हिंदूंना धर्मांधांशी ‘सनातन धर्मा’च्या दृष्टीने अहिंसेने वागण्याविषयी अयोग्य मार्गदर्शन करणारे मोहनदास गांधी !

‘मोहनदास गांधी हे खरेच महात्मा होते का ? काँग्रेसवाले सांगतात, ‘ते रामाचे उपासक होते.’ असे आहे, तर त्यांनी भारताचे नेतृत्व करतांना प्रभु श्रीरामाच्या शिकवणीप्रमाणे आचरण केले का ? महाबली वाली हा त्याचा भाऊ असलेल्या सुग्रीवाशी युद्ध करतांना मर्यादापुरुषोत्तम श्रीरामाने वालीचा वध एखाद्या पशूप्रमाणे केला.

श्री. गिरिधर वझे

तेव्हा त्याने युद्ध समोरासमोर करण्याचा धर्म पाळला नाही; कारण वाली अधर्माचरण करत होता. हेच तत्त्व पूर्णावतार असलेल्या भगवान श्रीकृष्णानेही स्वतः कृतीत आणले आणि महाभारताच्या युद्धामध्ये तशीच कृती करण्याचे मार्गदर्शन अर्जुनालाही केले. सहस्रो वर्षे मोगलांनी द्वेषभावनेने असंख्य हिंदूंना ठार मारले, तसेच भारताच्या स्वातंत्र्यकाळापासून आजपर्यंत धर्मांध मुसलमान क्रौर्याने हिंदूंचा वंशविच्छेद करत होते, हिंदु महिलांवर बलात्कार करत होते, तरीही काँग्रेसचे तत्कालीन सर्वेसर्वा असलेले मोहनदास गांधी यांनी हिंदूंना ‘सर्वधर्मसमभावा’चे बाळकडू पाजले. गांधींनी हिंदूंना धर्मांधांशी अहिंसेने वागण्याचे, म्हणजे ‘सनातन धर्मा’च्या दृष्टीने अयोग्य मार्गदर्शन केले.

मोहनदास गांधी जगद्गुरु संत तुकाराम महाराज किंवा राष्ट्रगुरु समर्थ रामदासस्वामी यांच्यासारखे महात्मा होते का ?

काँग्रेसच्या सांगण्यानुसार मोहनदास गांधी ‘महात्मा’ म्हणजे ‘संत’ असतील, तर ते अधर्माचरणी कसे झाले ? त्यांनी हिंदूंच्या रक्षणासाठी धर्मांध मुसलमानांच्या विरोधात सत्याग्रह केला का ? जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांनी संसारात राहून साधना, म्हणजे विठ्ठलाची उपासना करून सदेह वैकुंठगमन केले. संत तुकाराम महाराजांचे कीर्तन एका मंदिरात चालू असतांना छत्रपती शिवाजी महाराजही तिथे उपस्थित होते. तेव्हा मंदिराला वेढा घालणार्‍या मोगलांपासून छत्रपती शिवरायांचे रक्षण होण्यासाठी संत तुकाराम महाराज यांनी विठ्ठलाला साकडे घातले, म्हणजे त्या घटनेनंतर छत्रपती शिवरायांनी हिंदु धर्म रक्षणाचे कार्य करण्यामागे संत तुकाराम महाराज यांचेच सर्व योगदान होते. त्या प्रसंगी संत तुकाराम महाराज यांनी छत्रपती शिवरायांना मोगलांविषयी अहिंसेची शिकवण दिली नाही आणि हिंदु धर्म रक्षणासाठी राष्ट्रगुरु समर्थ रामदासस्वामी यांचे मार्गदर्शन घेण्याची आज्ञा दिली. हे सर्वांनाच ठाऊक आहे.

असे असतांना मग मोहनदास गांधी हे संत तुकाराम महाराज किंवा राष्ट्रगुरु समर्थ रामदासस्वामी यांच्यासारखे महात्मा होते का ? धर्मांध मुसलमानांचे लांगूलचालन करणारे मोहनदास गांधी काँग्रेसच्या सांगण्यानुसार ‘भारताचे राष्ट्रपिता’ म्हणून गौरवले गेले. मग वर्ष १९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर वर्ष २०१४ पर्यंत भारताची अनेक क्षेत्रांमध्ये अधोगती झाली, तर यात नवल ते काय ?’

– श्री. गिरिधर भार्गव वझे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.३.२०२६)