आज ‘होमिओपॅथी’ औषधाचे जनक डॉ. सॅम्युअल हानेमान यांचा जन्मदिवस आहे. त्या निमित्ताने...
डॉ. सॅम्युअल हानेमान (Samuel Hahnemann) हे जर्मनी येथील ‘ॲलोपॅथी’चे डॉक्टर होते. वर्ष १७८१ मध्ये त्यांनी खासगी व्यवसायाला आरंभ केला. वैद्यकीय क्षेत्रातील तत्कालीन उपचार पद्धतीविषयी ते असमाधानी होते. त्यामुळे त्यांनी ‘विविध औषधी वनस्पतींचा मानवी देहावर होणारा परिणाम’ यावर संशोधन चालू केले. या संदर्भात अनेक प्रयोग करून पाहिल्यानंतर ‘औषधाचे पूर्ण गुणधर्म जाणून घेण्यासाठी ते औषध निरोगी व्यक्तीवर प्रमाणसिद्ध (प्रूव्ह) करून पाहिले पाहिजे’, असे त्यांच्या लक्षात आले. यातूनच त्यांना ‘होमिओपॅथी’चे तत्त्व स्फुरले आणि त्यांनी या उपचार पद्धतीचा प्रसार चालू केला.
होमिओपॅथीचे जनक असलेल्या डॉ. सॅम्युअल हानेमान यांचा १० एप्रिल या दिवशी वाढदिवस आहे. त्यानिमित्त ‘होमिओपॅथी’च्या उपचारांमुळे रुग्णांना झालेले लाभ पुढे दिले आहेत.
डॉ. सॅम्युअल हानेमान (Samuel Hahnemann) हे जर्मनी येथील ‘ॲलोपॅथी’चे डॉक्टर होते. वर्ष १७८१ मध्ये त्यांनी खासगी व्यवसायाला आरंभ केला. वैद्यकीय क्षेत्रातील तत्कालीन उपचार पद्धतीविषयी ते असमाधानी होते. त्यामुळे त्यांनी ‘विविध औषधी वनस्पतींचा मानवी देहावर होणारा परिणाम’ यावर संशोधन चालू केले. या संदर्भात अनेक प्रयोग करून पाहिल्यानंतर ‘औषधाचे पूर्ण गुणधर्म जाणून घेण्यासाठी ते औषध निरोगी व्यक्तीवर प्रमाणसिद्ध (प्रूव्ह) करून पाहिले पाहिजे’, असे त्यांच्या लक्षात आले. यातूनच त्यांना ‘होमिओपॅथी’चे तत्त्व स्फुरले आणि त्यांनी या उपचार पद्धतीचा प्रसार चालू केला.
होमिओपॅथीचे जनक असलेल्या डॉ. सॅम्युअल हानेमान यांचा १० एप्रिल या दिवशी वाढदिवस आहे. त्यानिमित्त ‘होमिओपॅथी’च्या उपचारांमुळे रुग्णांना झालेले लाभ पुढे दिले आहेत.

१. आधुनिक वैद्या (डॉ.) रूपाली भाटकार, फोंडा, गोवा.
१ अ. होमिओपॅथी उपचार पद्धतीची वैशिष्ट्ये आणि त्या उपचारांमुळे बरे झालेले जुनाट विकार
१ अ १. पूर्वानुभवांमुळे होमिओपॅथी उपचारांची भीती वाटणे आणि होमिओपॅथी वैद्य अशोक बोरकर अन् वैद्य प्रवीण मेहता यांच्यामुळे भीती दूर होणे : ‘मला होमिओपॅथीच्या उपचारांची भीती वाटत होती; कारण वर्ष २०१७ च्या आधी मी दोन आजारांसाठी होमिओपॅथीचे उपचार घेतले होते. त्या वेळी झालेल्या गंभीर ‘साईड इफेक्ट’मुळे माझी प्रकृती आणखी बिकट झाली होती. मला पाठदुखीचा पुष्कळ त्रास होत असतांना मी होमिओपॅथीची औषधे घेतली होती; पण त्यामुळे माझी लक्षणे इतकी वाढली की, मला श्वासही घेता येत नव्हता. दुसर्यांदा एका होमिओपॅथी डॉक्टरांनी माझ्या बोटावरील चामखिळीवर उपचार केले आणि मला अंगदुखीचा पुष्कळ त्रास झाला.
