एक पाद्री अटकेत, तर दुसरा पसार
गुना (मध्यप्रदेश) – गुना जिल्ह्यात हिंदूंना ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यास प्रवृत्त करण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणानंतर पोलिसांनी मुख्य आरोपी पाद्री उत्तम बरेला याला अटक केली आहे. (पाद्र्याचे नाव हिंदू कसे ? हिंदु नावांचा वापर करून बाटगे ख्रिस्ती अन्य हिंदूंचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करतात, हे जाणा ! – संपादक) ‘चंगाई सभे’च्या (पाद्रयांकडून आजारी असणार्यांवर प्रार्थनेद्वारे उपचार करून त्यांना कथितरित्या बरे करणे) नावाखाली धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणातील दुसरा आरोपी पाद्री विकास बरेला याचा शोध अद्याप घेतला जात आहे।
१. ५ एप्रिल २०२६ या दिवशी मोहनपुर खुर्द गावात २ बकर्या आणि ४० कोंबड्या कापून ३०० ते ४०० लोकांसाठी मेजवानी बनवण्यात आली होती आणि ‘चंगाई सभे’च्या नावाखाली लोकांना एकत्र बोलावण्यात आले होते. सभेत सहभागी झालेल्या लोकांना प्रार्थनेमुळे आजार आणि व्यसन दोन्ही बरे होऊ शकतात, असे सांगण्यात आले.
२. अनेक ग्रामस्थांनी सांगितले की, रुग्णालय किंवा पारंपरिक उपचार यांमधून आराम न मिळाल्यामुळे त्यांना येथे बोलावण्यात आले होते. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार मिशनरीशी संबंधित लोक प्रत्येक रविवारी अशा सभा घेत असत आणि याला ‘मनपरिवर्तन’ असे संबोधले जात होते. ईस्टरच्या दिवशी झालेल्या या सभेचा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर संबंधित लोक तेथून गायब झाले होते.

काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक
Suhail Arrested : श्रीराममंदिर बाँबने उडवून देण्याचा कट रचणार्या सुहेल याला कर्नाटकमधून अटक
Love Jihad : गेल्या २४ घंट्यांत उघड झाल्या लव्ह जिहादच्या ३, तर धर्मांतराची १ घटना !
‘लव्ह जिहाद’च्या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राच्या प्रकरणी १४ जणांविरुद्ध दोषारोपपत्र सादर !
धर्म लपवून विवाह केल्याने तो अवैध ठरला, तरी पीडितेला पोटगी मिळण्याचा अधिकार ! : Madhya Pradesh High Court