१. अष्टगुणांनी युक्त हनुमान
श्रीरामभक्त हनुमान हा ‘बुद्धी, बळ, कीर्ती, धैर्य, निर्भयता, निरोगीपणा, चपलता आणि वाक्पटुत्व’, हे आठ दैवी गुण आणि ‘अणिमा, महिमा, लघिमा, गरिमा, प्राप्ती, प्रकाम्य (मनातील इच्छा पूर्ण करू शकणे), वशित्व (सर्व भूतमात्रांना वशीभूत करू शकणे) आणि इशित्व (सृष्टीतील सर्व पदार्थांवर सत्ता चालवू शकणे)’, या अष्टमहासिद्धींनी युक्त आहे. त्यामुळे संत तुलसीदासांनी त्याचा ‘तू ज्ञान आणि गुण यांचा साक्षात् सागर आहेस’, असा उल्लेख ‘हनुमान चालिसा’मध्ये केला आहे.
२. हनुमानाचे विविध अवतार

हनुमानाचे एकमुखी, पंचमुखी आणि एकादशमुखी स्वरूप असे विविध अवतार सुप्रसिद्ध आहेत. हनुमानाची आराधना केल्याने बुद्धी, बळ, कीर्ती, धैर्य, निर्भयता, आरोग्य, सुदृढता आणि वाक्शक्ती हे गुण प्रसादाच्या रूपाने उपासकाला प्राप्त होतात.
३. शिवाची पंचमुखे आणि शिवावतार पंचमुखी हनुमान
शिवाची ‘तत्पुरुष, सद्योजात, वामदेव, अघोर आणि ईशान’, या नावाने विख्यात असणारी पाच मुखे आहेत. हनुमान हा पंचमुखी शिवाचा अवतार असल्यामुळे त्यालाही ‘कपि, नरसिंह, गरुड, अश्व आणि वराह’, अशी पाच सुंदर मुखे आहेत. प्रचंड शक्तीसंपन्न असणारा हनुमान कोणतेही महान कार्य सहजतेने पूर्णत्वाला नेण्यास समर्थ आहे.
३ अ. पंचमुखी हनुमानाच्या जन्माचा इतिहास : एकदा पाच मुख असलेला एक भयानक राक्षस प्रकट झाला. त्याने कठोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवाकडून ‘त्याच्यासारखे रूप असणाराच त्याचा वध करू शकेल’, असे वरदान मिळवले. वरदान मिळताच तो राक्षस उन्मत्त होऊन सर्वांना भयंकर त्रास देऊ लागला. सर्व देवतांनी भगवंताला ‘आम्हाला त्रासातून मुक्त करावे’, अशी प्रार्थना केली. भगवंताने दिलेल्या आज्ञेनुसार मंगळवार, मार्गशीर्ष कृष्ण अष्टमीला हनुमंताने पंचमुखी अवतार धारण केला. त्याची कपि, नरसिंह, गरुड, अश्व आणि वराह अशी पाच सुंदर मुखे होती. त्यानंतर पंचमुखी हनुमानाने त्या राक्षसाशी घनघोर युद्ध करून त्याचा वध केला. तेव्हापासून हनुमानाचे ‘पंचमुखी रूप’ पूजनीय झाले आहे.
(क्रमश:)
भाग २ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1025554.html
– सुश्री मधुरा भोसले (सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्त्या साधिका, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
|

शांत, संयमी, दूरदर्शी नेतृत्व, विनम्रता आणि सेवाभाव यांचा आदर्श असलेल्या आदरणीय दीदी !
डॉक्टरांना (आधुनिक वैद्यांना) मारून कुणाचा जीव वाचणार ?
हिंदूंना शत्रूबोध नाही !
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
न्यायालयातील भाषेचा अडथळा : ‘लॅटिन’ संज्ञांमुळे सामान्य माणूस भारतीय कायद्यापासून दूर जात आहे का ?
सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे आणि त्यांच्या पत्नी आधुनिक वैद्या (सौ.) मधुवंती पिंगळे यांच्या सत्संगात दिग्रस (जिल्हा यवतमाळ) येथील साधिकांना आलेल्या अनुभूती !