यांमुळे मला होमिओपॅथी उपचारांची भीती वाटत होती. मडगाव येथील होमिओपॅथी वैद्य अशोक बोरकर आणि सनातनचे साधक होमिओपॅथी वैद्य प्रवीण मेहता यांना भेटेपर्यंत माझा या उपचारांवरील विश्वास उडाला होता. मेहताकाकांनी मला ‘होमिओपॅथीच्या औषधाची मात्रा आणि शक्ती (पोटेन्सी) अचूक असणे का आवश्यक आहे ? तसेच ‘सौम्यीकरण’ (‘डायल्युशन’) करून औषधाची शक्ती कशी वाढवायची ?’ यांविषयी समजावून सांगितले. त्यानंतर मला कधी औषधांचा त्रास झाला नाही.
१ अ २. होमिओपॅथी वैद्य प्रवीण मेहता यांच्याकडून उपचार पद्धतीविषयी समजलेली सूत्रे
अ. या उपचार पद्धतीमध्ये होमिओपॅथी वैद्य रुग्णाची सखोल माहिती घेतात आणि रोगाच्या सर्व लक्षणांवर उपाय शोधून त्यांना औषधे देतात.
आ. कधी कधी होमिओपॅथी औषधाची एक मात्राही (डोसही) रोगांवर प्रभावी ठरते. हे उपचार आयुष्यभर चालू ठेवण्याची आवश्यकता नसून ते आवश्यकतेनुसार घेतले जाऊ शकतात. याचे कारण ही औषधे अॅलोपॅथीच्या औषधांपेक्षा सूक्ष्म स्तरावर कार्य करतात.
इ. होमिओपॅथीचे औषधोपचार वैद्यांच्या देखरेखीखाली घ्यावे लागतात; कारण औषधाची चुकीची मात्रा (प्रमाण) घेतली, तर रोगाची लक्षणे तीव्र होऊ शकतात.
ई. ही औषधे घेतल्यावर रोगाच्या लक्षणांमध्ये सौम्य वाढ होणे, हे एक चांगले लक्षण आहे; कारण दिलेले औषध योग्य असल्याचे ते सूचक आहे.
१ अ ३. अन्य उपचारांनी बरा न झालेला त्वचारोग (सोरायसिस) होमिओपॅथी आणि मंत्र उपचार यांनी ९० टक्के बरा होणे : वर्ष २०१७ मध्ये मला त्वचारोग (सोरायसिस) झाला. मी अॅलोपॅथी आणि आयुर्वेद या पद्धतींचे सर्व उपचार घेतले. रक्त शुद्ध करण्यासाठी आयुर्वेदातील जलौका लावणे (त्वचेवर जळू लावणे) हा उपचारही केला; पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. त्यानंतर मी एका पुरोहित ज्योतिषांना माझी पत्रिका दाखवली. त्यांनी मला एक पूजा करण्यास सांगितली. त्यांनी सांगितले की, ‘पूजा केल्याने माझा त्वचारोग बरा होईल किंवा त्वचारोगाच्या उपचारांसाठी मला दिशा मिळेल’ आणि खरोखरंच पूजा केल्यानंतर मला होमिओपॅथीचे उपचार घेण्याची आतून स्फूर्ती मिळाली. मी माझ्या आजाराचा अभ्यास केला आणि मला कळले की, ‘होमिओपॅथी’मध्येच यावर सर्वोत्तम उपचार आहेत.’ त्यानंतर मी होमिओपॅथीची औषधे चालू केली आणि माझा त्वचाविकार बरा होऊ लागला. त्यासमवेत मी परात्पर गुरु (कै.) पांडे महाराज यांनी दिलेले मंत्रोपचारही चालू केले. त्यानंतर माझा त्वचाविकार ९० टक्के बरा झाला.
