‘प्रभु श्रीरामाला एकाच रूपात बद्ध करता येत नाही. प्रभु श्रीरामाचे व्यक्तीमत्त्व इतके विशाल होते की, ते एकाच वेळी अनेक रूपांमध्ये प्रगट होऊन अनेक प्रकारच्या दैवी लीला करत होते. श्रीरामनवमीच्या औचित्याने आपण श्रीरामाच्या विविध दैवी रूपांचे भावस्मरण करूया.

१. प्रभु श्रीरामाचे रूप, त्याची कार्यरत शक्ती आणि त्याच्या विशिष्ट रूपांची काही उदाहरणे !

२. प्रभु श्रीरामाच्या विविध रूपांकडे पाहिल्यावर रामभक्तांचे जागृत होणारे गुण, भाव आणि भक्ती

प्रभु श्रीराम आणि शबरी यांचे भावचित्र रेखाटत असतांना साधिकेला आलेली अनुभूती

प्रभु श्रीरामाचे दर्शन घडले,
शबरीचे जीवन धन्य झाले !
शबरीची उष्टी बोरे खाऊन ।
धन्य झाले श्रीमन्नारायण ।।
भावभक्तीचा मधुर रस ।
अमृताहून असे सरस ।।
पाहुनी प्रभु श्रीराम ।
शबरीमातेने केला प्रणाम ।।
भक्त आणि भगवंत यांची भेट झाली ।
शबरीमाता भवसागर तरून गेली ।।
प्रभु श्रीरामाचे दर्शन घडले ।
शबरीचे जीवन धन्य धन्य झाले ।।
‘प्रभु श्रीराम लक्ष्मणासह शबरीमातेच्या आश्रमात जाऊन तिची उष्टी बोरे खात आहेत’, हे भावचित्र वर्ष २०१३ मध्ये रेखाटत असतांना माझ्या मनात शबरीमातेप्रमाणे समर्पितभाव आणि शरणागतभाव जागृत झाला. त्यानंतर माझ्या डोळ्यांसमोर ते भावस्पर्शी दृश्य उभे राहिले आणि माझ्याकडून अनायास हे भावचित्र रेखाटले गेले. हे चित्र रेखाटत असतांना प्रभु श्रीरामाचे हे भक्तवत्सल आणि करुणामय रूप पाहून माझ्या डोळ्यांतून कृतज्ञताभावाचे अश्रू वाहू लागले.
– सुश्री मधुरा भोसले
३. गोव्यातील दक्षिण भागात वसलेल्या ‘श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठ संकुला’त श्रीरामाच्या ७७ फूट उंच कांस्य पुतळ्याची स्थापना होणे


गोव्यातील दक्षिण भागात वसलेल्या ‘श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठ संकुला’त श्रीरामाच्या ७७ फूट उंच कांस्य पुतळ्याची स्थापना करण्यात आली. ही श्रीरामाची जगातील सर्वांत उंच मूर्ती आहे. ही मूर्ती देवशिल्पी विश्वकर्म्याने प्रसिद्ध मूर्तीकार श्री. राम सुतार यांच्या माध्यमातून घडवली. या मूर्तीचे अनावरण भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते २८ नोव्हेंबर २०२५ या दिवशी पर्तगाळी येथे झाले. ही मूर्ती इतकी विशाल आणि सुंदर आहे की, ती पहात असतांना साक्षात् प्रभु श्रीरामाच्या विराट रूपाचे दर्शन होते अन् त्याच्या प्रतीचा भाव जागृत होतो, तसेच प्रभुचरणी आपोआप नतमस्तक व्हायला होऊन डोळ्यांतून भावाश्रूंच्या धारा वाहू लागतात.
– सुश्री मधुरा भोसले (सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्ती साधिका, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा दिनांक : ६.३.२०२५, वेळ : सकाळी ९ ते ९.३० आणि कालावधी : अर्धा घंटा)
|
बिदर (कर्नाटक) : महाहिंदु मेळाव्याला अनुमती मिळताच समाजकंटकांकडून श्रीरामाचा अवमान !
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात पीडित धर्मांध मुलांना प्रत्येकी १० लाख रुपये हानीभरपाई देण्याचा मद्रास उच्च न्यायालयाचा आदेश !
‘श्री समर्थ रामदास – एक अभ्यास’ ग्रंथ : अभ्यासपूर्ण मननीय, चिंतनीय आणि संदर्भ ग्रंथ
सिनेमा आणि स्वतःची स्वप्ने : यशाविषयी सिनेमा काय प्रकट करतो ?
श्री शिवराज्याभिषेक आणि खोटे कथानक (नॅरेटिव्ह) !
सोलापूर येथील सेवाकेंद्रात गेल्यावर ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती मीना नकाते (वय ६२ वर्षे) यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !