा गंभीर गुन्हा या देशात ठरत असेल, तर देशाचे काही खरे नाही. आपल्याला जो पालट आता घडवायचा आहे, तो मतपेटीच्या माध्यमातून शक्यच नाही, हे आता पटायला लागले आहे.
– अधिवक्ता संजीव पुनाळेकर, राष्ट्रीय सचिव, हिंदु विधीज्ञ परिषद. (२३.४.२०२६)-
४. हिंदूंचे ख्रिस्तीकरण आणि देवतांच्या मूर्ती फोडल्यानंतर झेव्हिअरला होणारा द्वेषयुक्त आनंद !
राजा उन्नी केरळ वर्मा यांनी झेविअर यांना ‘वलिया पाद्रे’ ही पदवी देऊन त्यांचा गौरव केला होता. राजाने दिलेल्या देणगीतून (अनुमाने २००० पणाम – तत्कालीन चलन) झेविअरने कोल्लम आणि त्रावणकोर यांच्या किनारपट्टीवर अनुमाने ४० हून अधिक चर्च बांधली. यात कोम्बुथुराई येथील सेंट स्टीफन्स चर्चचाही समावेश होता. हिंदु राजांकडून साहाय्य आणि संरक्षण मिळाल्यानंतर झेव्हिअरने जोरात ख्रिस्तीकरण आरंभले. ते करतांना त्याला काय वाटत होते, याचे वर्णन तो स्वत: १५ जानेवारी १५४५ या दिवशी रोममधील त्याच्या सहकार्यांना लिहिलेल्या पत्रात करतो.
‘बाप्तिस्म्यानंतर नवीन ख्रिस्ती लोक आपापल्या घरी परततात आणि नंतर त्यांच्या पत्नी अन् कुटुंबासह परत येतात, जेणेकरून त्यांनाही बाप्तिस्म्यासाठी सिद्ध करता येईल. सर्वांचा बाप्तिस्मा झाल्यानंतर मी असा आदेश देतो की, सर्वत्र खोट्या देवांची मंदिरे पाडावीत आणि मूर्ती फोडून टाकाव्यात. जे लोक पूर्वी या मूर्तींची पूजा करत असत, त्यांच्याच हस्ते त्या पाडल्या जाण्याचे आणि नष्ट करण्याचे दृश्य पाहून मला जो आनंद होतो, त्याचे वर्णन मी शब्दांत करू शकत नाही.’
गोवा पोलीस गोवा सरकारचे आहे कि झेविअरचे अत्याचारी सैन्य ?

गोवा पोलीस गोवा सरकारचे आहे कि झेविअरचे अत्याचारी सैन्य ? त्यांनी हिंदु वक्ते गौतम खट्टर यांच्यावर खोटा खटला प्रविष्ट केला. त्याहूनही भयावह, म्हणजे ते घरी सापडले नाहीत; म्हणून त्यांचा १८ वर्षीय लहान भाऊ माधव खट्टर याला पोलीस पकडून घेऊन गेले. एखाद्या आतंकवाद्याप्रमाणे त्याच्या चेहर्यावर काळे कापड टाकून त्याला न्यायालयात उपस्थित केले. गोव्यात पुन्हा पोर्तुगिजांचे अत्याचारी शासन परत आले आहे का ? हे निंदनीय आहे. आपल्या समर्थकांवर होत असलेल्या अत्याचारांविषयी गोवा सरकार मौन का आहे ?
– डॉ. सुरेश चव्हाणके, मुख्य संपादक, ‘सुदर्शन टीव्ही’ वृत्तवाहिनी. (२३.४.२०२६)
मुलांना बाप्तिस्मा देऊन ख्रिस्ती करण्याविषयी त्याने वर्ष १५४३ मध्ये रोममधील ‘सोसायटी ऑफ जीझस’ला लिहिलेल्या पत्रात तो म्हणतो, ‘मला पूर्ण विश्वास आहे की, देवाच्या कृपेने ही मुले त्यांच्या वडिलांपेक्षा पुष्कळ सरस ठरतील. ती मुले ईश्वरी कायद्याविषयी तीव्र प्रेम आणि स्वतःचा पवित्र धर्म शिकण्यासाठी अन् इतरांना शिकवण्यासाठी कमालीची उत्सुकता दाखवतात. मूर्तीपूजेविषयीचा त्यांचा तिरस्कार विस्मयकारक आहे. ते या विषयावरून मूर्तीपूजकांशी वाद घालतात आणि जेव्हा त्यांचे स्वतःचे आई-वडील मूर्तीपूजा करतात, तेव्हा ती मुले त्यांना दोष देतात अन् लगेच मला येऊन सांगतात. जेव्हा कधी मला मूर्तीपूजेच्या कोणत्याही कृत्याविषयी समजते, तेव्हा मी या मुलांच्या मोठ्या टोळीसह त्या ठिकाणी जातो. ही मुले सैतानाचा (मूर्तीचा) इतका अपमान आणि विटंबना करतात, जितका सन्मान अन् पूजा अलीकडे त्यांचे पालक, नातेवाईक आणि ओळखीचे लोक यांनी केली नसेल. ही मुले मूर्तींकडे धावत जातात, त्या उलथवून टाकतात, खाली आदळतात, त्यांचे तुकडे करतात, त्यांच्यावर थुंकतात, त्यांना तुडवतात, लाथा मारतात आणि थोडक्यात सांगायचे, तर शक्य तितका अपमान करतात’.
(संदर्भ : जोसेफ विकी, ‘डॉक्युमेंटा इंडिका’, खंड ४, रोम, १९५६)
५. हिंदूंनी फ्रान्सिस झेविअरचे पार्थिव बघायला जाणे, हा हिंदूंच्या पूर्वजांचा घोर अपमान !
एक माणूस म्हणूनही फ्रान्सिस झेविअरची काय योग्यता होती, हे त्याने स्वत:च लिहिलेल्या पत्रांवरून समजते. संत आणि सायब होणे दूरच राहिले. फ्रान्सिस झेविअरला संत म्हणतात किंवा त्याच्या पार्थिव दर्शनासाठी ख्रिस्ती येतात, हा त्यांच्या पंथाचा आणि श्रद्धेचा भाग आहे; पण हिंदूंनी त्याच्या पार्थिवाचे दर्शन अन् आशीर्वाद घेण्यासाठी जाणे चुकीचेच आहे. त्याही पुढे जाऊन तो आपल्याच पूर्वजांचा आपण केलेला घोर अपमान आहे. इतके अन्याय आणि अत्याचार सहन करूनही जे ख्रिस्ती झाले नाहीत, त्यांच्या हिंदु धर्मावरील श्रद्धेचा अपमान आहे.
– श्री. प्रसन्न शिवराम बर्वे, पणजी, गोवा. (२२.४.२०२६)
(साभार : ‘प्रसन्नवदने ब्लॉग’वरून)
सांखळी येथील पुरातन किल्ल्याच्या नूतनीकरण प्रकल्पाचे लोकार्पण
मंगेशी येथे स्व. लता मंगेशकर आणि स्व. आशा भोसले यांचे स्मारक आणि संग्रहालय उभारणार ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !
सनातन धर्माला संपवणारे तुम्ही कोण ?
भारताला विनाशाकडे नेणारा ‘वोकिझम’ !