१ अ ४. होमिओपॅथीचे उपचार केल्यावर ‘अॅलर्जीक रायनाइटिस’चा (एलर्जीमुळे वारंवार होणार्या सर्दीचा) आजार बरा होणे : मला अनेक वर्षांपासून ‘अॅलर्जीक रायनाइटिस’चा (एलर्जीमुळे वारंवार होणार्या सर्दीचा) त्रास होत होता. ‘अँटीहिस्टामाइन’ (अॅलर्जीविरोधी औषध) घेतल्याने हा आजार नियंत्रणात होता. त्यानंतर मी घशात सर्दीचा स्राव उतरणे आणि वारंवार घशाचा संसर्ग होणे, यांसाठी आयुर्वेदीय उपचार चालू केले. त्यामुळे माझा आजार न्यून झाला; पण तो पूर्ण बरा झाला नाही. नंतर मी होमिओपॅथीची औषधे घेतल्यावर ९० टक्के आजार बरा झाला.’
२. आधुनिक वैद्या (डॉ.) लिंदा बोरकर, फोंडा, गोवा.
२ अ. होमिओपॅथीचे उपचार अनेक विकारांत लाभदायी असल्याचा स्वानुभव घेणार्या आधुनिक वैद्या (डॉ.) लिंदा बोरकर !
२ अ १. घसादुखी आणि कानदुखी यांसाठी वरचेवर प्रतिजैविके घ्यावी लागत असतांना होमिओपॅथी उपचारांमुळे गुण येऊन त्यावर विश्वास बसणे : ‘मला बरीच वर्षे ‘फॅरिंन्जायटिस (घशाचा दाह किंवा घसा खवखवणे)’चा त्रास होऊन नंतर काही दिवसांनी कानाचे इन्फेक्शन (जंतूसंसर्ग) होत असे. त्यामुळे बर्याच वेळा प्रतिजैविके (‘ॲन्टीबायोटिक्स’) घेण्यावाचून माझ्यापुढे पर्याय नसायचा. यासाठी मी आयुर्वेदीय उपचारही घेतले होते. वर्ष २०२२ पासून मी होमिओपॅथी वैद्य प्रवीण मेहता यांच्याकडून होमिओपॅथीचे उपचार घेण्यास आरंभ केला आणि मला गुण आला. त्यानंतर माझा होमिओपॅथीच्या उपचारांवर विश्वास बसला.
२ अ २. होमिओपॅथी वैद्य प्रवीण मेहता यांच्या उपचारांचा त्वरित लाभ होणे : मला गुडघ्याच्या स्नायूंची दुखापत झाल्यावर किंवा माझ्या कानांत दुखू लागल्यास मी मेहताकाकांना संपर्क करते. ते मला लगेच साहाय्य करतात आणि योग्य ते उपचार सांगतात. त्यांच्या उपचारांचा मला लगेच लाभ होतो.
होमिओपॅथी औषधे : दूरस्थ पद्धतीने कार्य आणि आपत्काळामधील संजीवनी !

होमिओपॅथी औषधे अतिशय सूक्ष्म असून ती रोगाच्या मुळावर घाव घालतात आणि त्यामुळे रोग मुळापासून बरा होण्यास साहाय्य होते. ही औषधे एवढी सूक्ष्म आहेत की, आपण ती दूरस्थ पद्धतीनेसुद्धा देऊ शकतो. या औषधाने आपण रुग्णाच्या केसाच्या माध्यमातून रुग्णावर उपचार करू शकतो. रुग्ण जगाच्या पाठीवर कुठेही असला, तरी आपण त्या रुग्णाचा केस त्याला उपयुक्त असलेल्या होमिओपॅथीच्या औषधाच्या द्रावणामध्ये बुडवून ठेवला असता किंवा तो केस औषधाच्या गोळीजवळ चिकटवून ठेवला असता रुग्णाला त्या औेषधाचा औषध पोटातून घेतल्यावर जसा परिणाम होईल, तसाच परिणाम होतो आणि रुग्णाला बरे वाटते. त्यामुळे आपत्काळामध्ये रुग्ण अत्यवस्थ असेल आणि तेथे जाणे अशक्य असेल, तर अशा पद्धतीने उपचार केले असता रुग्णाला तात्काळ आराम मिळू शकतो. त्यामुळे आपत्काळामध्ये ही उपचारपद्धत एकप्रकारे संजीवनीच ठरू शकेल.
– होमिओपॅथी वैद्य प्रवीण मेहता, पुणे (८.४.२०२६)
२ अ ३. होमिओपॅथीच्या औषधांमुळे रोगाची तीव्रता न वाढणे : कधी थंड पेय घेतल्यावर लगेचच माझा घसा खवखवू लागला किंवा तो दुखायला लागला की, मी होमिओपॅथीची औषधे घेते. त्यामुळे रोगाची तीव्रता न वाढता मला बरे वाटते.
२ अ ४. वैद्य मेहताकाकांच्या औषधांमुळे जबड्याच्या स्नायूंचे आखडणे न्यून होणे : अलीकडे जबड्याच्या सांध्याच्या त्रासांमुळे माझे तेथील स्नायू आखडले होते आणि दातांची मांडणी हलल्यामुळे मला चावण्यास त्रास होत होता. वैद्य मेहताकाकांनी दिलेल्या औषधांनी माझ्या जबड्याचे आखडलेले स्नायू मोकळे होऊन मला बरे वाटले.
मी वैद्य मेहताकाकांना संपर्क केल्यावर ते मला लगेच उपचार सांगतात आणि मला त्यांचा त्वरित लाभ होतो. आता मी कुठेही गेले, तरी माझ्या ठराविक आजारांसाठी मी होमिओपॅथीची औषधे समवेत घेऊन जाते.’

स्वतः मूलतः आधुनिक वैद्य (‘ॲलोपॅथी’चे डॉक्टर) असतांना त्या उपचार पद्धतीमधील त्रुटी लक्षात आल्यावर सुलभ आणि परिणामकारक असणारी, लोकांना आर्थिकदृष्ट्या परवडणारी अन् रुग्णांवर दुष्परिणाम न करणारी उपचारपद्धत शोधून मानवजातीला नवसंजीवनी प्रदान करणार्या डॉ. सॅम्युअल हानेमान यांना आमचा कोटीशः प्रणाम !
३. कु. अपाला औंधकर (आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय १९ वर्षे), फोंडा, गोवा.
३ अ. वारंवार होणार्या तीव्र सर्दीचा त्रास होमिओपॅथी वैद्य प्रवीण मेहता यांच्या औषधांनी ९० टक्के बरा होणे
३ अ १. ५ – ६ वर्षांपासून साधिकेला ‘ॲलर्जी’मुळे होत असलेला ‘सायनुसायटिस’चा (वारंवार होणार्या सायनस मधील इन्फेक्शनचा) तीव्र त्रास ! : ‘मागील ५ – ६ वर्षांपासून मला ‘सायनुसायटिस’चा (वारंवार होणार्या ‘सायनस’मधील – नाक, कपाळ, तसेच डोळ्यांभोवती असलेल्या हाडांच्या पोकळीतील इन्फेक्शनचा) त्रास होऊन सतत सर्दी आणि कफ होत असे. मला सलग ३० ते ३५ शिंका यायच्या. मला थकवाही येत असे. ‘ॲलर्जी’मुळे (असात्म्यतेमुळे) मला ही सर्दी होत होती. सर्दीमुळे मला ‘अंग गळून जाणे, रात्री झोप न लागणे, श्वास घ्यायला त्रास होणे, छातीत जड वाटणे’ इत्यादी त्रास होत असत.
