बंगाल राज्य भीतीच्या मनोविकाराच्या विविध स्तरांमधून जात आहे. सत्ताधारी पक्ष आणि त्याचे नेतृत्व राजकीय रणनीती म्हणून काही भीती प्रदर्शित करतात, तर काही लोकांच्या मनात रुजवत आहेत.

१. अंमलबजावणी संचालनालयाच्या छाप्यात राज्य सरकारने हस्तक्षेप करणे गंभीर !
बंगालमध्ये आणखी एक नाट्य घडले, ज्यामध्ये ममता बॅनर्जी यांनी राज्य पोलीस दलासह कोलकाता येथील भारतीय राजकीय कृती समितीच्या (आयपीएसी) कार्यालयावरील अंमलबजावणी संचालनालयाच्या छाप्यामध्ये अडथळा आणला. हे त्यांच्या राजकीय भीतीचे चित्रण होते.

बंगाली विरुद्ध बाहरी (बाहेरील) आणि केंद्र सरकारचा बंगाली लोकांवरील अन्याय, हे तृणमूल काँग्रेसचे (‘टी.एम्.सी.’चे) जुने कथानक आहे. जरी ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्री म्हणून नव्हे, तर तृणमूल काँग्रेसच्या नेत्या म्हणून काम केले, असे सांगून आपल्या कृतीचे समर्थन केले असले, तरी राज्ययंत्रणा ज्याप्रकारे त्यांच्या पाठीशी होती, ते पहाता या दाव्याचे समर्थन होत नाही.
भारतीय निवडणूक आयोगाला सातत्याने लक्ष्य करणे आणि विशेष सखोल पुनरावलोकनाद्वारे (एस्.आय.आर्.) मतदारसूची स्वच्छ करण्याची प्रक्रिया ही भीतीपेक्षा केंद्र सरकारविरुद्धची रणनीती उघड करते. अंमलबजावणी संचालनालयाविरुद्धच्या प्रथमदर्शी अहवालावरील सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीमध्ये ‘हस्तक्षेप आणि अडथळा’ हे ‘अत्यंत गंभीर सूत्र’ असल्याचे स्पष्टपणे म्हटले आहे. ममता बॅनर्जी यांची भीती किती खरी आहे, हे केवळ न्यायालयीन छाननीच सांगेल.
अनेक आक्रमणे झाली; पण हिंदू संघटित झालेच नाहीत !

‘आम्ही हिंदु अनेक छोटे समुदाय, अनेक अडथळे आणि प्रांतीयवाद यांमध्ये विभागलेले आहोत. या सर्व अडथळ्यांवर मात करून कोण प्रतिसाद देईल ? आम्हाला अनेक धोक्यांचा सामना करावा लागला; परंतु आम्ही कधीही एकजूट होऊ शकलो नाही. जेव्हा महंमद घोरीने बाहेरून पहिले आक्रमण केले, तेव्हा त्या आसन्न धोक्याच्या दिवसांतही हिंदू एकजूट होऊ शकले नाहीत. जेव्हा मुसलमानांनी एकामागून एक मंदिरे पाडायला प्रारंभ केला आणि देवीदेवतांच्या मूर्ती फोडायला प्रारंभ केला, तेव्हा हिंदू छोट्या तुकड्यांमध्ये लढले अन् मरण पावले; परंतु ते एकत्र येऊ शकले नाहीत. आमच्या मतभेदांमुळे आम्ही वेगवेगळ्या युगात मारले गेल्याची नोंद करण्यात आली आहे. दुर्बलता पापाला आश्रय देते. म्हणून जर मुसलमानांनी आम्हाला मारहाण केली आणि आम्ही हिंदूंनी हे प्रतिकार न करता सहन केले, तर आपल्याला कळेल की, हे केवळ आपल्या कमकुवतपणामुळेच शक्य झाले आहे. आपल्यासाठी आणि आपल्या शेजारील मुसलमानांसाठीही आपल्याला आपली कमजोरी सोडून द्यावी लागेल.’
– गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूर
२. तृणमूल काँग्रेसच्या भीतीने ‘एस्.आय.आर्.’ला मतदारांचा उघडपणे पाठिंबा नाही !
तथापि वर्ष २०२१ च्या विधानसभा निवडणुकीपासून साप्ताहिक ‘ऑर्गनायझर’ बंगालमधील प्रत्यक्ष परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याने सामान्य लोकांच्या मनात असलेली भीती खरी आहे. तृणमूल काँग्रेसने तिच्या राजकीय यंत्रणेद्वारे मतदारांमध्ये इतकी भीती निर्माण केली आहे की, ते विशेष सखोल पुनरावलोकनाला उघडपणे पाठिंबा दर्शवू शकत नाहीत. सत्ताधारी व्यवस्थेला पाठिंबा न देणार्या लोकांच्या कुटुंबांना, विशेषतः महिलांना ज्याप्रकारे लक्ष्य करण्यात आले, ते अजूनही लोकांच्या स्मरणात ताजे आहे. कायदा आणि सुव्यवस्था यांविरुद्धचा रोष स्पष्ट आहे अन् संपूर्ण राज्य यंत्रणेत भ्रष्टाचार राज्यभर पसरला आहे. ते धाडीविषयी छायाचित्रक समोर नसतांना बोलतील.
बंगालमधील लोकशाही वाचवण्यासाठी हिंदूंची एकता आणि प्रतिकार हाच एकमेव उपाय !

