असाध्य रोग बरे करण्याचा आणि हिंदूंच्या धर्मांतराचा डाव !

सांगली, १४ मार्च (वार्ता.) – जिल्ह्यातील कवलापूर येथील विमानतळाच्या जवळ आयोजित केलेल्या ‘महाराष्ट्र प्रेयर फेस्टिव्हल-२०२६’ या ख्रिस्ती मिशनर्यांच्या कार्यक्रमात नियम आणि अटी पायदळी तुडवून, तसेच असाध्य रोग बरे करण्याचा खोटा दावा करून हिंदूंचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. या कार्यक्रमाला सकल हिंदु समाज आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या प्रखर विरोध आणि नियमांचे उल्लंघन केल्यामुळे सांगली ग्रामीण पोलिसांनी या कार्यक्रमाची अनुमती रहित केली आहे.
🚨 ‘Miracle Healing’ Event Stopped in Sangli
Police halted a Christian “Prayer Festival” of Paul Dinakaran in Sangli after allegations that the event involved claims of curing incurable diseases to influence or convert Hindus.
Devout Hindu groups alleged that such gatherings… pic.twitter.com/6J5DrU0J6B
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 14, 2026
काय आहे नेमके प्रकरण ?कवलापूर (तालुका मिरज) येथे १३ ते १५ मार्च या कालावधीत चेन्नई येथील ‘जीझस कॉल्स’ या संस्थेचे डॉ. पॉल दिनाकरन्, सॅम्युअल दिनाकरन् आणि त्यांचे अन्य सहकारी यांनी ‘महाराष्ट्र प्रेयर फेस्टिव्हल’ नावाच्या एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात कथित चमत्कार, चंगाई (रोगमुक्त होण्यासाठीची सभा) आणि प्रार्थना यांच्या माध्यमातून असाध्य रोग बरे करण्याचे दावे केले जात होते. प्रशासनाने हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी ज्या अटी आणि नियम घालून दिले होते, त्यांचे आयोजकांकडून उल्लंघन करण्यात आले. कार्यक्रमाद्वारे भोळ्याभाबड्या हिंदूंचे धर्मांतर करण्याचा डाव असल्याचे लक्षात येताच सकल हिंदु समाजासह स्थानिक हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी याविरुद्ध आवाज उठवला होता. |
कार्यक्रमात काय खोटे दावे केले ?
या सभेत हिंदूंची दिशाभूल करण्यासाठी काही व्यक्तींना व्यासपिठावर बोलावून त्यांचे ‘अनुभव’ सांगण्यास सांगितले. व्यासपिठावर आलेल्या एका व्यक्तीने ‘मला चौथ्या टप्प्याचा कर्करोग होता आणि आधुनिक वैद्यांनी ‘मी केवळ १५ दिवस जगणार’, असे सांगितले होते; ‘मात्र डॉ. पॉल दिनाकरन् यांनी प्रार्थना केल्यावर माझ्या शरिरातील ‘दुष्ट आत्मे’ निघून गेले आणि मी बरा झालो’, असे विधान केले. सुजी नावाच्या एका महिलेने, ‘डॉ. पॉल दिनाकरन् यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवताच माझे रक्ताचे आजार बरे झाले आणि अभ्यासात ‘ढ’ असूनही मला पदवी परीक्षेत ९९ टक्के गुण मिळाले’, असा दावा केला.
पोलिसांची कठोर कारवाई !

