गुंडगिरीद्वारे बळकावल्या होत्या मालमत्ता

सहारनपूर (उत्तरप्रदेश) – बेकायदेशीर मार्गाने संपत्ती गोळा केल्याचा आरोप असलेले बहुजन समाज पक्षाचे माजी आमदार हाजी इक्बाल उपाख्य बाला यांच्या २७५ कोटी ९७ लाख रुपयांहून अधिक किमतीच्या ५६ मालमत्ता जप्त करण्याची कार्यवाही सहारनपूर जिल्हा प्रशासनाने चालू केली आहे. हाजी इक्बाल पसार असून ते दुबई येथे असल्याचा संशय आहे.
₹276 Crore assets linked to former BSP MLC Haji Iqbal (Saharanpur, UP) to be attached
Properties allegedly built through land grabbing & hooliganism.
But where were the police & administration when crores worth of land was encroached? Shouldn’t accountability extend to… pic.twitter.com/FKgRRrfNZo
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 22, 2026
१. अधिकार्यांच्या म्हणण्यानुसार वर्ष २०२२ च्या प्रकरणातील सुनावणीत इक्बाल त्यांच्या सहकार्यांसह संघटित गुन्हेगारी टोळी चालवत असल्याचे उघड झाले.
२. ही टोळी वनक्षेत्रातून लाकूड चोरी आणि तस्करी, बेकायदेशीर खाणकाम आणि इतर बेकायदेशीर कृत्यांत सहभागी असल्याचे सांगितले जाते.
३. या टोळीने आर्थिक शक्तीचा वापर करून लोकांना धमकावले आणि फसवणूक करून शासकीय, तसेच खासगी भूमी खरेदी करून बेकायदेशीर कह्यात घेतल्या.
४. ही मालमत्ता केवळ इक्बाल यांच्या नावावरच नव्हे, तर त्यांची पत्नी, मुले, मुली, आश्रित असले कुटुंब, नोकर, सहकारी आणि अनेक बनावट आस्थापना यांच्या नावावर खरेदी करण्यात आली. या खरेदीसाठी गुन्हेगारी मार्गाने मिळविलेल्या पैशांचा वापर केल्याचा आरोप आहे.
५. वर्ष १९८९ पासून इक्बाल यांच्या विरोधात किमान ५२ गुन्हे नोंद झाले आहेत. त्यांपैकी ४१ प्रकरणे विविध न्यायालयांमध्ये प्रलंबित आहेत. या प्रकरणांमध्ये बनावट कागदपत्रे बनवणे, गुन्हेगारी धमकी, दरोडा, गुन्हेगारी कटकारस्थान आणि संबंधित इतर गंभीर आरोपांचा समावेश आहे.
संपादकीय भूमिका
|
दौंडमध्ये गुळात साखरेची भेसळ केलेला १७ लाखांचा साठा जप्त !
संपादकीय : सरकारची ऑनलाईन फसवणूक !
अहिल्यानगरमध्ये धर्मांधांकडून हिंदु कुटुंबावर प्राणघातक आक्रमण !
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थ्यांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये अवैध मद्यविक्री करणार्यांवर २३ गुन्हे नोंद !
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या प्रशासकपदी जिल्हाधिकार्यांची नियुक्ती !