यंत्रे ‘खरी श्रद्धा’ कधीच देऊ शकत नसल्याचेही नमूद केले

रोम (इटली) – कॅथॉलिक ख्रिस्तींचे सर्वोच्च धर्मगुरू पोप लिओ (चौदावे) यांनी पाद्र्यांना स्पष्ट आणि कठोर संदेश देत ‘चर्चमध्ये दिले जाणारे उपदेश सिद्ध करण्यासाठी कृत्रिम बुद्धीमत्ता म्हणजेच एआयचा कोणताही आधार घेऊ नये’, असे म्हटले आहे. १९ फेब्रुवारी या दिवशी रोम येथे पाद्र्यांशी संवाद साधतांना त्यांनी नमूद केले की, उपदेश लिहिणे म्हणजे केवळ शब्दांची मांडणी नसून स्वतःचा विश्वास आणि जीवनातील अनुभव लोकांशी वाटून घेणे होय, जे कोणतेही यंत्र करू शकत नाही.
Pope Leo XIV: “Do Not Use AI to Write Church Sermons!”
Speaking in Rome on Feb 19, the head of the Catholic Church urged priests not to rely on Artificial Intelligence to prepare sermons.
A homily is not just words; it is the sharing of one’s own faith, prayer, and life… pic.twitter.com/6ugYwZX5oc
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 28, 2026
१. पोप लिओ यांनी पाद्र्यांना सांगितले की, एआयच्या साहाय्याने उपदेश लिहिणे, हा ‘शॉर्टकट’ आहे. हा ‘शॉर्टकट’ पाद्र्यांची आध्यात्मिक शिस्त कमकुवत करू शकतो. खरा उपदेश हा पाद्र्यांच्या जीवनातील संघर्ष आणि देवाप्रती असलेल्या निष्ठेतून निर्माण होतो. संगणक केवळ शब्दांची मांडणी करू शकतो, त्यांना अनुभवू शकत नाही.
२. पोप यांनी स्पष्ट केले की, ते नव्या तंत्रज्ञानाचा विरोधक नाही. व्हॅटिकनने धार्मिक ग्रंथांचे ६० भाषांमध्ये भाषांतर करणारी एआय प्रणाली स्वीकारली आहे; मात्र यंत्र संदेशाचे भाषांतर करू शकते; परंतु तो संदेश घडवणे आणि त्याचा सखोल अर्थ स्पष्ट करणे, हे उत्तरदायित्व केवळ मानवाचेच असले पाहिजे.
सामाजिक माध्यमांवरील लोकप्रियतेपासून सावध रहाण्याचाही सल्ला
पोप यांनी पाद्र्यांमध्ये वाढत चाललेल्या सामाजिक माध्यमांच्या आकर्षणाविषयीही चिंता व्यक्त केली. ‘ऑनलाईन लोकप्रियता किंवा ‘लाइक्स’ यांची संख्या ही आध्यात्मिक यशाची मोजपट्टी मानू नये’, असे त्यांनी सांगितले.
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले
(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार काश्मीरचे सूत्र सोडवावे !’ – Pakistan
राजकारण करायचे असेल, तर गणवेश उतरवून निवडणुकीत भाग घ्या ! – Maulana Fazlur Rehman