मुख्यमंत्र्यांची मुलगीही ‘लव्ह जिहाद’ची बळी असल्याचा आरोप
गेल्या १० वर्षांत ५ सहस्र हिंदु आणि ख्रिस्ती मुलींचे धर्मांतर

कोची (केरळ) – ९ एप्रिलला केरळ विधानसभेची निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर लव्ह जिहाद हे षड्यंत्र समोर आणणार्या ‘द केरला स्टोरी २’ चित्रपटावरून राज्यात राजकारण केले जात आहे. मुख्यमंत्री पिनराई विजयन् यांनी चित्रपट भाजपचा प्रचार करणारा असल्याचे सांगत अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर घाला घालत त्याच्यावर राज्यात बंदी घातली होती. उच्च न्यायालयाने तो प्रदर्शित करण्याचा आदेश दिला; मात्र चित्रपटगृहांचे मालक तो दाखवण्यासच सिद्ध नव्हते.
अशा सगळ्यात महाकुंभमेळ्यातून प्रसिद्धी मिळालेल्या मोनालिसा भोसले हिने केरळम्मधीलच एका मंदिरात तिचा प्रियकर फरमान खान याच्यासमवेत विवाह केला. सत्ताधारी माकपचे ज्येष्ठ नेते थॉमस आयझॅक यांनी या विवाहाचे छायाचित्र प्रसारित करत लिहिले, ‘ही खरी केरळ स्टोरी आहे.’ (उद्या याच मोनालिसाचे काही बरेवाईट झाले, तर थॉमस आयझॅक यांनाच लव्ह जिहाद कटाचा सूत्रधार म्हणून अटक करून सरकारने फासावर का लटकवू नये ? – संपादक)
आकडेवारीतून समजून घ्या लव्ह जिहादचे केरळम्मधील वास्तव !
१. राज्यातील कासारगोड, कोळीकोड, त्रिशूर, मलप्पूरम्, कन्नूर आणि पलक्कड या ६ जिल्ह्यांमध्ये लव्ह जिहादच्या माध्यमातून सर्वाधिक धर्मांतर झाले आहे.
२. या ६ जिल्ह्यांतच विधानसभेच्या १४० पैकी ७० जागा आहेत.
३. त्रिशूर वगळता वरील सर्व जिल्ह्यांमध्ये तब्बल ३० टक्क्यांहून अधिक मुसलमान लोकसंख्या आहे.
४. या सगळ्यात मुख्यमंत्री पिनारई विजयन् यांची मुलगी टी. वीणा हिने वर्ष २०२० मध्ये ‘डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया’ या माकपच्या विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष महंमद रियास याच्याशी लग्न केले होते.
५. ‘केरळ कॅथोलिक बिशप कौन्सिल’चे सदस्य फादर मायकल पुल्लीकल सांगतात की, ‘द केरला स्टोरी’मधील पात्रे आणि कथा काल्पनिक असू शकतात; पण हा विषय केरळशी संबंधित आहे. केरळम्मध्ये केवळ हिंदूच नाही, तर ख्रिस्ती समुदायही बळी ठरला आहे. कट्टर मुसलमान संघटना जाणूनबुजून हे सर्व करत आहेत. बहुतेक प्रकरणांमध्ये विवाहित मुसलमान तरुणच यात सहभागी असतात.
६. ‘हिंदू ऐक्य वेदी’चे अध्यक्ष आर्.व्ही. बाबू सांगतात की, राज्यात प्रत्येक महिन्याला १० ते १२ प्रकरणे नोंदवली जातात. वर्ष २०१५ ते २०२५ या ११ वर्षांच्या कालावधीत ५ सहस्रांहून अधिक मुलींचे इस्लाममध्ये धर्मांतर झाले.
७. ‘सेंटर फॉर पब्लिक पॉलिसी रिसर्च’चे संचालक डॉ. धनुराज सांगतात की, ‘द केरला स्टोरी’ राज्यात निवडणुकीचे सूत्र आहे. याची चर्चा प्रत्येक घरात होते, पण लोक याच्या आधारावर मतदान करतील, हे कठीण आहे.
८. मुसलमान नेत्यांचा थयथयाट : कोचीचे रहिवासी साजील म्हणतात की, ‘द केरला स्टोरी’ची कथा खरी नाही. प्रेम ही दोन व्यक्तींमधील गोष्ट आहे. याला हिंदु-मुसलमान-ख्रिस्ती यांच्याशी जोडून पाहू नये. ‘लव्ह मॅरेज’ला लव्ह जिहाद म्हणू नये. (असे आहे, तर हिंदु मुलींचे नंतर बळजोरीने धर्मांतर का केले जाते ? – संपादक)
९. सत्ताधारी माकप स्वत:ला मुसलमान समर्थक दाखवतात : कोचीचे रहिवासी अनुप म्हणतात की, माकपने मोनालिसाला प्रसिद्ध केले. ते स्वतःला पुरो(अधो)गामी दाखवतात, जेणेकरून मुसलमान माकपला मतदान करतील.
अहिल्यानगरमध्ये धर्मांधांकडून हिंदु कुटुंबावर प्राणघातक आक्रमण !
गोरेगाव येथे सरकारी भूमीवरील अवैध दर्गा भुईसपाट !
Paris Riot : फ्रान्स सरकारने या पुढे ‘शून्य सहनशीलते’चे धोरण अंगीकारावे !
Corporate Jihad : धर्मांतरास नकार दिल्याने ‘Wipro’च्या हिंदु महिलेला नोकरीवरून काढले !
Japan Illegal Mosque : जपानमध्ये पाकिस्तानने बांधलेली अवैध मशीद पाडणार !
Bengaluru SIR : बेंगळुरूत ९७ लाखांपैकी ४ लाख मतदार अवैध!