उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची टीका

कोलकाता (बंगाल) – अलीकडेच बांगलादेशात एका दलित हिंदूची निर्घृण हत्या झाली. भाजपने त्याचा निषेध केला, आम्ही आंदोलन केले; पण बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी शांत राहिल्या. त्यांना भीती होती की, त्यांनी बोलल्यास त्यांचा मुसलमान मतदारवर्ग नाराज होईल, अशा शब्दांत उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रसारानिमित्त बांकुड येथे आयोजित सभेत ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले की, हे मतांसाठी राजकारण करणारे लोक बंगालची लोकसंख्यात्मक रचना पालटण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्याचा काळ महत्त्वाचा आहे आणि भविष्यातील पिढ्यांच्या दृष्टीने काँग्रेस, डावे पक्ष आणि तृणमूल काँग्रेस यांना मनमानी करण्याची संधी देऊ नका. हे पक्ष बंगालमध्ये दुर्गापूजा आणि नवरात्र यांसारख्या सणांच्या वेळी अडथळे निर्माण करतात. हे पुढे सहन केले जाणार नाही.
संपादकीय : मंदिरे अध्यात्मासाठीच !
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
‘हाफकीन’ आणि घाना सरकार यांच्यात सर्पदंशावरील उपचारपद्धतीसह अन्य संशोधनासाठी सहकार्य करार होणार !
जेजुरीतील रसायनयुक्त भंडार्याच्या विक्रीविरुद्ध भाजप आमदार विक्रम पाचपुते आक्रमक !
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले