नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावावर चर्चा, विरोधी पक्षांकडून भाजपवर टीका

पाटलीपुत्र (बिहार) – तब्बल २० वर्षे बिहारचे मुख्यमंत्री राहिलेले नितीश कुमार आता राज्यसभेत जाणार आहेत. त्यांनी यासंदर्भात ५ मार्चच्या दुपारी ‘एक्स’वर माहिती देऊन घोषणा केली. तसेच यासाठी त्यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा अर्जही भरला आहे.
Bihar CM #NitishKumar set to move to the Rajya Sabha.
Discussions are underway on who will be the next Chief Minister of Bihar. Meanwhile, the Opposition has started targeting the BJP over the development.
“My support and guidance will remain with the new government in Bihar,”… pic.twitter.com/0tSGePic10
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 5, 2026
अर्ज भरतांना कुमार यांच्यासमवेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे नवनिर्वाचित अध्यक्ष नितीन नबीन उपस्थित होते. नितीश कुमार यांच्या या निर्णयावरून बिहारचे नवे मुख्यमंत्री कोण असणार, यावर चर्चा चालू झाली आहे. विरोधी पक्ष भाजपवर टीका करत असून बिहारमध्ये भाजप महाराष्ट्रासारखे राजकारण खेळत आहे, असे आरोप होत आहेत.
पिछले दो दशक से भी अधिक समय से आपने अपना विश्वास एवं समर्थन मेरे साथ लगातार बनाए रखा है, तथा उसी के बल पर हमने बिहार की और आप सब लोगों की पूरी निष्ठा से सेवा की है। आपके विश्वास और समर्थन की ही ताकत थी कि बिहार आज विकास और सम्मान का नया आयाम प्रस्तुत कर रहा है। इसके लिए पूर्व में…
— Nitish Kumar (@NitishKumar) March 5, 2026
बिहारमधील नव्या सरकारला माझा पाठिंबा आणि मार्गदर्शन रहाणार ! – नितीश कुमार
नितीश कुमार यांनी स्वत:ची भूमिका मांडतांना म्हटले की, गेल्या २ दशकांपासून बिहारच्या जनतेने माझ्यावर विश्वास ठेवला. याच बळावर आम्ही बिहारची सेवा केली. जनतेचा विश्वास आणि समर्थन यांमुळेच बिहार आज विकासाच्या वाटेवर आहे. संसदीय कारकीर्दीच्या आरंभीपासून माझ्या मनात इच्छा होती की, बिहारच्या विधानमंडळातील दोन्ही सभागृहांमध्ये, तसेच संसदेतील दोन्ही सदनांचा सदस्य व्हावे. त्यामुळेच यंदा होत असलेल्या राज्यसभा निवडणुकीसाठी मी अर्ज सादर करत आहे. बिहारमध्ये जे नवीन सरकार स्थापन होईल, त्याला माझा पाठिंबा आणि मार्गदर्शन असेल.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अपीलाची सुनावणी अन्य जिल्हा न्यायाधीश यांचेकडे वर्ग होणार !
देशातील ३ राज्यांत लव्ह जिहादच्या ४ घटना उघड !
तेलंगाणातील महिला तहसीलदाराची २० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त !
Ujjain Muharram : मध्यप्रदेशातील बडनगर येथे क्रेनद्वारे चारचाकी हवेत लटकवून ती स्फोटाने जाणूनबुजून उडवून दिली !
श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणात मोठ्या लोकांना सोडून दिले ! – Shankaracharya Avimukteshwaranand Saraswati
NCERT : पुस्तकात वैदिक काळात महिलांना सन्मान मिळत असल्याचे सांगत मनुस्मृतीतील श्लोकाचा उल्लेख !