केवळ जन्माने हिंदु असून आणि देवतांचे नाव असून कुणी हिंदु होत नाही, तर हिंदु धर्मासाठी तन,मन, धन आणि प्रसंगी प्राण अर्पण करणारा खरा हिंदु होतो. काँग्रेसने किंवा सिद्धरामय्या यांनी यातून एकतरी गोष्ट कधी केली आहे का ?

दावणगेरे (कर्नाटक) – आमचे म. गांधी यांचे हिंदुत्व आहे, तर भाजपचे नथुराम गोडसे याचे हिंदुत्व आहे. आम्ही गांधी यांच्या हिंदुत्वाच्या आधारावर समाजाला एकत्र जोडण्याचे काम करतो, तर भाजप गोडसेच्या हिंदुत्वाच्या आधारावर समाजात फूट पाडण्याचे काम करतो, असे वक्तव्य कर्नाटकाचे काँग्रेसचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केले. (काँग्रेसने गांधींच्या कथित हिंदुत्वाचा पुरस्कार केला; म्हणूनच काँग्रेसच्या केंद्रातील ५५ वर्षांच्या सत्ताकाळात देशाची सर्वच क्षेत्रात अधोगती झाली, असे म्हटल्यास ते चुकीचे ठरणार नाही ! – संपादक) ते दावणगेरे येथील एका प्रचारसभेत बोलत होते.
“Our Hindutva is of Gandhi; theirs is of Godse!” – claims CM Siddaramaiah
A bizarre attempt to redefine Hindutva by the Congress leadership in Karnataka.
Siddaramaiah deserves an award for the "discovery" that Mahatma Gandhi possessed 'Hindutva'. If Mahatma Gandhi truly… pic.twitter.com/iVsgKyjiI3
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 4, 2026
भाजप हिंदुत्वाचे नाव घेऊन सत्तेत येतो आणि भ्रष्टाचार करतो !
सिद्धरामय्या म्हणाले की, भाजपचे लोक हिंदुत्वाचे नाव घेऊन सत्तेत येण्याचे काम करतात. सत्तेत आल्यावर काहीही काम करत नाहीत; केवळ लूटमार करतात. यापूर्वी राज्यात भाजप सत्तेवर आल्यावर त्यांनी कोणतीही विकासकामे केली नाहीत. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारा पक्ष काँग्रेस आहे. भाजपचे लोक देशासाठी कधीही कारागृहात गेले नाहीत. भ्रष्टाचार करण्यात ते क्रमांक १ वर आहेत. राज्यातील जनतेचा पूर्ण आशीर्वाद घेऊन ते कधीही सत्तेत आले नाहीत. मागील दाराने ‘ऑपरेशन कमळ’ (आमदारांना पक्षातून फोडून) करून ते सत्तेत आले. आम्ही सत्तेत असल्यावर विकासकामे करतो. (काँग्रेसचा विकास म्हणजे मुसलमानांवर उधळपट्टी करणे, त्यांना सर्वप्रकारच्या सोयीसुविधा पुरवणे, गुन्हेगार मुसलमानांवर कारवाई न करणे, हिंदुत्वनिष्ठांवर अत्याचार करणे, असाच आहे ! – संपादक)
(म्हणे) ‘आम्ही हिंदु नाही का ?’ – सिद्धरामय्या यांचा प्रश्नसिद्धरामय्या म्हणाले, ‘मी हिंदु नाही का? मंचावर असलेले नेते हिंदु नाहीत का? माझे नावच सिद्धरामय्या आहे. यामध्ये २ देवांची नावे आहेत. एक ईश्वर आणि दुसरा राम. तरीही आम्ही हिंदु नाही का ?’ असे प्रश्न त्यांनी विचारले. (सिद्धरामय्या आणि काँग्रेसवाले हिंदु असते, तर त्यांनी हिंदूंवर अत्याचार केले नसते ! – संपादक) संपादकीय भूमिकाकेवळ जन्माने हिंदु असून आणि देवतांचे नाव असून कुणी हिंदु होत नाही, तर हिंदु धर्मासाठी तन,मन, धन आणि प्रसंगी प्राण अर्पण करणारा खरा हिंदु होतो. काँग्रेसने किंवा सिद्धरामय्या यांनी यातून एकतरी गोष्ट कधी केली आहे का ? उलट हिंदु धर्मांवर अन्य कुणी आघात केले नाहीत, तितके आघात काँग्रेस आणि तिचे नेते यांनी केले आहेत, हा इतिहास आहे ! |
Ambaji Temple Donation Theft : गुजरातमधील प्रसिद्ध शक्तिपीठ अंबाजी मंदिरातही नोटा मोजणीच्या वेळी २ महिन्यांपूर्वी चोरी झाल्याचे उघड !
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !
चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना मिळालेला जामीन रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार