श्री अनंतानंद साईश यांचा मागील जन्मांतील साधनाप्रवास आणि त्यांच्या दैवी कार्याची व्याप्ती !

उद्या ९ फेब्रुवारी या दिवशी असलेल्या श्री अनंतानंद साईश यांच्या ७१ व्या प्रकटोत्सवानिमित्त त्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम !

‘९.२.२०२६ या दिवशी श्री अनंतानंद साईश यांचा प्रकटदिन आहे. ते सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांचे गुरु होते. या लेखात आपण ‘त्यांचा मागील जन्मांतील साधनाप्रवास आणि त्यांच्या दैवी कार्याची व्याप्ती’ समजून घेणार आहोत.

(भाग १)

१. श्री अनंतानंद साईश यांचा मागील जन्मांतील साधनाप्रवास 

कृतयुगामध्ये श्री अनंतानंद साईश हे महर्लाेकात रहात होते. त्यानंतर त्यांनी पृथ्वीवर ‘तपोनिधीऋषि’ यांच्या रूपात जंबुद्विपातील भरतखंडात जन्म घेतला. त्या जन्मात त्यांनी हिमालयात राहून सहस्रो वर्षे कठोर तपश्चर्या केली. त्यांनी प्रत्येक युगात विविध ठिकाणी राहून विविध साधनामार्गांनी व्यष्टी आणि समष्टी साधना केली. याचा ऊहापोह पुढील सारणीत केला आहे.

१ अ. श्री अनंतानंद साईश यांनी विविध युगांमध्ये केलेली व्यष्टी आणि समष्टी साधना !

टीप १ – ‘कृतयुग’ हे सत्ययुगाच्या आधीचे युग होते.

टीप २ – श्री अनंतानंद साईश यांच्यामध्ये उत्तम शिष्याचे सर्व गुण होते. त्यामुळे त्यांनी प्रत्येक जन्मात शिष्यभावाने गुरुसेवा करून श्री गुरूंची कृपा संपादन केली होती. परिणामी प्रत्येक जन्मात त्यांची शीघ्र आध्यात्मिक उन्नती झाली.

टीप ३ – प.पू. भुरानंदबाबा आणि प.पू. भक्तराज महाराज हे श्री अनंतानंद साईश यांचे सर्वाेत्तम शिष्य होते.

सुश्री (कु.) मधुरा भोसले

१ आ. श्री अनंतानंद साईश यांनी मागील जन्मांमध्ये तीर्थक्षेत्री राहून केलेली साधना आणि दोन जन्मांच्या मध्ये त्यांना प्राप्त झालेला सूक्ष्म लोक ! 

श्री अनंतानंद साईश यांच्या विविध जन्मांतील नावांत ‘तप’ हा शब्द आहे. त्यांनी मागील जन्मांमध्ये विविध तपस्थाने आणि तीर्थक्षेत्रे येथे एकांतात राहून घोर तपश्चर्या केली होती अन् आत्मज्ञान आणि ब्रह्मज्ञान यांची प्राप्ती केली होती. त्यामुळे ते खर्‍या अर्थाने ‘ज्ञानवृद्ध’ आणि ‘तपोवृद्ध’ होते. परिणामी त्यांच्या यौगिक बळात निरंतर वृद्धी होऊन त्यांना दैवी तपोबळ प्राप्त झाले होते. त्यामुळे श्री अनंतानंद साईश दत्तात्रेयांप्रमाणे स्मर्तृगामी होते, म्हणजे कोणत्याही भक्ताने त्यांचे स्मरण केल्यावर ते तत्क्षणी भक्तांच्या साहाय्यासाठी प्रगट होत असत. ‘त्यांनी मागील जन्मांमध्ये तीर्थक्षेत्री राहून केलेली साधना आणि दोन जन्मांच्या मध्ये त्यांना प्राप्त झालेला सूक्ष्म लोक’, यांचे संक्षिप्त विवरण पुढील सारणीत दिले आहे.

१ इ. श्री अनंतानंद साईश यांना दैवी शक्तींच्या कृपेमुळे प्राप्त झालेल्या आध्यात्मिक अवस्था 

श्री अनंतानंद साईश यांनी मागील जन्मांमध्ये शिव, दत्त, देवी इत्यादी देवतांची आराधना केली होती. त्यांच्यावरील शिवकृपेमुळे त्यांना निर्गुण समाधी अवस्था प्राप्त झाली, दत्तकृपेमुळे नाथपंथी गुरूंच्या अनुसंधानात दीर्घ काळ रहाता आले आणि देवीच्या कृपेने विविध प्रकारच्या दैवी शक्ती प्राप्त झाल्या. त्यामुळे त्यांना लाभलेल्या उच्चतम आध्यात्मिक अवस्थांचा गोषवारा पुढील सारणीत दिला आहे.

टीप – मागील जन्मांमध्ये श्री अनंतानंद साईश यांनी भारतातील पवित्र नद्यांच्या तटावर राहून घोर जलानुष्ठाने केली होती आणि अग्नीचीही उपासना केली होती. त्यामुळे त्यांना जलाशी संबंधित असणारी नदीदेवी आणि अग्नीशी संबंधित असणारा अग्निदेव अन् सूर्यदेव यांचेही कृपाशीर्वाद लाभले होते. या देवतांच्या कृपेमुळे श्री अनंतानंद साईश यांच्यामधील जलतत्त्वाच्या संतुलनाने त्यांचे चित्त अत्यंत शांत होते आणि तेजतत्त्वाच्या संतुलनामुळे त्यांचा संपूर्ण देह दीप्तीमान होता. जेव्हा ते शिष्यावस्थेत होते, म्हणजे कृतयुगात जेव्हा ते तपोनिधीऋषि होते, तेव्हा ते नदीदेवीची मानस आरती करत होते. जेव्हा ते सत्ययुगात तपोगिरीऋषींच्या रूपात गुरुपदी विराजमान झाले, तेव्हा नदीदेवी त्यांच्या आश्रमात येऊन त्यांची पाद्यपूजा आणि मंगल आरती करत होती.

कृतज्ञता 

प.पू. भक्तराज महाराज यांच्या भजनांतील ओळी मी श्री गुरुचरणी कृतज्ञताभावाने अर्पण करते.

साईनाथ हैं स्वामी हमारे ।
उनके चरणोंमें शीश नमाऊ रे ।।

अर्थ : प.पू. भक्तराज महाराज म्हणतात, ‘साईनाथ (श्री अनंतानंद साईश) हे आपले स्वामी आहेत. आपण त्यांच्या चरणांवर नतमस्तक होऊया.’

‘अशा थोर गुरुपरंपरेतील परमोच्च मोक्षगुरूंचे कृपाशीर्वाद आम्हाला लाभले’, याबद्दल आम्ही सर्व साधक श्री गुरुतत्त्वाप्रती कोटीशः कृतज्ञ आहोत.’

(क्रमशः)

– सुश्री मधुरा भोसले (सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्त्या साधिका) (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा दिनांक : २.२.२०२६, वेळ : दुपारी १२ ते १२.३०)

भाग २ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1006182.html

• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
• सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. – संपादक