लोकशाहीत बाह्य शक्तींपासून अलिप्त असलेले निर्भय वातावरण ही मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका घेण्यासाठी पूर्वअट असते. गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूर यांनी म्हटल्याप्रमाणे ‘जर कमकुवतपणा जपला गेला आणि त्याला अस्तित्वात राहू दिले गेले, तर छळ आपोआप येतो, तो कुणीही थांबवू शकत नाही.’ भीती आणि एकतेच्या अभावामुळे असा कमकुवतपणा निर्माण होतो. बंगालमधील लोकशाही वाचवण्यासाठी हिंदूंची एकता आणि प्रतिकार हाच एकमेव उपाय आहे अन् हा राजकीय विचारांच्या पलीकडे आहे. अन्यायाविरुद्ध संयुक्त प्रतिकाराद्वारे लोकांना आत्मविश्वास देणे, हा एकमेव मार्ग आहे, ज्यामुळे हे सभ्यतेचे युद्ध लढले जाऊ शकते आणि जिंकले जाऊ शकते.
– प्रफुल्ल केतकर
बंगालमध्ये होत असलेली खरी मतचोरी, अवैध स्थलांतर आणि राज्य यंत्रणा ज्याप्रकारे त्यांना सुविधा देत आहे, ती पहाता तेथे लोकशाही वाचवण्यासाठी विशेष सखोल पुनरावलोकन का आवश्यक आहे ? याविषयी ते बोलत आहेत. बांगलादेशातील धोकादायक प्रवृत्तीनंतर बंगालच्या चिंतेमुळे हिंदूंमध्ये असुरक्षितता वाढली आहे. होय, भीती आणि दुःख इतके पसरले आहे की, कुणीही त्यांच्याविषयी उघडपणे बोलण्यास सिद्ध नाही. मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका जनतेला मतांच्या माध्यमातून मौन बाळगण्याची मुभा देतील का ? उर्वरित भारतासाठी ही खरी चिंता आहे.
– प्रफुल्ल केतकर, संपादक, साप्ताहिक ‘ऑर्गनायझर’
(साभार : साप्ताहिक ‘ऑर्गनायझर’)
संपादकीय भूमिकाबंगालमधील लोकशाही वाचवण्यासाठी हिंदूंनी संघटित होणे आणि राष्ट्रप्रेमी विचारांच्या उमेदवारांना निवडून देणे हाच एकमेव उपाय ! |
बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे आमदार मदन मित्रा यांच्या निवासस्थानांवर ‘ईडी’ची धाड
Abhishek Banerjee’s Home Raid : बंगाल पोलिसांकडून मध्यरात्री अभिषेक बॅनर्जी यांच्या घरावर धाड
कर्नाटक : पैसे घेऊन विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केले जात असल्याचे उघड !
संपादकीय : सत्तापिपासू तृणमूल बंडखोर !
अनैतिकतेचा बाजार !
वैयक्तिक अधिकाराहून सार्वजनिक सुरक्षेला अधिक प्राधान्य देणारी मुंबई उच्च न्यायालयाची भूमिका !