|

नागपूर – महाराष्ट्र सरकारने राज्यातील ३०८ मदरशांच्या आधुनिकीकरणासाठी ५० लाख रुपयांचे अनुदान संमत केले आहे. ‘डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजने’च्या अंतर्गत २१ जिल्ह्यांमधील या मदरशांवर ही खैरात करण्यात येणार असून या संदर्भातील शासनाचा निर्णय (अध्यादेश) घोषित करण्यात आला आहे. अल्पसंख्यांकांच्या सर्वांगीण विकासाचे नाव देऊन हा निधी वाटला जात आहे; पण या प्रकरणी हिंदु समाज संतप्त झाला आहे.
Maharashtra Government approves ₹50 lakh grant for 308 Madrasas!
Maximum benefit goes to 103 Madrasas in Chhatrapati Sambhajinagar.
In many places across India, fanaticism is taught in madrasas, and numerous instances have come to light where terrorist activities were… pic.twitter.com/JcQsTyLECg
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 2, 2026
छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक मदरशांचे ‘आधुनिकीकरण’ !
सरकारने घोषित केलेल्या आकडेवारीनुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वाधिक १०३ मदरशांना १६ लाख ७२ सहस्र रुपयांचे अनुदान मिळणार आहे. त्याखालोखाल नागपूरमधील ५७ मदरशांना ९ लाख २५ सहस्र रुपये, तर ठाणे जिल्ह्यातील ३८ मदरशांना ६ लाख १६ सहस्र रुपये देण्यात येणार आहेत. यासह मुंबई शहरातील १२, मुंबई उपनगरातील १२, जळगावमधील ३, कोल्हापूर येथे ३, सोलापूर येथे ४, सातारा येथे ५, लातूरमध्ये ६, बीडमध्ये २०, जालन्यात १३, यवतमाळमध्ये ११, गडचिरोलीत ७ यांसारख्या २१ जिल्ह्यांतील मदरशांचा लाभार्थी सूचीत समावेश आहे.
धार्मिक शिक्षणासह आधुनिक विषयांच्या नावाखाली निधी !
या योजनेद्वारे मदरशांमध्ये केवळ धार्मिक शिक्षण न देता विज्ञान, गणित, समाजशास्त्र, हिंदी, मराठी आणि इंग्रजी हे विषय शिकवले जातील, तसेच उच्च शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीही दिली जाणार आहे. ज्यामुळे मदरशांमधील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढून रोजगारांच्या संधीही उपलब्ध होतील, असा सरकारचा तर्क आहे. हा सर्व निधी संबंधित जिल्हाधिकार्यांच्या वतीने मदरशांना वितरित करण्यात येणार आहे.
संपादकीय भूमिका
|
दौंडमध्ये गुळात साखरेची भेसळ केलेला १७ लाखांचा साठा जप्त !
म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांचे मुंबईत स्वागत !
अहिल्यानगरमध्ये धर्मांधांकडून हिंदु कुटुंबावर प्राणघातक आक्रमण !
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थ्यांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये अवैध मद्यविक्री करणार्यांवर २३ गुन्हे नोंद !
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या प्रशासकपदी जिल्हाधिकार्यांची नियुक्ती !