‘सनातन प्रभात’ नियतकालिकांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये !

आज ५.४.२०२६ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या गोवा आणि सिंधुदुर्ग आवृत्तीचा तिथीनुसार २७ वा वर्धापनदिन आहे. त्या निमित्ताने…

‘सनातन प्रभात’मध्ये समाज, राष्ट्र, धर्म आणि साधना यांच्या संदर्भात विविध प्रकारचे लेख प्रसिद्ध होतात. समाज, राष्ट्र आणि धर्म, तसेच साधना यांच्या हानीच्या संदर्भातील आणि त्यांच्यावरील उपायांच्या संदर्भातील विविध विचारवंतांचे लेख प्रतिदिन प्रसिद्ध होत असतात. त्यामुळे दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचणारे विविध वाचक या लिखाणाने जागृत होऊन समाजसेवा, राष्ट्रसेवा, धर्मसेवा आणि धर्माचरण अन् व्यष्टी, तसेच समष्टी साधना करण्यास उद्युक्त होतात. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने ‘सनातन प्रभात’च्या माध्यमातून हिंदूंना जागृत करून त्यांना राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणाच्या मूळ प्रवाहाशी जोडण्याचे महत् कार्य साध्य होते. त्याचप्रमाणे साधकांना आलेल्या अनुभूती आणि परिस्थितींतून शिकायला मिळालेली सूत्रे यांचेही वैशिष्ट्यपूर्ण लेख, तसेच दिनविशेष आणि सण यांच्या संदर्भातील लेख सनातन प्रभातमध्ये असतात. आजच्या या लेखामध्ये आपण दैनिक ‘सनातन प्रभात’ची विविध आध्यात्मिक वैशिष्ट्ये पहाणार आहोत.

१. सनातन प्रभात आणि सनातनचे ग्रंथ यांच्यातील भेद !

(वाचण्यासाठी चित्रावर क्लिक करा)

२. दैनिक ‘सनातन प्रभात’चे निराळेपण

‘सनातन प्रभात’ आर्थिक हानी सोसूनही केवळ लोकांना सत्यनिष्ठ आणि वस्तूनिष्ठ वृत्त सांगून त्यांच्यासमोर परखडपणे सत्य प्रस्तुत करत आहे. ‘सनातन प्रभात’ हा कर्तव्यनिष्ठ धर्मसेवक आहे.

३. ‘सनातन प्रभात’ दिशादर्शन करणारा दीपस्तंभ !

सध्या सर्वत्र जल प्रदूषण, हवा प्रदूषण इत्यादींप्रमाणे वैचारिक प्रदूषण वाढलेले आहे. त्यामुळे पृथ्वीच्या या रज-तमात्मक वातावरणात कुणालाही धर्माचरण आणि ईश्वरप्राप्तीसाठी साधना करण्याची सुबुद्धी होत नाही. अशा कलुषित वातावरणात ‘सनातन प्रभात’ सात्त्विकतेने भारित झालेल्या विचारांचे प्रक्षेपण विविध लेखांद्वारे करत आहे. त्यामुळे ‘सनातन प्रभात’ वाचून अनेक वाचकांनी हिंदु धर्मानुसार आचरण करणे आणि ईश्वरप्राप्तीसाठी साधना करणे चालू केले आहे. अशा प्रकारे मोह आणि माया यांत भरकटलेल्या मनुष्याला त्याच्या जन्माचे सार्थक करण्यासाठी ‘सनातन प्रभात’ प्रभावीपणे दिशादर्शन करणारा दीपस्तंभ आहे.

४. साधना करणार्‍या जिवांना आपत्काळात टिकून रहाण्यासाठी केवळ ‘सनातन प्रभात’ने मार्गदर्शन करणे

या घोर कलियुगात साधना करणारे सात्त्विक जीव या पृथ्वीवर अल्पसंख्यांक आहेत. सध्या तिसर्‍या महायुद्धाची युद्धसज्जता आणि नैसर्गिक प्रकोप सर्वत्र वाढत आहे. ‘विविध व्याधी, विकार आणि अपघात यांना तोंड देणार्‍या सात्त्विक जिवांना जिवंत रहाण्यासाठी कोणते आध्यात्मिक उपाय करायला हवेत ?’, याविषयीचे अचूक आणि प्रभावी मार्गदर्शन सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, सनातनचे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाका आणि अन्य संत वेळोवेळी ‘सनातन प्रभात’मधून करत आहेत. त्यामुळे अशा आपत्कालीन परिस्थितीत साधकांच्या प्राणांचे रक्षण होत आहे.

५. साधनेत प्रगती करण्यासाठी केवळ ‘सनातन प्रभात’ने मार्गदर्शन करणे

‘पृथ्वीवर अनेक देशांमध्ये अनेक सात्त्विक जीव रहातात. त्यांनी काळानुसार नेमकी कोणती साधना केली, तर त्यांची आध्यात्मिक उन्नती होऊ शकते ?’, याविषयीचे अनमोल मार्गदर्शन सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ हे सनातन संस्थेचे मोक्षगुरु वेळोवेळी करत आहेत. त्याचप्रमाणे अन्य संतही ‘स्वतःच्या साधनेला गतीमान करण्यासाठी साधकांनी व्यष्टी आणि समष्टी साधना अधिक चांगल्या प्रकारे अन् भावपूर्णरित्या कशी करायची ?’, याविषयी ‘सनातन प्रभात’द्वारे मार्गदर्शन करत आहेत.

गुरुकृपायोगानुसार साधना केल्यामुळे २५.३.२०२६ पर्यंत १३७ साधक ७० टक्के किंवा त्याहून अधिक आध्यात्मिक पातळी गाठून संतपदी विराजमान झाले आहेत आणि १०४० साधकांनी ६० टक्के ते ६९ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली असून ते संतपदाकडे वाटचाल करत आहेत. तसेच सनातन प्रभातने २ बालक-संत, ६० टक्क्यांहून अधिक आध्यात्मिक पातळी असलेले २०० दैवी बालके आणि अन्य १०१२ दैवी बालके यांची ओळख करून दिली आहे. तसेच दैवी बालकांच्या संदर्भात चाललेल्या संशोधनकार्याची माहितीही समाजाला करून दिली आहे.

६. ‘सनातन प्रभात’ला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त होणार असणे

सत्यनिष्ठ आणि वस्तूनिष्ठ सूत्रांचे संकलन केल्यामुळे ‘सनातन प्रभात’मध्ये भारत अन् धर्म यांच्या सद्य:स्थितीचे वर्णन ऐतिहासिक स्तरावर झालेले आहे. त्यामुळे पुढे ‘सनातन प्रभात’ला भविष्यातील अनेक पिढ्यांसाठी ऐतिहासिक महत्त्व प्राप्त होईल.

 ७. ‘सनातन प्रभात’मधून प्रक्षेपित होणारे विविध प्रकारचे घटक, त्यांचे प्रमाण आणि त्यांचा वाचकांवर होणारा सुपरिणाम

(वाचण्यासाठी चित्रावर क्लिक करा)

८. ‘सनातन प्रभात’च्या पाठीशी श्री गणेश आणि श्री सरस्वतीदेवी यांची ज्ञानशक्ती कार्यरत झालेली असून या दैवी कृपेमुळे ‘सनातन प्रभात’च्या माध्यमातून समाजात विचारमंथन होऊन आत्मोत्कर्षासहित राष्ट्रोत्कर्षही लवकरच होणार आहे !

‘सनातन प्रभात’च्या माध्यमातून श्री गणेश आणि श्री सरस्वतीदेवी यांची ज्ञानशक्ती कार्यरत झालेली आहे. त्यामुळे अनेक साधकांना येणार्‍या दैवी अनुभूती लिखाणाच्या माध्यमातून लेखबद्ध करता येतात. त्याचप्रमाणे अनेक विचारवंतांना त्यांचे प्रगल्भ विचार लेखातून प्रभावशाली शैलीत मांडता येतात. सूक्ष्म-ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना काळानुसार विविध विषयांवर ईश्वराचे सूक्ष्म-विचार ग्रहण करून शब्दरूपीपुष्पे लेखमालेत गुंफता येतात. ‘सनातन प्रभात’च्या पाठीशी गुरुबळ कार्यरत असल्यामुळे समाजातील वाचकांना ‘सनातन प्रभात’मधील सात्त्विक भाषेचे अर्थ उमजून त्यांना सात्त्विक भाषेतील लिखाण वाचण्याची गोडी निर्माण झालेली आहे. अनेकांना ‘सनातन प्रभात’मधील लिखाण वाचून अनुभूतीही येत आहेत. त्याचप्रमाणे ‘सनातन प्रभात’मध्ये केवळ सत्यच प्रसिद्ध होते’, असा विश्वास प्रत्येक वाचकाला वाटतो. ‘सनातन प्रभात’चे हे कार्य वैचारिक क्रांतीकडे झेपावत असून दैवी कृपेमुळे ‘सनातन प्रभात’च्या माध्यमातून समाजात विचारमंथन होऊन आत्मोत्कर्षासहित राष्ट्रोत्कर्षही लवकरच होणार आहे. अशा प्रकारे येणार्‍या निकट भविष्यात ‘सनातन प्रभात’ नवा इतिहास रचणार आहे.

८ अ. नवीन युगाच्या निर्मितीची साकार करणार आहे तुझी दैवी संकल्पना !

‘लोकमान्य टिळकांच्या केसरी आणि मराठा या वृत्तपत्रांतून मिळाली आम्हास दैवी प्रेरणा ।
देव आणि गुरु यांच्या कृपेने सनातन प्रभातच्या माध्यमातून कार्यरत झाली आहे दैवी चेतना ।
हिंदुत्वाचा नवा इतिहास घडवण्याचे सामर्थ्य दे आम्हास भगवंता ।
नवीन युगाच्या निर्मितीची साकार करणार आहे तुझी दैवी संकल्पना ।।

९. ‘सनातन प्रभात’मध्ये सामावलेले विविध प्रकारचे दैवी तेज आणि त्यांचे कार्य

(वाचण्यासाठी चित्रावर क्लिक करा)

१०. सारांश

‘सनातन प्रभात’ हा ईश्वराचा संदेशवाहक आहे. तो देवाचा दूत आहे. त्याच्या सत्संगामुळे व्यक्ती भौतिक जगात राहूनही ईश्वराशी जोडली जाते आणि तिच्यातील सद्गुणांची वृद्धी होऊ लागते. अशा प्रकारे ‘सनातन प्रभात’ हा आदर्श भारतीय नागरिक आणि धर्मसेवक घडवणारे प्रभावी माध्यम अन् एक महत्त्वपूर्ण मार्गदर्शक दीपस्तंभ आहे. हे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी धर्मक्रांतीची मशाल पेटवणारे एकमेव दैनिक आणि निर्भीड धर्मसेवक सैनिक आहे.

११. कृतज्ञतापुष्प

सनातन प्रभात क्षात्रतेज आणि ब्राह्मतेज यांनी भारित असलेले एक दिव्यास्त्र आहे !
सनातन प्रभात हे दैवी विचारांनी भारित असलेले एक दैवी शस्त्र आहे ।
ते ब्राह्मतेजाने युक्त असलेले अमोघ शक्तीस्वरूप ब्रह्मास्त्र आहे ।।’ 

श्री गुरुकृपेमुळे ‘सनातन प्रभात’च्या आध्यात्मिक वैशिष्ट्यांचे ज्ञानमोती लाभले, यासाठी श्री गुरुचरणी हे ज्ञानमोतीरूपी विचार कृतज्ञताभावाने अर्पण करत आहे.’

– सुश्री मधुरा भोसले (सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्ती साधिका, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

(ज्ञान मिळण्याचा दिनांक : २१.३.२०२५, वेळ : दुपारी ३ ते ३.३० आणि कालावधी : अर्धा घंटा)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक
  • सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्‍याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात.
  • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.