नाशिक येथील आंतरराष्ट्रीय व्यावसायिक आस्थापनेत झालेल्या धर्मांतराच्या प्रकरणावर हिंदूंच्या डोळ्यात अंजन घालणारा लेख
लँड (भूमी) जिहाद, लव्ह जिहाद, जिम (आधुनिक व्यायाम शाळा) जिहाद, कॉर्पोरेट (व्यावसायिक) जिहाद…ही सूची वाढतच आहे. या घटना आणि त्यांचे परिणाम, तसेच तरुणींचे शोषण सातत्याने समोर येत आहे. समाजमाध्यमांवरचे व्हिडिओज्, बातम्या, सखोल लेखन, चित्रपट, विविध सामाजिक संस्थांद्वारे जनजागृती…एवढेच काय; पण पोलिसांकडून मिळणारी माहिती आणि सतर्कतेची चेतावणी….चहुकडून या विषयावर लख्ख प्रकाश टाकला जात आहे. एकूणच त्यांची सतत पालटणारी ‘मोड्स ऑपरेंडी’ (कामाची पद्धत) आपल्याला वारंवार सावध करत आहे; पण तरीही समाजातील तरुणी मनाची कवाडे बंद का करून बसल्या आहेत ? ज्या निरपराध आहेत, त्यांचा इथे विषय नाही; परंतु ज्या हे सारे टाळू शकतात, त्यांना मात्र परखड प्रश्न विचारणे तितकेच महत्त्वाचे आहे. औद्योगिक संस्था, दुष्कृत्य करण्यासाठी खोल्या (रूम) पुरवणारी हॉटेल्स, अशा सगळ्यांना तेवढेच उत्तरदायी ठरवणे, धर्मांतरविरोधी कडक कायदे आणि त्याची कार्यवाही, जनजागृती, पोलीस कारवाई यांद्वारे उपाय चालू आहेतच; पण माझा प्रश्न आहे तो, स्वतः पीडित मानसिकतेमध्ये वावरणार्या तरुणी आणि स्त्रिया यांच्याविषयी.

१. …कशासाठी ?
अशी कोणती अगतिकता आहे की, जी बुद्धीला झापडे लावून चुकीच्या माणसांवर अंधविश्वास ठेवायला भाग पाडत आहे ? वैयक्तिक आयुष्यात अशी कोणती जगावेगळी दु:खे आहेत, ज्यामुळे सतत तुम्ही पीडित होऊन आधारासाठी खांदा शोधत आहात ? अशी कोणती हतबलता आहे की, ज्यामुळे आत्मसन्मान विकून तुम्हाला नोकरी आणि ‘प्रमोशन’ (बढती) हवे आहे ? कुटुंबव्यवस्था, संस्कार, चांगली संगत हे सारे क्षणांत डावलून ‘मुक्त’ होण्यामध्ये तरुणींना कसली धन्यता वाटत आहे ? प्रतिदिन नवनवीन डावपेचांना, निरनिराळ्या पद्धतीने केलेल्या बुद्धीभेदांना फसत असतांना तुमचे शिक्षण, तुमचा विवेक, स्वाभिमान कुठे गहाण ठेवत आहात ? पदोपदी लावलेले सापळे आपण ओळखायला पाहिजेत, त्यापासून चातुर्याने दूर रहायला पाहिजे, असे अजूनही वाटत नाही का ? हे परखड प्रश्न सर्वांना लवकरात लवकर जागे करू दे.
ज्याप्रमाणे ‘गरीब परिस्थिती, शिक्षणाचा अभाव वगैरे गोष्टी समाजात आतंकवादी सिद्ध करतात, मुळात ती निरागस माणसेच असतात’, हा मूर्ख समज आता दूर झाला आणि त्याच्या मुळाशी असणारी टोकाची धर्मांध वृत्ती कुणीही नाकारू शकत नाही. त्याचप्रमाणे ओळख लपवून करण्यात येणारी कारस्थाने, मुलींचे शोषण, धर्मांतर, पाठोपाठ क्रूर हिंसा असा घटनाक्रम लव्ह जिहादचा हेतू स्पष्ट करतो आणि या घटनांना व्यक्तीस्वातंत्र्य किंवा आंतरधर्मीय विवाह इत्यादी कायदेशीर गोष्टींपासून वेगळा करतो (अजूनही काही ढोंगी लोक या घटनांना सामान्य म्हणून गृहीत धरत आहेत, ही गोष्ट वेगळी). कोणती सूत्रे लक्षात घेण्यासारखी आहेत ?

