गरीब आणि विकसनशील देश यांच्यावर सर्वांत वाईट परिणाम

वॉशिंग्टन (अमेरिका) – ‘नेचर जर्नल’मध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार ‘ग्लोबल वॉर्मिंग’शी संबंधित आर्थिक परिणामांमध्ये अमेरिका सर्वांत मोठा भागीदार आहे. अमेरिकेच्या कार्बन उत्सर्जनामुळे वर्ष १९९० पासून जगाला अनुमाने १० ट्रिलियन डॉलरची अर्थात् ८३० लाख कोटी रुपयांची आर्थिक हानी झाली आहे. या हानीचा सर्वांत मोठा भार गरीब आणि विकसनशील देश यांच्यावर पडला आहे. भारताला अनुमाने ५०० अब्ज डॉलरची, म्हणजे ४१ लाख ५० सहस्र कोटी रुपयांची, तर ब्राझिलला अनुमाने ३३० अब्ज डॉलरची (२७ लाख ३९ सहस्र कोटी रुपयांची) हानी सोसावी लागली आहे.
शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, वाढत्या तापमानामुळे उत्पादकता, आरोग्य आणि आर्थिक विकास यांच्यावर परिणाम झाला आहे. यामुळे अनेक देशांची वाढ मंदावली आहे. तथापि या हानीचा काही भाग अमेरिकेने स्वतःही सोसला आहे; परंतु एकूण परिणामांच्या तुलनेत तो अल्प आहे.
संपादकीय भूमिका
|
संपादकीय : क्रिकेट आणि ‘हायब्रिड’ युद्ध !
‘इंडो-पॅसिफिक’ : २१ व्या शतकातील भारताच्या सुरक्षेचा नवा महामार्ग !
कर्णावती (गुजरात) बाँबस्फोट प्रकरणाच्या खटल्याचा निकाल : भारतीय राज्याच्या उत्क्रांतीतील एक धोरणात्मक मैलाचा दगड !
अमेरिकेत ख्रिस्त्याकडून धर्म विचारून भारतीय वंशाच्या मुसलमानावर चाकूने आक्रमण
(म्हणे) ‘पीओपीच्या मूर्तींमुळे प्रदूषण होत असल्याने त्यावर बंदी आणावी !’
Maharashtra Hostel Scam : बनावट पटसंख्या दाखवून वसतीगृहांच्या नावे कोट्यवधी रुपयांचे अनुदान लाटले !