दोषींवर कठोर कारवाई करण्याची हिंदु जनजागृती समितीची मागणी !

मुंबई, २६ फेब्रुवारी (वार्ता.) – स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवा, भोंदूगिरीवर नाही, असे लिखाण असलेल्या आणि साधू-संतांच्या वेषातील व्यंगचित्राद्वारे हिंदु धर्माचा अपमान करणार्या सामाजिक न्याय विभागाच्या वादग्रस्त विज्ञापनावरून राज्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे. हिंदु जनजागृती समितीचे मुंबईचे श्री. सतीश सोनार यांनी सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांची भेट घेऊन हे विज्ञापन तात्काळ मागे घेण्याची आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती.

या वेळी मंत्री म्हणाले, ‘‘हे विज्ञापन रात्रीच मागे घेण्यात आले आहे. हे विज्ञापन आमच्या विभागाच्या वतीने काढण्यात आलेले नव्हते. माहिती व जनसंपर्क विभागाने ते प्रसिद्ध केले होते.’’
Government forced to withdraw an advertisement mocking Hindu Saints after massive outrage. 🚩@HinduJagrutiOrg demands strict action against the culprits
On one side, Maharashtra prepares to showcase the glory of Hindu Dharma at the Nashik Simhastha Kumbh Mela 🌊🕉️ on the… pic.twitter.com/OqXRZjMiIM
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 26, 2026
महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या नावाने प्रसिद्ध झालेल्या विज्ञापनात जटा, टिळा, रुद्राक्षमाळा, कवटी आणि लिंबू-मिरची यांसारखी प्रतीके दाखवून एका साधूंचे विडंबनात्मक व्यंगचित्र प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यासह ‘नको भोंदूगिरी, घेऊ शिक्षणाची शिदोरी’, असे घोषवाक्य वापरून जाणीवपूर्वक हिंदु धर्माला लक्ष्य करण्यात आले होते.
हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा तीव्र विरोध !
या चित्रणामुळे हिंदु साधू-संत आणि ऋषिमुनी यांच्या परंपरेचे अवमानकारक सादरीकरण झाल्याची भावना विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी व्यक्त केली आहे. हिंदु जनजागृती समितीचे राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी सरकारकडे लेखी तक्रार करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
(हे विज्ञापन प्रकाशित करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नाही. विडंबन कसे झाले आहे, हे कळण्यासाठी ते प्रकाशित केले आहे, याची नोंद घ्यावी. – संपादक)
संपादकीय भूमिका
|
म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांचे मुंबईत स्वागत !
मुलींमध्ये शौर्य आणि आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण आवश्यक ! – प्रा. (सौ.) ज्योती वाघमारे, खासदार, शिवसेना
रेल्वेमार्गाने येणार्या बांगलादेशी घुसखोरांचा बंदोबस्त करा ! – सकल हिंदु समाजाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन
नाशिकमध्ये पहिल्याच पावसात खोदलेल्या रस्त्यांवर चिखल !
महानगरपालिकेच्या कर्मचार्याला १० सहस्र रुपयांची लाच घेतांना पकडले !
Ramdas Athawale : (म्हणे) ‘हातभट्ट्या अधिकृत केल्यास सरकारला महसूल मिळेल !’