|
काबुल (अफगाणिस्तान) / इस्लामाबाद (पाकिस्तान) – अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध चालू झाल्याची अधिकृत घोषणा पाकिस्तानकडून करण्यात आली. पाकिस्तानने काबुल आणि कंदाहार शहरांवर हवाई आक्रमण करत युद्धाची घोषणा केली.
War between Pakistan and Afghanistan intensifies.
55 Pakistani soldiers reportedly killed, aircraft shot down after strikes on military outposts.
Global powers remain silent.
Will U.S. President Donald Trump – who says he stopped 8 global wars – step in now?
Or is there more… pic.twitter.com/t1fxr8SriG
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 27, 2026
पाकिस्तानने या आठवड्याच्या प्रारंभी अफगाणमध्ये हवाई आक्रमण करून ८० हून अधिक जणांना ठार मारले होते. या कारवाईत आतंकवादी तळांवर आक्रमण केल्याचा दावा पाकने केला होता; मात्र ‘मरणारे निरपराध नागरिक होते’, असा दावा तालिबान सरकारने केला. ‘याचा सूड उगवला जाईल’, असे सांगत तालिबानने पाकच्या सैन्यावर आक्रमण चालू केले. यावर पाकने २६ फेब्रुवारीच्या रात्री पुन्हा अफगाणिस्तानवर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी अफगाण सैन्याने पाकचे विमान पाडले, तसेच सैनिकी चौक्यांवर आक्रमण केले. यात ५५ हून अधिक पाक सैनिक ठार झाल्यानंतर संतापलेल्या पाकने युद्धाची घोषणा करत अफगाणिस्तानवर आक्रमण चालू केले. यापूर्वी उभय देशांतील संघर्ष शिगेला पोचला असतांना कतार देशाकडून मध्यस्थीचा प्रयत्न झाला; पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही.
अफगाणिस्तानने काय म्हटले ?

तालिबान सरकारचे प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद म्हणाले की, पाकिस्तानने दक्षिणेकडील कंदाहार आणि आग्नेय प्रांत पक्तिया येथे हवाई आक्रमणे केली. काबुलमध्ये किमान ३ स्फोटांचे आवाज ऐकू आले; परंतु अफगाणिस्तानच्या राजधानीत झालेल्या आक्रमणाचे नेमके ठिकाण किंवा संभाव्य जीवितहानी यांविषयी माहिती मिळालेली नाही. आमच्या सैन्याने केलेल्या आक्रमणात पाकचे ५५ सैनिक ठार झाले, तर अनेकांना जिवंत पकडण्यात आले. पाकिस्तानी सैन्याकडून वारंवार होणार्या उल्लंघनांना प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानी सैनिकी तळ आणि सैनिकी चौक्या यांवर मोठ्या प्रमाणात आक्रमक कारवाई करण्यात आली. डुरंड रेषेवरील पाकचे १९ सैनिकी तळ आणि चौक्या कह्यात घेण्यात आल्या आहेत. ४ अतिरिक्त चौक्यांमधील पाकिस्तानी सैनिक पळून गेले. अफगाण सैन्याने अनेक हलकी आणि जड शस्त्रे, दारूगोळा, सैनिकी साहित्य आणि एक मोठे सैनिकी वाहतूक वाहन कह्यात घेतले, तसेच एक पाकिस्तानी रणगाडा नष्ट केला. काही पाकिस्तानी सैनिकांचे मृतदेह अफगाणिस्तानात नेण्यात आले.
आमच्याकडे शत्रूला चिरडण्याची क्षमता ! – पाकचे पंतप्रधान शरीफ

आमच्या सैन्याकडे कोणत्याही आक्रमक महत्त्वाकांक्षा चिरडण्याची पूर्ण क्षमता आहे. संपूर्ण देश पाकिस्तानच्या सशस्त्र दलांसमवेत खांद्याला खांदा लावून उभा आहे, असे पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले आहे.
आमच्या संयमाची मर्यादा संपली असून आता निर्णायक कारवाई होईल ! – पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ

पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ आरोप करतांना म्हणाले की, ‘नाटो’ सैन्याने माघार गेल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये शांतता प्रस्थापित होईल आणि तालिबान अफगाण सरकार लोकांचे हित अन् प्रादेशिक स्थिरता यांवर लक्ष केंद्रित करील, अशी अपेक्षा होती; पण तालिबानने अफगाणिस्तानला भारताची वसाहत बनवली आहे. (कधी अमेरिकेची, तर कधी चीनची वसाहत बनवलेल्या पाकला असा आरोप करण्याचा नैतिक अधिकार तरी आहे का ? – संपादक) तालिबानकडून पाकिस्तानला लक्ष्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला, याला आमचे सशस्त्र दल निर्णायक प्रत्युत्तर देत आहे. आता आमच्या संयमाची मर्यादा संपली असून हा उघड संघर्ष आहे. आता निर्णायक कारवाई होईल. आम्ही तुमचे शेजारी असून आम्हाला तुमचे वास्तव चांगले ठाऊक आहे, अशी धमकी आसिफ यांनी दिली.
पाकिस्तानने अफगाणीस्तानातील तालिबानविरुद्ध ‘ऑपरेशन गझब लिल-हक’ चालू केल्याचे पाकिस्तानी मंत्री अत्ताउल्लाह तरार यांनी ‘एक्स’ पोस्टमध्ये म्हटले आहे. पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्की यांनी तालिबानच्या आक्रमणाचा निषेध केला आहे. पाकिस्तानी माध्यमांनी अफगाणिस्तानच्या आक्रमणात केवळ २ सैनिकांचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे.
संपादकीय भूमिकाजगातील ८ युद्ध थांबवल्याच्या घोषणा करणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प आता हे युद्ध थांबवणार का ? कि त्यांच्या इच्छेने पाकने हे युद्ध चालू केले आहे, असे जगाने समजायचे ? |

Bangladesh Hindu Girl Murder : बांगलादेशात ८ वर्षांच्या हिंदु मुलीचे अपहरण करून हत्या !
युक्रेन-रशिया युद्धात ट्रम्प यांनी फेटाळला होता भारतीय सैनिकांना शांतता मोहिमेसाठी पाठवण्याचा प्रस्ताव !
पाकिस्तानची स्तुती करणार्या अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांवर त्यांच्याच पक्षातील खासदार भडकले !
Bangladeshi Waiter : इटलीच्या उपाहारगृहामध्ये बांगलादेशाच्या मुसलमान वेटरचे भारतीय महिलांशी असभ्य वर्तन !
Resolution Over Iran War : इराणविरुद्धची सैनिकी कारवाई रोखणारा ठराव अमेरिकेच्या संसदेच्या वरिष्ठ संभागृहात संमत
Europe Heatwaves : युरोपमध्ये उष्णतेची लाट : तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक