
प्रजापती दक्ष यांनी आपल्या २७ मुलींचा विवाह सोमदेव (चंद्र) यांच्याशी लावून दिला; परंतु सोमदेव यांना त्यांतील केवळ रोहिणी नावाची पत्नी अधिक प्रिय होती. त्यामुळे अन्य २६ बायकांनी त्यांच्या वडिलांकडे चंद्रदेवाची तक्रार केली. प्रजापती दक्ष यांनी सोमदेवाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला; परंतु सोमदेवाने त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. प्रजापती दक्ष यांना सोमदेवाचा राग आला आणि त्यांनी स्वतःच्या जावयास शाप दिला, ‘तू माझ्या विनंतीस मान न देता असे वागलास. यामुळे तुझे तेज न्यून होत जाईल.’
हा शाप ऐकून सोमदेव चिंतेत पडला आणि त्याने सर्व देवतांची प्रार्थना केली. त्या वेळी सर्व देवतांनी सोमदेवाला ‘तुम्ही समुद्रतटावर जाऊन भगवान शिवाची प्रार्थना करा’, असे सांगितले. हे ऐकून सोमदेवाने समुद्राच्या काठावर जाऊन महादेवाची घोर तपश्चर्या केली. त्याची कठोर तपश्चर्या पाहून महादेव प्रसन्न झाले आणि त्याने प्रजापती दक्ष यांनी दिलेल्या शापाची तीव्रता अल्प केली. शिव सोमदेवाला म्हणाला, ‘तुझे तेज हे कायम राहील; परंतु एक मासातील दोन पक्षांत ते विभाजित असेल. कृष्ण पक्षात अमावास्येपर्यंत तुझे तेज न्यून होत जाईल आणि शुक्ल पक्षात मात्र पौर्णिमेपर्यंत तुझे तेज संपूर्ण विश्वात झळकू लागेल.’
भगवान शिवाने शापाचा प्रभाव अल्प केलेला पाहून सोमदेवाला आनंद झाला आणि त्याने शिवाला तेथेच समुद्रकिनारी कायमस्वरूपी वास्तव्य करण्याची प्रार्थना केली. चंद्राच्या विनंतीस मान देऊन भगवान शिव पार्वतीसह त्या स्थानी वास्तव्यास राहिले. पुढे तेथेच सोमदेवाने शिवपार्वतीचे सुवर्ण मंदिर बांधले. हे मंदिर म्हणजेच सध्याचे ‘प्रथम ज्योतिर्लिंग’ म्हणून ओळखले जाणारे ‘सोमनाथ मंदिर’ होय.
सूक्ष्मातील जाणणार्या एका संतांनी सोमनाथ मंदिराचे छायाचित्र पाहून केलेले सूक्ष्म परीक्षण पुढे दिले आहे.
१. सनातनच्या एक महिला संत आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना जाणवलेले सूक्ष्म ज्ञानाविषयीच्या चित्रातील स्पंदनांचे प्रमाण
१ अ. तेजतत्त्व
१ अ १. तेजतत्त्वाचे चक्राकार वलय शिवलिंगाभोवती कार्यरत असणे : शिवामध्ये तेजतत्त्व असून त्याने स्वतःतील तेजतत्त्वाने शिवलिंग प्रगट केले आहे. यामुळे शिवलिंगात तेजतत्त्वाचे चक्राकार वलय कार्यरत आहे.
१ अ २. तेजतत्त्वाच्या कणरूपी लहरी शिवलिंगातून वातावरणात प्रक्षेपित होत असणे
१ आ. शिवतत्त्व
१ आ १. शिवतत्त्वाचे वलय शिवलिंगाभोवती कार्यरत असणे
१ आ २. शिवतत्त्वाचे कण मंदिराच्या आत कार्यरत असणे : याचे कारण असे की, शिवलिंगातील शिवतत्त्व मंदिरात आकृष्ट झाले आहे. असे असले, तरी मंदिरात कार्यरत असलेले शिवतत्त्व मंदिराच्या बाहेर प्रक्षेपित होत नाही.
१ इ. चैतन्य
१ इ १. चैतन्याचे वलय शिवलिंगाभोवती कार्यरत असणे
१ ई. त्रासदायक शक्ती
१ ई १. त्रासदायक शक्ती ढगांच्या स्वरूपात मंदिराच्या भोवती प्रवाहित होत असणे : मंदिराच्या भोवती असलेल्या रज-तमात्मक स्पंदनांमुळे तेथे त्रासदायक शक्ती ढगांच्या स्वरूपात प्रवाहित होते. (सोमनाथ मंदिरावर झालेल्या अनेक आक्रमणांमुळे सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे तुकडे झाले. विशेषतः वर्ष १०२६ मध्ये महंमद गझनीने केलेल्या मोठ्या आक्रमणात ज्योतिर्लिंगाची तोडफोड झाली. त्यानंतरही अनेक मुसलमान शासकांनी या मंदिरावर आक्रमणे केली. अशा प्रकारे सोमनाथ मंदिरावर १७ वेळा आक्रमणे झाली, असा इतिहास आहे. त्यामुळे या मंदिराच्या भोवती सूक्ष्मातील जाणणार्या महिला संतांना त्रासदायक शक्ती जाणवली, तसेच ‘मंदिराच्या आत कार्यरत असलेले शिवतत्त्व मंदिराच्या बाहेर प्रक्षेपित होत नाही’, हेही या महिला संतांना जाणवले. या आक्रमणांचा इतिहास या महिला संतांना ठाऊक नाही, तरीही त्यांना वरीलप्रमाणे सूत्रे जाणवली. यातून त्यांची सूक्ष्मातील जाणण्याची अफाट क्षमता लक्षात येते.- संकलक)
२. सोमनाथ मंदिराविषयी जाणवलेली अन्य वैशिष्ट्ये
अ. सोमनाथ मंदिरात कार्यरत असलेली तत्त्वे (स्पंदने) सगुण स्तरावरील आहेत.
आ. साेमनाथ येथे भगवान शिव शिवलिंगाच्या रूपात प्रगट होतांना शिवाच्या समवेत ब्रह्मा आणि श्रीविष्णु होते.’
– सनातनच्या एक महिला संत (११.२.२०२५)
|


संपादकीय : मंदिरे अध्यात्मासाठीच !
मिरज (जिल्हा सांगली) येथील सनातनच्या आश्रमातील सौ. शोभा पांडुरंग कौलकर (वय ६७ वर्षे) यांना सुचलेल्या प्रार्थना आणि कृतज्ञता !
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा अविरतपणे आणि भावपूर्ण करणारे शिरोडा (फोंडा, गोवा) येथील श्री. धर्मा नाईक (वय ७५ वर्षे) !
गोव्यातील पर्तगाळ मठात वस्त्रसंहिता कठोरतेने लागू
‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम, २०२६’: ऐतिहासिक न्यायाचा देखावा कि देवस्थानांच्या लाखो हेक्टर भूमी हडपण्याचा कायदेशीर कट ?