Jharkhand Ram Navami Violence : गढवा (झारखंड) – श्रीरामनवमीच्या दिवशी मुसलमानांकडून पोलिसांवर दगडफेक

महावीर ध्वज लावण्यास विरोध

गढवा (झारखंड) – गढवा जिल्ह्यातील रमकंडा प्रखंड मुख्यालयात श्रीरामनवमीपूर्वी चालू झालेल्या वादाचे २६ मार्च या दिवशी हिंसक संघर्षात रूपांतर झाले. धार्मिक मिरवणुकीचा मार्ग, ध्वनीव्यवस्था आणि महावीर ध्वज लावणे, या सूत्रांना मुसलमानांनी तीव्र विरोध केला. या वेळी त्यांच्याकडून दगडफेक करण्यात आली. यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. सध्या येथे तणावपूर्ण शांतता असून संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

महावीर ध्वज लावण्यास अडथळा !

२५ मार्च च्या संध्याकाळी रमकंडा येथील कौआखोह शिव चबुतर्‍याजवळ महावीर ध्वज लावण्यासाठी जाणार्‍या रामभक्तांना मुसलमानांनी त्रिवेणी चौकाजवळ अडवले. त्यानंतर भोंगे लावण्यावरूनही वाद निर्माण झाला. त्याच वेळी घोषणाबाजी करण्यात आली आणि वातावरण तणावपूर्ण बनले. क्षणातच परिस्थिती बिघडली आणि दोन्ही बाजू समोरासमोर आल्या; मात्र परिस्थितीवर पोलिसांनी नियंत्रण मिळवले.

२६ मार्चला मुसलमान मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून दगडफेक करू लागले. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि बाजारातील दुकाने बंद झाली. मुसलमानांनी पोलिसांवरही दगडफेक केली. त्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली. अंततः पोलिसांच्या संरक्षणात रामभक्तांनी कौआखोह शिव चबुतर्‍याजवळ महावीर ध्वज लावला.

शांतता बैठकीनंतरही तणाव !

श्रीरामनवमीच्या पार्श्वभूमीवर पोलीस ठाण्यात आयोजित शांतता समितीच्या बैठकीनंतरही वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न झाल्याचे सांगितले जाते. बैठकीत दोन्ही बाजूंनी श्रीरामनवमी आणि रमझान शांततेत साजरे करण्यास सहमती दर्शवली होती. तथापि श्रीरामनवमीच्या दिवशी मुसलमानांनकडून वाद निर्माण करून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. (याचा अर्थ शांतता समितीच्या बैठकांना मुसलमान केवळ नावासाठी उपस्थित रहातात. त्यांना हिंदूंवर आक्रमण करायचे असते, जे ते नंतर करतातच ! – संपादक)

संपादकीय भूमिका

महावीर ध्वज लावू न द्यायला हा पाकिस्तान आहे का ? मुसलमानांना पाकिस्तान देण्यात आला असतांनाही ते येथे राहिले आणि आता ते भारतावरही नियंत्रण ठेवू इच्छित आहेत. हे पहाता आता हिंदूंनी त्यांना पाकिस्तानात चालते होण्यास सांगण्याची वेळ आली आहे !