दोन्ही देशांत एकमेकांना युद्धकाळात साहाय्य करण्याचा झाला आहे करार !

नवी देहली – पाकिस्तान आणि सौदी अरेबिया यांनी काही महिन्यांपूर्वी एकमेकांना युद्धात साहाय्य करण्याचा करार केला होता. ‘सौदी अरेबियाच्या संरक्षणासाठी पाकचे अणूबाँब सिद्ध असतील’, अशा आशयाची वक्तव्ये पाकिस्तानी नेत्यांनी केली होती. तसेच ‘सौदी अरेबियाही पाकिस्तानच्या साहाय्याला धावेल’, असेही हे नेते म्हणत होते. आता इराणकडून सौदी अरेबियावर सातत्याने होत असलेल्या आक्रमणांच्या पार्श्वभूमीवर सौदी अरेबियाने ‘करारानुसार पाकिस्तानने साहाय्य करावे, सैन्य आणि सैनिकी यंत्रणा पाठवावी’, अशी मागणी केली. या आक्रमणांच्या पार्श्वभूमीवर पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि सैन्यदलप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी सौदी अरेबियाची राजधानी रियाधमध्ये सौदीचे राजकुमार महंमद बिन सलमान यांची भेट घेतली.
🚨 Middle East Tensions Escalate
🇸🇦 Saudi Arabia pressures Pakistan for military support – both nations have a pact to assist each other in wartime.
🇮🇷 Iran warns Pakistan to stay away from the conflict.
🇺🇸 Donald Trump says Ayatollah Mojtaba Khamenei may still be alive.
🚢… https://t.co/F4Fulmcypq pic.twitter.com/sLtFMXr4es
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 14, 2026
युद्धापासून दूर रहाण्यासाठी इराणने पाकला दिली आहे चेतावणी !
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सौदी अरेबिया आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये ‘स्ट्रॅटेजिक म्युच्युअल डिफेन्स एग्रीमेंट’ झाले होते. या करारानुसार सौदी अरेबियावर झालेले आक्रमण, हे पाकिस्तानवर झालेले आक्रमण मानले जाईल. या करारानुसार पाकिस्तानने आता त्याची सैनिकी शक्ती सौदी अरेबियासाठी वापरावी, अशी मागणी करण्यात आली आहे. दुसरीकडे पाकिस्तान या युद्धात पडण्यास कचरत आहे. इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियन यांनी पाकिस्तानला या युद्धापासून लांब राहण्याची स्पष्ट चेतावणी दिली आहे. पाकिस्तान सध्या इराण आणि सौदी अरेबिया यांच्यात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत आहे; मात्र सौदी अरेबियाच्या दबावामुळे पाकिस्तानची मोठी कोंडी झाली आहे.
इराणींना मारणे, हा माझ्यासाठी मोठा सन्मान ! – डॉनल्ड ट्रम्प
आमच्याकडे अफाट शक्ती, अमर्याद दारुगोळा आणि भरपूर वेळ आहे. आज या नीच लोकांचे काय होते ?, ते केवळ पहा. त्यांनी ४७ वर्षांपासून जगभरातील निर्दोष लोकांना मारले आहे आणि आता मी अमेरिकेचा ४७ वा राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांना संपवत आहे. हे करणे हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे, असे विधान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी केले.
ट्रम्प यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, आम्ही इराणची आतंकवादी राजवट सैनिकी, आर्थिक आणि इतर सर्व मार्ग यांद्वारे पूर्णपणे नष्ट करत आहोत; पण जर तुम्ही ‘न्यूयॉर्क टाइम्स’ वृत्तपत्र वाचले, तर तुम्हाला चुकीचे वाटू शकते की, आम्ही जिंकत नाही आहोत. इराणचे नौदल संपले आहे. त्यांची वायुसेना आता उरलेली नाही. त्यांची क्षेपणास्त्रे, ड्रोन्स आणि इतर सर्व काही उद्ध्वस्त होत आहे, तसेच त्यांचे नेते या पृथ्वीवरून पूर्णपणे संपवले गेले आहेत, असा दावा ट्रम्प यांनी केला.
हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून नौका नेल्या पाहिजेत ! – ट्रम्प यांचे आवाहन
ट्रम्प यांनी आवाहन केले आहे की, सर्व संबंधित देशांनी हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून नौका नेल्या पाहिजेत. थोडे धाडस दाखवले पाहिजे. यामध्ये घाबरण्यासारखे काहीही नाही. इराणकडे कोणतेही नौदल उरलेले नाही. त्यांच्या सर्व युद्धनौका बुडवल्या आहेत.
दुसरीकडे ‘इंटरनॅशनल मेरीटाईम ऑर्गनायझेशन’ने १८ आणि १९ मार्च या दिवशी लंडनमध्ये नौकांच्या सुरक्षेवर चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली आहे.
अयातुल्ला मोजतबा खामेनी कदाचित् जिवंत आहेत ! – ट्रम्प

दूरचित्रवाहिणीवरील एका कार्यक्रमात ट्रम्प म्हणाले की, मला वाटते की, अयातुल्ला मोजतबा खामेनी (अयातुल्ला यांचे पुत्र आणि नवीन सर्वाेच्च धार्मिक प्रमुख) हे कदाचित् जिवंत आहेत. मला वाटते की, ते घायाळ झाले आहेत; पण ते कुठल्यातरी अवस्थेत जिवंत आहेत.
मोजतबा खामेनी कोमात असल्याचा दावा !
इराणचे नवे सर्वोच्च नेते अयातुल्ला मोजतबा खामेनी आक्रमणात गंभीररित्या घायाळ झाले असून ते कोमात आहेत, असे वृत्त अनेक माध्यमांनी प्रसिद्ध केले आहे. ब्रिटीश दैनिक ‘द सन’च्या वृत्तानुसार आक्रमणात घायाळ झाल्यानंतर मोजतबा यांना तेहरानमधील ‘सिना युनिव्हर्सिटी’ रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. त्यांची दुखापत इतकी खोल होती की, त्यांचा एक पाय कापावा लागला. त्यांच्या यकृतालाही गंभीर हानी झाली आहे.
अमेरिकी तळांवर आक्रमणे चालूच रहातील ! – इराण
इराणचे नवे सर्वोच्च धार्मिक नेते अयातुल्ला मोजतबा खामेनी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी प्रथमच निवेदन प्रसिद्ध केले. त्यात त्यांनी अमेरिकेला मध्यपूर्वेतील अमेरिकी सैनिकी तळ बंद करवीत अन्यथा त्यांच्यावर आक्रमणे चालूच रहातील, अशी चेतावणी दिली. तसेच इराणवरील आक्रमणांसाठी अमेरिकेला भरपाई द्यावी लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. सध्याच्या परिस्थितीत हॉर्मुझची सामुद्रधुनी उघडली जाणार नाही, असेही खामेनी यांनी स्पष्ट केले.
आता आखातातील बँकांवर आक्रमण करणार ! – इराणची धमकी
इराणी सैन्याने म्हटले आहे की, ‘आता आम्ही अमेरिका आणि इस्रायल यांच्या बँकांना लक्ष्य करणार आहोत. लोकांनी बँकांच्या एक किलोमीटर परिघापासून दूर रहावे.’ यामुळे स्टँडर्ड चार्टर्ड आणि गोल्डमन सॅक्स या बँकांनी कर्मचार्यांना घरून काम करण्यास सांगितले. सिटीबँकेने संयुक्त अरब अमिरातीमधील अनेक शाखा बंद केल्या आणि एच्एस्बीसी बँकेने कतारमधील सर्व शाखा तात्पुरत्या बंद केल्या. गेल्या आठवड्यात इराणने आखाती प्रदेशातील पाश्चात्त्य आस्थापनांच्या ‘डेटा सेंटर्स’ना लक्ष्य केले होते.
हवेत दुसर्या विमानात इंधन भरणारे अमेरिकेचे विमान कोसळले !
हवेत दुसर्या विमानात इंधन भरणार्या अमेरिकेच्या एका विमानाचा इराकमध्ये अपघात झाला आहे. अमेरिकेच्या ‘सेंट्रल कमांड’ने याची माहिती दिली आहे. अमेरिकेचे ‘केसी-१३५’ हे ‘रिफ्यूलिंग’ करणारे विमान कोसळले आहे. या विमानात ५ जण होते.
पंतप्रधान मोदी यांनी इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी केली दूरभाषवर चर्चा !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणचे राष्ट्राध्यक्ष डॉ. मसूद पेझेश्कियान यांच्याशी दूरभाषवरून चर्चा केली. या संभाषणादरम्यान पंतप्रधानांनी मध्यपूर्वेतील परिस्थितीवर चर्चा केली. मोदी यांनी सांगितले की, भारतीय नागरिकांची सुरक्षा आणि वस्तू अन् ऊर्जा यांची अखंड वाहतूक ही सध्याच्या परिस्थितीत भारताची सर्वोच्च प्राथमिकता आहे.
पंतप्रधानांनी शांतता आणि स्थिरता यांसाठी भारताच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करत सर्व पक्षांना संवादाद्वारे या समस्येवर तोडगा काढण्याचे आवाहन केले.
गेल्या काही दिवसांत भारत आणि इराण यांच्या परराष्ट्रमंत्र्यांमध्ये ३ चर्चा झाल्या आहेत.
एल्पीजी सिलिंडर बुकिंगचे नवे नियम : ग्रामीण भागांत ४५ दिवसानंतर बुकिंग !
एल्पीजी सिलिंडरचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी केंद्र सरकारने बुकिंगमधील अंतर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागात सिलिंडर पुरवठ्याचे नियोजन करण्यासाठी दोन बुकिंगमधील अंतर २० दिवसांवरून थेट ४५ दिवस करण्यात आले आहे.
‘इंडक्शन’च्या विक्रीत विक्रमी वाढ !
गॅस सिलिंडरच्या टंचाईमुळे लोकांनी आता ‘इलेक्ट्रिक इंडक्शन कुकटॉप’कडे (विद्युत्चुंबकीय प्रक्रियेद्वारे थेट भांडे गरम करण्याची पद्धत) मोर्चा वळवला आहे. ‘ॲमेझॉन’वर (ऑनलाईन साहित्य विक्री करणारे संकेतस्थळ) सामान्यतः एका महिन्यात १ लाख ८० सहस्र इंडक्शन विकले जातात; मात्र आता एकाच दिवसात १ लाख ३४ सहस्र इंडक्शनची विक्री झाली आहे. गेल्या ४ दिवसांत एकूण ५ लाख इंडक्शनची विक्री झाली असून १०० पैकी ७० आस्थापनांचा साठा संपला आहे. अनेक ठिकाणी इंडक्शनच्या किमती दुपटीने वाढल्या आहेत.

Dominican Republic Plane Crash : ‘डोमिनिकन रिपब्लिक’मध्ये जेट कोसळले : वैमानिक आणि सह-वैमानिक ठार !
PM Modi Record : पंतप्रधान मोदी सर्वाधिक काळ सरकारप्रमुख राहिलेले नेते बनले !
Iran Israel War : इराण-इस्रायल यांच्यात पुन्हा उडाला युद्धाचा भडका !
Philippines Earthquake : फिलिपीन्समध्ये ७.८ रिक्टर तीव्रतेचा भूकंप : १९ जणांचा मृत्यू !
Singapore Blocks Media : भारतियांना अपकीर्त करण्याची चिनी नागरिकांची ऑनलाईन मोहीम सिंगापूर सरकारकडून उघड
Bangladeshis At Hakimpur : हकीमपूर (बंगाल) येथील सीमेवर प्रतिदिन २०० ते ३०० बांगलादेशी परत जाण्यासाठी पोचत आहेत !