
नवी देहली – बांगलादेशात १२ फेब्रुवारी या दिवशी सार्वत्रिक निवडणूक पार पडली. याविषयी बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी ‘ए.एन्.आय.’ या वृत्तसंस्थेला सांगितले की, बांगलादेशात ‘जमात-ए-इस्लामी’ पक्ष सत्तेत आल्यास बांगलादेशातील लोकशाही संपुष्टात येईल आणि कट्टरतावाद वाढेल. त्यामुळे अल्पसंख्यांकांवरील अत्याचार वाढतील आणि त्यांना देश सोडावा लागू शकतो. महिलांना बुरखा बंधनकारक केला जाईल. यामुळे बांगलादेश दुसरा अफगाणिस्तान होऊ शकतो.
Power shifts in Dhaka, but the fear among Bangladeshi Hindus remains constant.
"If Jamaat-e-Islami rises, Bangladesh may turn into another Afghanistan."
Taslima Nasreen cautions against the party's rise.
India must prepare; safety of Hindus across borders is not optional. 🇮🇳… pic.twitter.com/hWUis4JQGg
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 13, 2026
नसरीन पुढे म्हणाल्या की,
१. वर्ष १९७१ च्या युद्धात जमात-ए-इस्लामीने पाकिस्तानी सैन्याला साथ दिली होती. या शक्ती भारतविरोधी आणि पाकिस्तान समर्थक आहेत; मात्र या वेळीही जमात निवडणूक जिंकणार नाही.
२. या निवडणुकीत जमातच्या कार्यकर्त्यांनी धर्माच्या नावावर प्रचार केला. ‘आमच्या पक्षाचे निवडणूक चिन्ह असलेल्या तराजूला मत दिल्यास स्वर्गप्राप्ती होईल आणि आम्हाला मत देणे, हा अल्लाचा आदेश आहे’, असा दावा जमातच्या कार्यकर्त्यांकडून केला गेला.
३. ‘बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी’ (बी.एन्.पी.) सत्तेत आल्यास त्याच्यासमोर मोठी आव्हाने असतील. कोणत्याही परिस्थितीत लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्य यांचे संरक्षण करणे आवश्यक आहे. त्याला श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी न्यून करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. ‘बी.एन्.पी.’ने या सूत्रांवर प्रभावीपणे काम केल्यास जनतेचा विश्वास मिळू शकतो.
संपादकीय भूमिकाबांगलादेशात कोणताही पक्ष सत्तेत आला, तरी तेथील हिंदूंवर अत्याचार हे होणारच आहेत. हे लक्षात घेऊन त्यांच्या सुरक्षेसाठी भारताने पावले उचलणे आवश्यक आहे ! |
महिला पर्यटकांचे व्हिडिओ काढणार्याला अटक
‘एक भक्कम पाकिस्तान अमेरिकेच्या हितासाठी अत्यंत आवश्यक !’ – अमेरिका
खारघर (नवी मुंबई) येथे ‘हेअर स्पा’ करतांना मुसलमान युवकाने हिंदु महिलेचे चुंबन घेतले !
भाजप तमिळनाडूचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई स्वत:चा पक्ष स्थापन करणार !
(म्हणे) ‘विप्रो’मध्ये महिला कर्मचार्यांचे कल्याण, प्रतिष्ठा आणि सन्मान यांना सर्वोच्च महत्त्व दिले जाते !’ – Wipro’s Explanation
Trump Warns Iran : आमच्या सैनिकांना हात जरी लावला, तरी युद्ध पेटेल !