जिहादी आतंकवाद्यांचा आदर्श असणारा झाकीर नाईक याचा जुना व्हिडिओ पुन्हा प्रसारित

नवी देहली – पंतप्रधान मोदी यांच्यामुळेच आज मला भारतात प्रत्येक जण ओळखतो. पूर्वी केवळ मुसलमानांनाच माझे विचार ठाऊक होते; पण आता मुसलमानांपेक्षा मुसलमानेतर लोक मला अधिक ओळखतात. इतकेच नव्हे, तर, अल्लाचे हेच नियोजन आहे, तो इस्लामच्या शत्रूकडूनही चांगली कामे करून घेतो. मोदी यांच्या कारवाईमुळेच माझा अधिक प्रचार झाला, असा दावा करणारा जिहादी आतंकवाद्यांचा आदर्श असणारा झाकीर नाईक याचा जुना व्हिडिओ सामाजिक माध्यमांत प्रसारित झाला आहे.
Old video of Zakir Naik, the face of radicalisation, resurfaces! 📢
He shamelessly claims PM Modi made him "famous" in India.
Often, it is only when a case is registered or charges are filed that the true face of an individual comes to light.
It was after a treason case was… pic.twitter.com/dGCdzt3kIY
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 25, 2026
भारतात गेल्यास मला कारागृहात टाकतील !
पाकिस्तानी युट्युबर नादिर अली याने झाकीर नाईकची मुलाखत घेतली. या वेळी झाकीर याला ‘तू पुन्हा भारतात जाणार का?’ असे विचारल्यावर तो म्हणाला की, भारतात जाणे फार सोपे आहे; पण तेथून परत बाहेर येणे फार कठीण आहे. जर मी गेलो, तर ते माझे ‘रेड कार्पेट’वर (लाल गालिचावर) स्वागत करतील; पण थेट कारागृहात टाकतील; कारण त्यांच्या सूचीमध्ये मी क्रमांक १ चा आतंकवादी आहे.
मोदी सरकार असेपर्यंत भारतात जाणार नाही !
झाकीर याने पुढे म्हटले की, मी भारतात जाणार नाही, असे नाही; पण जोपर्यंत मोदी सरकार आहे, तोपर्यंत जाणे धोक्याचे आहे. जेव्हा मोदी पंतप्रधान नसतील आणि नवीन सरकार येईल, तेव्हा मी निश्चितच भारतात परत जाईन.
मुसलमानेतर लोक माझ्या भाषणांमुळे प्रभावित होऊन इस्लाम स्वीकारत होते, हीच सरकारची खरी अडचण होती, असा दावाही त्याने या मुलाखतीत केला. त्याच्यावर असलेले सर्व आरोप त्याने फेटाळून लावले असून एकही आरोप सिद्ध झाला नसल्याचा दावा त्याने केला.
संपादकीय भूमिकाजोपर्यंत आरोप होत नाही किंवा गुन्हा नोंद होत नाही, तोपर्यंत जगाला व्यक्तीची माहिती होत नसते, झाकीर याच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा नोंदवल्यावर देशाला त्याची अधिक माहिती मिळाली. याचाही या आतंकवाद्याला अभिमान वाटतो, यातून तो किती निगरगट्ट आहे, हे लक्षात येते ! |
कल्याण येथे ७ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; मुसलमान अटकेत !
Obesity Among Children : युरोपीय देशांप्रमाणे भारतातील मुलांमध्ये वाढत आहे लठ्ठपणाचा धोका !
गेल्या २४ घंट्यांत उघड झाल्या लव्ह जिहादच्या ४, तर धर्मांतराच्या २ घटना !
Bangladesh Hindu Girl Murder : बांगलादेशात ८ वर्षांच्या हिंदु मुलीचे अपहरण करून हत्या !
युक्रेन-रशिया युद्धात ट्रम्प यांनी फेटाळला होता भारतीय सैनिकांना शांतता मोहिमेसाठी पाठवण्याचा प्रस्ताव !
पाकिस्तानची स्तुती करणार्या अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांवर त्यांच्याच पक्षातील खासदार भडकले !