‘वैद्यकीय उपचार सोडून केवळ प्रार्थनेने दुर्धर आजार बरे होतात’, असा अपप्रचार करून समाजाची फसवणूक केल्याविषयी सांगली ग्रामीण पोलिसांनी विविध कलमांन्वये संबंधितांवर गुन्हा नोंद करून हा कार्यक्रम रहित करण्याचा आदेश दिला आहे, अशी माहिती सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बी.ए. तळेकर यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. डॉ. दिलीप भोरे, डॉ. रावसाहेब वाघमारे, वक्ते बिशप डॉ. पॉल दिनाकरन्, सम्युअल दिनाकरन् (दोघे रा. चेन्नई, तामीळनाडू) सुजी आणि आणखी एका अनोळखी व्यक्ती यांच्यावर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. (दिलीप भोरे आणि रावसाहेब वाघमारे हे बाटगे ख्रिस्ती आहेत. हे धर्मांतर करतात; मात्र त्यांची हिंदु नावे तशीच ठेवतात; कारण त्यांना हिंदु नाव धारण करून हिंदूंचे धर्मांतर करणे सोपे जाते. अशा कावेबज ख्रिस्त्यांपासून हिंदूंनी सावध रहाणे आवश्यक ! – संपादक)
अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि हमीद दाभोलकर आता कोणत्या बिळात लपले आहेत ? – माजी आमदार नितीन शिंदे

सांगली, १४ मार्च (वार्ता.) – हिंदु धर्मातील परंपरा आणि साधू-संतांविषयी सातत्याने ‘अंधश्रद्धा’ म्हणून ओरड करणारे डॉ. हमीद दाभोलकर आणि त्यांची अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) आता डॉ. पॉल दिनाकरन्च्या कार्यक्रमाच्या वेळी कोणत्या बिळात लपून बसली आहे ? असा घणाघात प्रश्न ‘हिंदु एकता आंदोलना’चे प्रदेशाध्यक्ष आणि माजी आमदार श्री. नितीन शिंदे यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. ख्रिस्ती प्रार्थनासभेच्या नावाखाली होणार्या अंधश्रद्धेच्या प्रचारावर ‘अंनिस’ने बाळगलेल्या मौनाचा त्यांनी तीव्र शब्दांत निषेध केला.

‘अंनिस’चा दुटप्पीपणा उघड !
नितीन शिंदे पुढे म्हणाले की, जेव्हा पॉल दिनाकरन्सारखे लोक सांगलीत येऊन प्रार्थनेच्या माध्यमातून असाध्य रोग बरे करण्याचे दावे करतात आणि अंधश्रद्धेला खतपाणी घालतात, तेव्हा ‘अंनिस’चे जिल्ह्यातील पदाधिकारी कुठे गायब होतात ? डॉ. हमीद दाभोलकर यांना हे थोतांड दिसत नाही का ? केवळ हिंदूंना लक्ष्य करणार्या या टोळीचा खरा चेहरा आता जनतेसमोर आला आहे. महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू असतांना सांगलीमध्ये अशा प्रकारचा वादग्रस्त कार्यक्रम आयोजित केला जाणे, ही गंभीर गोष्ट आहे. अशा कार्यक्रमांना प्रशासनाने अनुमतीच द्यायला नको होती. महाराष्ट्र जादूटोणाविरोधी कायद्याचे उल्लंघन करणार्या या कार्यक्रमावर सरकारने कठोर कारवाई करायला हवी.
संपादकीय भूमिका
|
इस्लामिक स्टेटला साहाय्य करणारा राकिब अंसारी याला ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा
Puri Rath Yatra : पुरी येथील जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेला प्रारंभ !
बनावट पटसंख्या दाखवून वसतीगृहांच्या नावे कोट्यवधी रुपयांचे अनुदान लाटले !
Telangana School Kalma Controversy : भाग्यनगर (तेलंगाणा) येथे हिंदु विद्यार्थ्याला गृहपाठात ‘कलमा’ पाठ करण्यास सांगणार्या शिक्षिकेला शाळेने नोकरीवरून काढले !
Rajasthan Jail Marriage : राजस्थानच्या कारागृहात जन्मठेपाची शिक्षा भोगणार्या बंदीवानांचा २२ जुलैला होणार विवाह !
शारीरिक संबंध ठेवतांना ती फसवणूक किंवा ब्लॅकमेल असल्यास तो ‘बलात्कार’ मानला जाईल ! – Madras High Court