३ अ २. होमिओपॅथी वैद्य प्रवीण मेहता यांची औषधे घेतल्यावर सर्दीचा त्रास ९० टक्के न्यून होणे : यासाठी मी अनेक उपचार करून पाहिले होते. ऑक्टोबर २०२५ मध्ये मी होमिओपॅथी वैद्य प्रवीण मेहता यांना माझ्या सर्दीच्या त्रासांविषयी सांगितले. त्यांनी मला होमिओपॅथीची औषधे दिली. मी नियमित आणि वेळेवर ती औषधे घेतली. त्यानंतर अवघ्या एक ते दीड मासात माझी सर्दी ९० टक्के बरी झाली. पूर्वीसारख्या पुष्कळ शिंका येणे, थकवा जाणवणे इत्यादी माझे त्रासही न्यून झाले. पूर्वी मला हिवाळ्याच्या कालावधीत ‘नाक चोंदणे, पुष्कळ सर्दी होणे’, आदी त्रास होत असत. या हिवाळ्यात मी पुण्याला गेले होते. तेव्हा तेथे पुष्कळ थंडी होती, तरीही मला सर्दीचा त्रास झाला नाही.
कृतज्ञता
‘वारंवार होणार्या सर्दीचा माझा हा त्रास दूर होईल’, असे मला कधी वाटले नव्हते; परंतु मेहताकाकांनी दिलेल्या औषधांमुळे माझा त्रास दूर झाला, तसेच ‘या औषधांमध्ये आजाराला समूळ नष्ट करण्याची क्षमता आहे’, हेही माझ्या लक्षात आले. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने आणि होमिओपॅथी वैद्य मेहताकाका यांच्या औषधांमुळे माझा त्रास उणावला. त्याबद्दल मी प.पू. गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते !’
(सर्व सूत्रांचा दिनांक: ६.४.२०२६)
आपत्काळातील आरोग्याची गुरुकिल्ली !सनातनचा नूतन ग्रंथघरच्या घरी करता येतील असे ‘होमिओपॅथी’ उपचार लेखक : डॉ. (सौ.) संगीता अ. भरमगुडे (एम्.डी. [होमिओपॅथी]), डॉ. प्रवीण मेहता (एल्.सी.ई.एच्) आणि डॉ. अजित भरमगुडे (एल्.सी.ई.एच्.) ‘भावी काळात महापूर, महायुद्ध यांसारख्या भीषण आपत्ती ओढवतील’, असे संत, भविष्यवेत्ते यांनी सांगितले आहे. ‘अशा आपत्काळात डॉक्टर आदी सहजासहजी उपलब्ध नसतांना, तसेच एरव्हीही व्यक्तीला स्वतःवर आणि कुटुंबियांवर न्यूनतम तरी औषधोपचार करता यावेत’, हा या ग्रंथाचा उद्देश आहे.
या ग्रंथाची वैशिष्ट्ये !आर्थिकदृष्ट्या परवडणार्या होमिओपॅथी औषधांचे विविध लाभ
जनहो, संकटकाळात घाबरू नका. उपयुक्त माहिती देणारा वरील ग्रंथ आपल्या संग्रही अवश्य ठेवा ! आपत्काळासाठी उपयुक्त असलेले सनातनचे इतर काही ग्रंथशारीरिक, मानसिक व आध्यात्मिक त्रासांच्या निवारणासाठी ‘बिंदूदाबन’
ई-बुकवर लवकरच उपलब्ध !सनातनच्या ग्रंथांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी |

अहंकार कि सत्याचा शोध ?
गरम शेक आणि गार शेक
‘इंडो-पॅसिफिक’ : २१ व्या शतकातील भारताच्या सुरक्षेचा नवा महामार्ग !
कर्णावती (गुजरात) बाँबस्फोट प्रकरणाच्या खटल्याचा निकाल : भारतीय राज्याच्या उत्क्रांतीतील एक धोरणात्मक मैलाचा दगड !
‘पंडवानी’ या लोककलेच्या सादरीकरणाच्या माध्यमातून समाजात ईश्वरभक्तीचा प्रसार करण्याचे समष्टी सेवाकार्य निरपेक्षभावाने करणार्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या पद्मविभूषण कै. डॉ. तीजनबाई !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘विज्ञानामुळे होणारी हानी’ या विषयावरील लिखाणाचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !