आतंकवादी कारवायांसाठी तरुणांची भरती करण्याच्या सिद्धतेत असतांनाच कारवाई !

नवी देहली – भारतीय सुरक्षायंत्रणांनी ‘लष्कर-ए-तोयबा’शी संबंधित आतंकवादी शब्बीर अहमद लोन याला नुकतीच देहली सीमेवरून अटक केली.
🚨 Major Security Success: LeT Terrorist Arrested in Delhi! 🚨
The Delhi Police have apprehended Shabbir Ahmed Lone, a terrorist associated with the 'Lashkar-e-Taiba' outfit. 🛡️🇮🇳
He was caught red-handed while making preparations to recruit local youth for terrorist… pic.twitter.com/0xgQRxqYMY
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 30, 2026
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
तो देहली, कोलकाता आणि तमिळनाडू येथे आतंकवादी कारवायांसाठी तरुणांची भरती करण्याच्या सिद्धतेत होता. हा संपूर्ण कट पाकिस्तानची गुप्तचर संस्था ‘आय.एस्.आय’च्या मार्गदर्शनाखाली रचला जात होता. शब्बीर अहमद लोन बांगलादेशात बसून भारतविरोधी कारवाया करत होता, असे प्राथमिक अन्वेषणात समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.
‘काऊंटर इंटेलिजन्स काश्मीर’ (सीआयके) या सुरक्षायंत्रणेने २६ मार्च या दिवशी शब्बीर अहमद लोन याच्या आतंकवादी टोळीचा शोध घेण्यासाठी काश्मीरमधील गांदरबल, शोपियां आणि श्रीनगर या ३ जिल्ह्यांमध्ये १० ठिकाणांवर धाडी घातल्या होत्या. शब्बीरच्या आतंकवादी टोळीला बांगलादेश आणि पाकिस्तान येथे बसलेल्या ‘लष्कर-ए-तोयबा’ च्या सूत्रधारांकडून निर्देश मिळत होते. सुरक्षायंत्रणा गेल्या २ महिन्यांपासून शब्बीरच्या हालचालींवर लक्ष ठेवून होत्या. शब्बीर अहमद लोनला यापूर्वी वर्ष २००७ मध्ये देहली पोलिसांनी आतंकवादाच्या आरोपाखाली अटक केली होती. वर्ष २०१९ मध्ये जामीन मिळाल्यानंतर तो बांगलादेशात पळून गेला होता. (हे सुरक्षायंत्रणांना लज्जास्पद ! हा आतंकवादी देशातून पळून जाईपर्यंत सुरक्षायंत्रणा काय करत होत्या ? – संपादक)
संपादकीय भूमिकाभारतातील आतंकवाद संपवण्यासाठी आतंकवाद्यांसह त्यांना साहाय्य करणार्यांनाही फाशीची शिक्षा झाली पाहिजे ! |
राज्यातील पोलीस ठाण्यांच्या आवारात महिला समुपदेशन केंद्रे स्थापन करणार !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक
Suhail Arrested : श्रीराममंदिर बाँबने उडवून देण्याचा कट रचणार्या सुहेल याला कर्नाटकमधून अटक
‘लव्ह जिहाद’च्या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राच्या प्रकरणी १४ जणांविरुद्ध दोषारोपपत्र सादर !
डेन्मार्क सरकार रस्त्यावर नमाजपठण आणि अजान यांवर बंदी घालण्याच्या विचारात !
धर्म लपवून विवाह केल्याने तो अवैध ठरला, तरी पीडितेला पोटगी मिळण्याचा अधिकार ! : Madhya Pradesh High Court