५ महिला मिशनर्यांना अटक
(‘चंगाई सभा’ म्हणजे आजारी असणार्यांवर प्रार्थनेद्वारे उपचार करून त्यांना कथितरित्या बरे करण्यासाठी आयोजित सभा)
गुमला (झारखंड) – येथे २० मार्च या दिवशी हिंदूंचे ख्रिस्ती धर्मात धर्मांतर करू पहाणार्या ५ महिला मिशनर्यांना छरदा रोड परिसरातून अटक करण्यात आली.त्या घराघरांत जाऊन लोकांना ‘चंगाई सभे’त सहभागी होण्यासाठी प्रवृत्त करत होत्या.
१. पुग्गू आणि आजूबाजूच्या भागांतील रौमिला मिंज, किरण कुजूर, शकीरा तिर्की, सुशीलादेवी आणि इंदुदेवी या ५ महिला सिसईतील कुम्हार मोड परिसरातील घरांमध्ये चंगाई सभेची पत्रके वाटत होत्या. त्यावेळी त्या ‘आजारांपासून मुक्ती, उत्तम आरोग्य आणि चमत्कारिक लाभ मिळतील’, असे सांगून लोकांना सभेत येण्याचे आवाहन करत होत्या.
२. स्थानिकांपैकी काहींना त्यांचा हेतू लक्षात आल्यावर त्यांनी हिंदु संघटनांना याची माहिती दिली. छरदा रस्ता येथील आनंद साहू यांनी आरोप केला की, मिशनरी महिलांनी त्यांच्या घरी येऊन हिंदूंच्या देवतांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले आणि हिंदु परंपरा अन् धर्म सोडण्यासाठी दबाव आणला.
३. घटनेची माहिती मिळताच विश्व हिंदु परिषद, बजरंग दल आणि इतर संघटनांचे कार्यकर्ते घटनास्थळी पोचले आणि त्यांनी याविषयी निषेध व्यक्त केला. परिस्थिती लक्षात घेऊन सिसई पोलीस ठाण्याचे पथकाने महिला मिशनरींना जमावातून सुरक्षित बाहेर काढून पोलीस ठाण्यात नेले.
संपादकीय भूमिकाहिंदूंच्या परिस्थितीचा अपलाभ घेऊन भारतभरात होणारे त्यांचे धर्मांतर रोखण्यासाठी देशपातळीवर धर्मांतरबंदी कायदा करायला हवा ! |

घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार अटक !
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अपीलाची सुनावणी अन्य जिल्हा न्यायाधीश यांचेकडे वर्ग होणार !
देशातील ३ राज्यांत लव्ह जिहादच्या ४ घटना उघड !
तेलंगाणातील महिला तहसीलदाराची २० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त !
Ujjain Muharram : मध्यप्रदेशातील बडनगर येथे क्रेनद्वारे चारचाकी हवेत लटकवून ती स्फोटाने जाणूनबुजून उडवून दिली !
श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणात मोठ्या लोकांना सोडून दिले ! – Shankaracharya Avimukteshwaranand Saraswati