हिंदु तरुणांनी मौलवीवर आक्रमण केल्याचा फुकाचा आरोप
बीदर (कर्नाटक) – जिल्ह्यातील ऐतिहासिक नगरी बसवकल्याणमध्ये मुसलमान मौलवीवर हिंदु तरुणांनी कथित आक्रमण केल्याचा आरोप करत सहस्रावधी मुसलमानांनी बसवकल्याण शहर पोलीस ठाण्याला वेढा घातला. ‘मौलवीवर (इस्लामच्या धार्मिक नेत्यावर) आक्रमण करणार्या हिंदूंना तात्काळ आमच्या कह्यात द्या’, अशी मागणी करत जमावाने ठाण्यासमोर प्रचंड गोंधळ घातला. सहस्रावधी मुसलमानांनी अचानक ठाण्यावर आक्रमण केले. या वेळी पोलीस आणि जमाव यांच्यात तीव्र शाब्दिक चकमक झाली. या संघर्षाच्या वेळी जमावाने ठाण्यातील साहित्याची तोडफोड केली. जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.
Bidar, Karnataka: Muslim mob storms a police station and vandalises property over baseless claims that a Hindu youth attacked a Maulvi.
Such mob behaviour inside a police station shows a worrying trend; fear of law enforcement seems to be fading. 🚨pic.twitter.com/gQfEg7FjwS
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 6, 2026
या घटनेचे गांभीर्य ओळखून उत्तर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक आणि बीदर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी तात्काळ बसवकल्याणला पोचले. शहरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलीस ठाण्यात घुसून सरकारी मालमत्तेची हानी केल्याविषयी पोलिसांनी एकूण ४९ मुसलमान तरुणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे.
संपादकीय भूमिकापोलीस ठाण्यात घुसून तेथे तोडफोड करणार्या मुसलमानांची झुंडशाही ! त्यांना पोलिसांचा जराही भय न उरल्याचे हे द्योतक आहे ! |

(म्हणे) ‘हिंदी आणि उर्दू भारताच्या भाषा, तर संस्कृत बाहेरून आली !’ – Congress MP Mohammad Javed
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
संपादकीय : क्रिकेट आणि ‘हायब्रिड’ युद्ध !
गोव्यात ४० सहस्र रोहिंग्या आणि बांगलादेशी नागरिक !
अमेरिकेत ख्रिस्त्याकडून धर्म विचारून भारतीय वंशाच्या मुसलमानावर चाकूने आक्रमण
सावंतवाडीमध्ये ख्रिस्ती धर्माची शिकवण देणारे मिशनरी पोलिसांच्या कह्यात !