
१. पायात अकस्मात् तीव्र वेदना होऊ लागल्यावर ‘व्हेरिकोज वेन्स’ हा शारीरिक आजार असल्याचे समजणे
‘डिसेंबर २०२४ मध्ये माझ्या पायात अकस्मात् तीव्र वेदना होऊ लागल्या. मी काही आधुनिक वैद्यांना दाखवल्यानंतर वाराणसीमधील बी.एच्.यू. रुग्णालयात दाखवले. त्यांनी तपासणी केल्यानंतर मला ‘व्हेरिकोज वेन्स’ (यामध्ये पायातून वरच्या दिशेला रक्तप्रवाह अल्प होत असल्यामुळे ते रक्त पायाच्या नीलांमध्ये साठून त्या फुगल्यामुळे पायात वेदना होतात.) हा शारीरिक आजार असल्याचे समजले. माझे अहवाल पाहिल्यानंतर आधुनिक वैद्यांनी शल्यकर्म करण्याचा सल्ला देऊन मला शल्यकर्म करण्याचा दिनांकही दिला.
२. प्रयागराज कुंभमेळा २०२५ मध्ये सनातन संस्थेद्वारे लावण्यात येणार्या प्रदर्शनाच्या सेवेत सहभागी होण्याची संधी मिळाल्यावर पायाचे शल्यकर्म नंतर करण्याचे ठरवणे
त्या वेळी १२ वर्षांतून एकदा येणारा प्रयागराज कुंभमेळा २०२५ मध्ये सनातन संस्थेद्वारे २ मास लावण्यात येणार्या प्रदर्शनाच्या सेवेचे व्यापक स्तरावर नियोजन चालू होते. गुरुदेवांच्या अनंत कृपेमुळे मला कुंभक्षेत्रात लावल्या जाणार्या ‘४ शिबिरांतील प्रदर्शनात लावण्यात येणारे फ्लेक्स पडताळणे, छापणे, समन्वय करणे आणि एका शिबिराचे व्यवस्थापन पहाणे’, अशा सेवा मिळाल्या होत्या. त्या वेळी माझ्या मनात एकच विचार तीव्रतेने आला की, ‘शल्यकर्म नंतरही करून घेता येईल; परंतु १२ वर्षांतून एकदाच येणार्या या कुंभ महापर्वाची सेवा करण्याची संधी गमावता कामा नये.’
३. कुंभमेळ्याच्या आनंददायी सेवेत पायाच्या दुखण्याची जाणीवही न होणे
कुंभमेळ्याच्या आरंभीच्या ७ दिवसांत मी ‘व्हेरिकोस वेन्स’ संबंधी थोडीशी काळजी घेतली; परंतु ७ दिवसांनंतर सेवेच्या व्यस्ततेत माझे लक्ष माझ्या पायांकडे गेलेच नाही. २ मासांच्या कुंभमेळ्याच्या आनंददायी सेवेत ‘माझ्या पायाला काही त्रास आहे’, हे माझ्या लक्षातही आले नाही.
‘गुरुदेव आणि गंगामाता यांनी प्रतिकूल परिस्थितीत माझे सर्व त्रास दूर करून मला एवढा आनंद दिला आणि साधकांच्या माध्यमातून प्रेम दिले, एवढ्या मोठ्या समष्टी सेवेची संधी दिली, संपूर्ण भारतभरातून आलेल्या साधकांकडून शिकायला मिळाले, यासाठी केवळ कृतज्ञता !’
– सौ. सानिका संजय सिंह, वाराणसी आश्रम, उत्तरप्रदेश (१५.१.२०२६)
‘भिऊ नकोस माझ्या बाळा, मी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) तुझ्या पाठीशीच सदा ।
प.पू. गजानन महाराजांनी साधकाला प्रत्यक्ष दर्शन देऊन श्री गुरुचरित्राचे पारायण करण्यास सांगणे आणि ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनीच प.पू. गजानन महाराज यांच्या रूपात दर्शन दिले’, असे वाटणे
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
अध्यात्म शिकण्यापेक्षा प्रत्यक्ष साधना करणे महत्त्वाचे !
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी भक्तीसत्संगात ‘स्वीकारण्याची वृत्ती’ या विषयावर केलेले मार्गदर्शन ऐकून साधिकेने केलेले प्रयत्न आणि तिला झालेले लाभ !
तळमळीने सेवा करणारे आणि रोगाचे अचूक निदान करण्याची दैवी शक्ती लाभल्याने साधकांचा मोठा आधार असणारे रत्नागिरी येथील प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य कै. मंदार श्रीकांत भिडे (वय ५१ वर्षे) !