२. सशक्त प्रतिमा
काही ना काही वैयक्तिक अडचणींमध्ये ग्रासलेल्या तरुणी शोषणामध्ये लवकर फसत आहेत. असे का ? संस्कृतमध्ये एक सुंदर सुभाषित आहे. ज्या लाकडामध्ये आग/ ठिणग्या स्पष्ट दिसतात, ते ओलांडण्यासाठी सहसा कुणी धजावत नाही; पण जिथे ती प्रकर्षाने दिसत नाही, आतील भागात असते, ते लाकूड कुणीही सहज ओलांडण्याचे धाडस दाखवते. तशीच व्यक्तीची प्रतिमा आयुष्यात पुष्कळ महत्त्वाची आहे. प्रत्येक मुलीची प्रतिमा करारी का असू नये ? प्रयत्नपूर्वक तिने ती तशी घडवावी. स्वतःचे आत्मबळ वाढवावे. महाविद्यालय असो, कार्यालय वा व्यवसाय असो, समर्थ आणि सशक्त व्यक्तीमत्त्व आपोआपच संकटांना दूर ठेवते. याउलट स्वतःच्या अपयशासाठी कायम परिस्थितीला दोष देणे, कुटुंबातील वाद बाहेर सांगणे, स्वतःला दुर्बल वा हतबल समजून प्रत्येक वळणावर परिस्थितीचे उदात्तीकरण करणे थांबवायला हवे. त्यातूनच शोषणासाठी मुली हेरल्या जातात. समोरचा तुमच्या दुर्बलतेचा लाभ घेऊन स्वतःचा खांदा पुढे करतो. तुम्ही त्याचे स्वागतच करता !
३. माझी सुरक्षा, माझे दायित्व
‘माय लाईफ, माय स्पेस’ (माझे आयुष्य, माझी मोकळीक) म्हणता, तसेच स्वत:च्या सुरक्षेचे किती दायित्व घेता ? सामाजिक स्तरावर हा विषय महत्त्वाचा आहेच; परंतु एकूणच स्वतःच्या सुरक्षेसाठी जाणतेपणाने आम्ही काय काय करतो ? किती सतर्क आहोत ? पुष्कळ उदाहरणे आहेत. पडताळून बघा -पालक म्हणून शाळा, खासगी शिकवणी किंवा इतर आवश्यक ‘व्हॉट्सॲप ग्रुप्स’ व्यतिरिक्त आपण किती ‘व्हॉट्सॲप ग्रुप्स’चा भाग आहोत ? ब्युटी पार्लर (सौंदर्यवर्धनालय), खाद्यपदार्थ, साड्या आणि दागिने खरेदी, गृह सजावट, अंगावर गोंदवायची चित्रे, छंद, सौंदर्यप्रसाधने, इतर व्यावसायिक ग्रुप्स, मालमत्ता खरेदी-विक्री, व्यापारविषयक अशा वेगवेगळ्या कारणांमुळे एकेक स्त्री कितीतरी ‘व्हॉट्सॲप ग्रुप्स’मध्ये सध्या सहज कार्यरत असते, ही वस्तूस्थिती आहे ! त्या समूहामधील बाकी सदस्यांना तुम्ही ओळखता का ? त्यातून तुमच्याविषयी महत्त्वाची माहिती तुमच्या नकळत किती लोकांपर्यंत सहज पोचते, याची कल्पना तुम्हाला आहे का ?
कुणाकडून काही उत्पादने / सेवा घेतली की, तो म्हणतो ‘मी तुम्हाला ‘व्हॉट्सॲप ग्रुप’मध्ये जोडतो, म्हणजे पुढची उत्पादने आली की, तुम्हाला त्यावर दिसतील’… कशासाठी ? ‘नोटीफिकेशन’साठी (विविध सेवा किंवा उत्पादने यांविषयी येणार्या सूचना) सुद्धा भ्रमणभाष क्रमांक देऊ नका. काम झाले की, तो क्रमांक आपण किती वेळा ‘ब्लॉक’ (रोखणे / नाकारण्याची सुविधा) करतो ?
रक्षक कि भक्षक ? कसे ओळखायचे ?

