आज ९ फेब्रुवारी या दिवशी असलेल्या श्री अनंतानंद साईश यांच्या ७१ व्या प्रकटोत्सवानिमित्त त्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम !
‘९.२.२०२६ या दिवशी श्री अनंतानंद साईश यांचा प्रकटदिन आहे. ते सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांचे गुरु होते. या लेखात आपण ‘त्यांचा मागील जन्मांतील साधनाप्रवास आणि त्यांच्या दैवी कार्याची व्याप्ती’ समजून घेत आहोत.
या लेखाचा काही भाग आपण ८.२.२०२६ दिवशी पाहिला आज या लेखाचा उत्तरार्ध समजून घेणार आहोत.
(भाग २)
भाग १ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1005680.html
२. श्री अनंतानंद साईश यांच्या साधनाक्षेत्रांतील दैवी ऊर्जेचे स्वरूप आणि तिचे प्रमाण
श्री अनंतानंद साईश यांनी मध्यप्रदेशमधील मेहताखेडी, मोरटक्का, बढवाह, इंदूर, उमेठ इत्यादी ठिकाणी राहून कार्य केले. त्यामुळे या पवित्र क्षेत्री त्यांची दैवी ऊर्जा अजूनही कार्यरत आहे. या दैवी ऊर्जेचा लाभ सभोवतालच्या पंचक्रोशीला होतो आणि तेथे रहाणार्या सात्त्विक जिवांना साधना करण्यासाठी दैवी बळ प्राप्त होते.

३. श्री अनंतानंद साईश यांनी शिष्य डॉ. आठवले यांना प.पू. भक्तराज महाराज यांच्या माध्यमातून दिलेले कृपाशीर्वाद !
३ अ. शिष्य डॉ. आठवले यांना ज्ञान, भक्ती आणि वैराग्य यांचे वरदान मिळणे
प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) हे शिष्य डॉ. आठवले यांच्या सेवाभावाने प्रसन्न झाले आणि श्री अनंतानंद साईश यांच्या प्रेरणेमुळे प.पू. बाबांनी डॉ. आठवले यांना ज्ञान, भक्ती अन् वैराग्य यांचे वरदान दिले.
३ आ. शिष्य डॉ. आठवले यांच्याद्वारे ‘गुरुकृपायोग’ या नवीन साधनामार्गाची निर्मिती होणे
श्री अनंतानंद साईश यांच्या कृपेमुळे आणि प.पू. बाबांच्या आशीर्वादाने शिष्य डॉ. आठवले यांनी कलियुगातील सर्वाधिक उपयुक्त, सर्वाेत्तम आणि सोप्या असणार्या ‘गुरुकृपायोग’ या साधनामार्गाची निर्मिती केली. या साधनामार्गानुसार साधना करून आतापर्यंत (६ फेब्रुवारी २०२६ पर्यंत) १३७ साधकांनी संतपद प्राप्त केले आहे, तर एक सहस्रांहून अधिक साधक संतपदाकडे वाटचाल करत आहे.
३ इ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याद्वारे अध्यात्मावरील शेकडो ग्रंथांची निर्मिती होणे
श्री अनंतानंद साईश यांनी प.पू. बाबांना ‘तू किताबों के ऊपर किताबें लिखेगा ।’, म्हणजे ‘तू पुष्कळ ग्रंथ लिहिशील’, हा आशीर्वाद दिला होता. त्यानंतर प.पू. बाबांनी शिष्य डॉ. आठवले यांना हा आशीर्वाद दिला. त्यामुळे जानेवारी २०२६ पर्यंत सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी अध्यात्मशास्त्र, आयुर्वेद, राष्ट्ररक्षण, धर्मजागृती इत्यादी विविध विषयांवर १३ भाषांतील ३६९ ग्रंथ संकलित केले आहेत, तसेच आणखी ५ सहस्र ग्रंथांचे लिखाण संगणकात उपलब्ध आहे.
४. श्री अनंतानंद साईश यांनी सनातन संस्थेचे संत आणि साधक यांना दिलेले कृपाशीर्वाद !
श्री अनंतानंद साईश यांनी विविध साधनामार्गांनी साधना करून विविध प्रकारचे दैवी बळ प्राप्त केले. त्यानंतर त्यांनी सनातन संस्थेच्या साधकांना व्यष्टी स्तरावर मोक्षप्राप्ती आणि समष्टी स्तरावर हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी कृपाशीर्वाद दिले. त्यामुळे सनातन संस्थेच्या पाठीशी योगशक्ती, तपःशक्ती आणि ज्ञानशक्ती कार्यरत झाली आहे. या शक्तीमुळे संत आणि साधक यांच्यामध्ये भाव निर्माण झाला आहे, तसेच दैवी गुणांची वृद्धीही झाली आहे.
४ अ. श्री अनंतानंद साईश यांनी सनातन संस्थेला दिलेल्या दैवी बळामुळे सनातनचे संत आणि साधक यांना झालेले लाभ !

