
प्रश्न :
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : ‘सनातनच्या ग्रंथांचा पुढील किती पिढ्यांना लाभ होईल ?’

उत्तर :
सुश्री मधुरा भोसले :
१. सनातनच्या ग्रंथांतील ज्ञान संत, सद्गुरु आणि अवतारी मोक्षगुरु यांनी पडताळले असल्यामुळे सनातनचे ग्रंथ चैतन्यमय झालेले असणे
‘सनातनचे ग्रंथ ‘अध्यात्म कसे जगायचे ?’, याविषयी सविस्तर मार्गदर्शन करणारे आहेत. या ग्रंथांत धर्मशास्त्र आणि अध्यात्मशास्त्र यांविषयीची सूत्रे सोप्या भाषेत मांडलेली आहेत. या ग्रंथांमध्ये विविध धर्मग्रंथांतील सूत्रांसह साधकांना येणार्या अनुभूती आणि सनातनच्या साधकांना मिळालेले सूक्ष्मातील ज्ञान अंतर्भूत आहे. या ग्रंथांतील व्याकरण शुद्ध असल्यामुळे ग्रंथांतील प्रत्येक अक्षरामध्ये अक्षरब्रह्माचे चैतन्य कार्यरत झालेले आहे. हे ग्रंथ मोक्षगुरु सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, तसेच सनातनचे ग्रंथगुरु पू. संदीप आळशी (सनातनचे ११ वे संत, वय ५१ वर्षे) यांनी संकलित केले आहेत आणि या ग्रंथांतील ज्ञानाची सत्यता सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले अन् उपायगुरु सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी पडताळली आहे.
२. सनातनचे ग्रंथ हे ‘कलियुगातील सूक्ष्म वेद’, या नावाने विख्यात होणार असणे

अशा प्रकारे सनातनचे ग्रंथ हे ‘सत्यं शिवं सुन्दरम् ।’ झाले आहेत. त्यामुळे ते कलियुगातील वेदस्वरूप असून त्यांना ‘सूक्ष्म वेद’, अशी आध्यात्मिक संज्ञा प्राप्त झाली आहे आणि ते याच नावाने पुढे विख्यात होतील. सनातनच्या ग्रंथांमध्ये पुष्कळ चैतन्य असल्यामुळे हे ग्रंथ कलियुगातील वेदच आहेत. त्यामुळे त्यांतील ज्ञान कलियुगाच्या अंतापर्यंत संपूर्ण मानवजातीला मार्गदर्शक ठरणार आहे.’
– सुश्री मधुरा भोसले (सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्त्या साधिका, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा दिनांक : ११.४.२०२६, वेळ : दुपारी ४ ते ४.१५, कालावधी : १५ मिनिटे)
हिंदु राष्ट्रात भक्तीभाव असलेल्या भक्तांकडेच मंदिरांचे दायित्व असेल !
‘स्मार्ट’ फसवणूक !
वारंवार होणारे मूत्रसंक्रमण (यूटीआय) आणि आयुर्वेद
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी न्यायालयीन संघर्ष
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
‘भिऊ नकोस माझ्या बाळा, मी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) तुझ्या पाठीशीच सदा ।