घरपोच वस्तू पोचवणारी मुले इमारतीत येतांना व्यवस्थित नोंद करून येत आहेत का ? येणारी मुले नक्की त्याच सदनिकेच्या पत्त्यावर जात आहेत का ? काम झाले की, लगेच बाहेर पडत आहेत कि तिथेच घुटमळत इतर माहिती काढत आहेत ? ज्या सुरक्षा संस्थेकडे सोसायटीच्या सुरक्षेचे दायित्व आहे, ती संस्था सहसा कसे सुरक्षारक्षक पुरवत आहे ? हेही बघायला हवे. काहीही संशयास्पद आढळल्यास त्यांच्याकडून तात्काळ काम काढून घ्यावे. दुरुस्तीसाठी सुतार, नळजोडणी वा दुरस्ती करणारे, इलेक्ट्रिशियन, गाडीसाठी चालक इत्यादी पुरवणार्या संस्थेने कुणाला पाठवले आहे ? संशयास्पद आढळल्यास त्या व्यक्तीला घरात घेऊ नये अथवा त्याच्या गाडीत जाऊ नये. काम करतांना अरेरावी केली, तर ‘रिमार्क’ (त्या व्यक्तीविषयीचा अभिप्राय) नोंदवण्यासाठी विसरू नये.
– मेजर सौ. गर्गे-कुलकर्णी (निवृत्त)
४. आवश्यक तेवढेच बोला !
काही दिवसांपूर्वी एका किराणा दुकानात घरपोच वस्तू पोचवण्यासाठी दुकानदाराला आलेला भ्रमणभाष ‘स्पीकर’वर (ध्वनीक्षेपकावर) ठेवून तो विचारतो, ‘दाल २ किलो कर दू ?’ (डाळ २ किलो देऊ का ?) त्यावर त्या महिला म्हणतात, ‘नही. इतने बडे घर में हम दोनो ही रहते है…उसमें भी ‘हसबंड’ (नवरा) ज्यादा तर बाहरगाव जाते है, ज्यादा सामान का क्या करू ? आप एक किलो लिखिए ।’ (नको. एवढ्या मोठ्या घरात आम्ही दोघेच घरात असतो. त्यातही माझे पती बहुतांश वेळा बाहेरगावी असतात, त्यामुळे मी अधिकचे सामान घेऊन काय करू ?) मी समोरच होते. १ किलो कि २ ? एवढेच बोला. इतर भाषण कशाला करता ! घरपोच सुविधेमुळे सुलभता वाटते; पण धोकाही तेवढाच वाढत आहे, लक्षात घ्या.
५. सुरक्षित क्षेत्र (कम्फर्ट झोन)
‘मी ‘सॉफ्टवेअर इंजिनीयर’ (संगणक प्रणालीविषयीचा अभियंता) आहे, मी ‘मॅनेजमेंट’ (व्यवस्थापन) क्षेत्रात काम करते… माझा इतर सामाजिक समस्यांशी काय संबंध ? everything is politics yaar (सगळेच राजकारण आहे) मला दूर रहायचे आहे…’, असे म्हणत अनेक सुशिक्षित स्त्रिया मतदानही करण्याची तसदी घेत नाहीत. अशा भिंती घालून घेणार्या स्त्रिया अवतीभोवती सर्रास आढळतात. नोकरी, आठवड्याच्या सुट्टीचे जीवन, खरेदी इत्यादी चाकोरीचे सुरक्षित क्षेत्र कधी होते, हे त्यांचे त्यांनाही कळत नाही ! ज्या राष्ट्राचे तुम्ही नागरिक आहात, ज्या समाजात तुम्ही रहाता, त्याविषयी एवढी उदासीनता कशासाठी ? ‘कार्य संतुलित जीवना’वर सातत्याने चर्चा होतांना दिसते; पण त्यातील जीवनाचा परीघ किती मोठा आहे, तो समजून घ्यायला नको का ? समाजकारण, धर्मकारण, अर्थकारण, राजकारण सगळे मला कळणे अतिशय आवश्यक आहे, ही जाणीव केव्हा होणार ? त्यासाठी मनाची कवाडे कधी उघडणार बये !
६. विघटन कि संघटन ?
मागच्या महिन्यात बीडमध्ये भयंकर घटना घडली. चुकून गाडीचा जरासा धक्का लागला म्हणून एका निवृत्त सैनिकावर जीवघेणे आक्रमण झाले. काही मिनिटांत रहीम शेख नावाच्या गुंडाने मोठी टोळी जमा करून त्या सैनिकाला पुष्कळ मारहाण केलीच, वर त्याच्या संपूर्ण अंगावर उकळता चहा टाकला. अजूनही वेदनांनी ओरडणारा त्या सैनिकाचा आवाज ऐकवत नाही. ज्या सैनिकाच्या जिवावर इथे सुरक्षित राहून ऐशोआरामात जगत आहोत, त्याच्याच जिवावार उठत आहात ? असा कोणताही जमाव धावून आला, तर विघटनवाद पसरवणार्या जातीजातींच्या झुंडी वाचवणार आहेत का ? कि संपूर्ण समाज एकत्र येऊन या आक्रमणाला थोपवणार आहोत, हा विचार गांभीर्याने करावा.
७. सुसंवादाचा पूल
पालक-पाल्य हा संवाद उत्तम हवाच. त्यातही आईची भूमिका महत्त्वाची आहे. एक गोष्ट पालकांशी बोलतांना जाणवते, ‘धर्म, धर्माधर्मांतील वाद हे सगळे कशाला सांगायचे मुलांना ? आणखी लहान आहेत ते ! पुढे तर ते भारतात रहातील कि नाही, हेही ठाऊक नाही !’ लहान मुलामुलींशी घडणारे इतके भयंकर गुन्हे, त्यांचे शोषण होत असूनही आपण आपल्या मुलांना मात्र गुलाबी फुग्यात वाढवणे, ही केवढी मोठी चूक आहे आणि या सार्या भोवती घडणार्या गोष्टी भारतापुरत्याच मर्यादित आहेत का ?
इथे असणार्या धर्मांची मुख्य शिकवण, त्यांचा उगम, आतापर्यंतचा इतिहास, त्या धर्मांची मूल्ये, तुलनात्मक गोष्टी, आताची आव्हाने… हे सारे मोकळेपणाने मुलांना शिकवायला नको का ? एखादी गोष्ट ही वरवर वाटणारा गुन्हा आहे कि एखाद्या धर्माची मूळ शिकवण आणि त्याचा अविभाज्य भाग, हे स्पष्टपणे त्यांना कळायला नको का ? कि आतंकवाद्यांशी लढण्यासाठी सैनिकांनीच मरण झेलायचे ? नक्षलवाद मोडून काढतांना पोलिसांनीच जीव धोक्यात घालायचा का ? नागरिक आणि पालक म्हणून माझे दायित्व काय ? विचार करा. घराबाहेर पडल्यावर मुले कुठल्याही प्रकारच्या बुद्धीभेदामध्ये अडकणार नाहीत, एवढा आपल्या संवादाचा पूल पक्का आहे का ? स्वतःला विचारा.
८. ‘लढाई टाळणे’, हाच ती जिंकण्याचा सर्वोत्तम उपाय !
‘दुर्बलता झटकून द्यावी. आत्मविश्वास, धाडस, चातुर्य, मुख्य म्हणजे निर्णयक्षमता इत्यादी कितीतरी नेतृत्वगुण मला वाढवले पाहिजेत’, असा निश्चय करूया. शारीरिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक – जगण्याच्या या सगळ्या पातळ्यांवर मी सशक्त झालेच पाहिजे. समर्थ आणि विवेकी स्त्री ही काळाची आवश्यकता आहे.
‘पितापुत्रभ्रातृंश्च भर्तारमेवं सुमार्गं प्रति प्रेरयन्तीमिह’, म्हणजेच ‘वेळ आल्यावर स्वत:चा पिता, पुत्र, भाऊ, पती या सर्वांनाही सन्मार्गावर चालण्यासाठी प्रेरित करणारी अशी भारतीय स्त्री आहे !’ ती स्वतःच दिशाहीन होऊन कसे चालेल ?
साहसी खेळ असो वा तंत्रज्ञान भारतीय मुली आज प्रत्येक क्षेत्रात एकेक शिखर काबीज करत आहेत. तरुणींनो, शिक्षण घ्या, स्वप्ने बघा, अतोनात मेहनत घेऊन तुमचे ध्येय साध्य करा; पण वैयक्तिक आयुष्यातही योग्य निर्णय घ्या. मोहांमध्ये अडकू नका. नाही तर मिळवलेले यश, जिवाला जीव देणारे कुटुंब, स्वातंत्र्य सारे गमावून बसाल. त्यासाठी अविवेकाची झापडे उघडून डोक्यात विवेकाचा प्रकाश पडू द्या ! आत्मभान जागे करा. या क्रूर रक्तबीज राक्षसाला (जिहादचा राक्षस) संपवण्यासाठी स्वतःला समर्थ व्हायलाच हवे !
– मेजर सौ. मोहिनी गर्गे-कुलकर्णी (निवृत्त), ठाणे.
अनैतिकतेचा बाजार !
वैयक्तिक अधिकाराहून सार्वजनिक सुरक्षेला अधिक प्राधान्य देणारी मुंबई उच्च न्यायालयाची भूमिका !
पब-हॉटेल्स कि मृत्यूचे सापळे ?
पूर्वजांची दिनचर्या जुन्या पद्धतीची नाही, तर आश्चर्यकारक प्रगत आहे !
अनंत कोटी ब्रह्मांडांचा नायक असलेला भगवंत सूक्ष्मातून कार्य करत असूनही त्याला देहधारणा करून पृथ्वीवर अवतार घ्यावे लागण्यामागील अध्यात्मशास्त्र !