५. श्री अनंतानंद साईश यांची वाटचाल ‘मूर्त’ अवस्थेकडून ‘अमूर्त’ अवस्थेकडे होणे
श्री अनंतानंद साईश यांची वाटचाल ‘मूर्त’ अवस्थेकडून, म्हणजे सगुण आणि साकार अवस्थेकडून ‘अमूर्त’ अवस्थेकडे, म्हणजे निर्गुण अन् निराकार अवस्थेकडे झाली आहे. त्यामुळे ते देहरूप नसून गुरुतत्त्वस्वरूप बनले आहेत. या गुरुतत्त्वस्वरूपी शिवात्म्याने १२.१२.१९५७ या दिवशी उमेठ (मध्यप्रदेश) येथे ‘श्री अनंतानंद साईश’ या नावाच्या स्थूलदेहाचा त्याग केला आणि सत्यलोकाच्या पलीकडे असणार्या ब्रह्मांडपोकळीकडे प्रयाण केले. तेथे त्यांची आत्मज्योत स्थिरावली आहे.

६. श्री अनंतानंद साईश यांच्या चरणी भाव सुमनांजली !
लेखाचा समारोप करत असतांना मला प.पू. भक्तराज महाराज यांनी भजनातून कृतज्ञतापूर्वक गायलेल्या गुरुमहिम्याचे स्मरण झाले.
साईनाथ हे दैवत माझे । असता माझे घरी ।
कशाला जाऊ मी विश्वेश्वरी ।।
‘अशा थोर गुरुपरंपरेतील परमोच्च मोक्षगुरूंचे कृपाशीर्वाद आम्हाला लाभले’, याबद्दल आम्ही सर्व साधक श्री गुरुतत्त्वाप्रती कोटीशः कृतज्ञ आहोत.’
(समाप्त)
– सुश्री मधुरा भोसले (सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधिका, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
(ज्ञान मिळण्याचा दिनांक : २.२.२०२६, वेळ : दुपारी १२.३० ते १)
| • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात. • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. – संपादक |

इतरांचा विचार करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले म्हार्दोळ, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई अन् सौ. पूनम प्रभुदेसाई !
११०० व्होल्ट वीजप्रवाहाचा झटका बसून बेशुद्ध झालेल्या भक्तांना वाचवणारे ईश्वरस्वरूप योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन !
मिरज (जिल्हा सांगली) येथील सनातनच्या आश्रमातील सौ. शोभा पांडुरंग कौलकर (वय ६७ वर्षे) यांना सुचलेल्या प्रार्थना आणि कृतज्ञता !
सहनशील आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या शिरसई, तालुका बार्देश, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) रंजना सिनारी (वय ७६ वर्षे) !
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या शिबिरात साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेली अनुभूती
प्रभादेवी (मुंबई) येथे झालेल्या ‘श्री राजमातंगी महायज्ञा’च्या संदर्भात कोची (केरळ) येथील सेवाकेंद्रातील साधकांना आलेल्या अनुभूती !