महाराष्ट्रातील करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीदेवीच्या उत्तरायणातील किरणोत्सवाचे आध्यात्मिक महत्त्व !

आज २ फेब्रुवारीला असलेल्या श्री महालक्ष्मीदेवी किरणोत्सव समाप्तीच्या निमित्ताने…

‘महाराष्ट्रातील करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीदेवीचे देऊळ हे महाराष्ट्रातील प्रमुख साडेतीन शक्तीपीठांपैकी एक महत्त्वपूर्ण शक्तीपीठ आहे. (महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांमध्ये कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरची रेणुकामाता आणि नाशिक (वणी) येथील सप्तशृंगीदेवी यांचा समावेश होतो, ज्यात वणीचे सप्तशृंगी पीठ हे अर्धे पीठ मानले जाते आणि अन्य सर्व स्थळे आदिशक्तीची जागृत देवस्थाने आहेत.) प्रत्येक वर्षी सौर कालगणनेनुसार ३१ जानेवारी, १ आणि २ फेब्रुवारी या तीन दिवसांमध्ये देवीचा उत्तरायणातील किरणोत्सव असतो, तसेच ९, १० आणि ११ नोव्हेंबर या तीन दिवसांमध्ये देवीचा दक्षिणायनातील किरणोत्सव असतो. या सोहळ्याच्या वेळी मावळतीचे सूर्यकिरण महाद्वारातून श्री महालक्ष्मीदेवीच्या मंदिरात प्रवेश करून पहिल्या दिवशी तिचे चरण, दुसर्‍या दिवशी तिचे पोट आणि छाती अन् तिसर्‍या दिवशी तिचे मुख आणि त्यानंतर संपूर्ण मूर्ती यांना स्पर्श करतात. यावरून सनातन भारतीय संस्कृतीत ‘मंदिराचे वास्तूशास्त्र किती प्रगत होते !’, हे आपल्या लक्षात येते. सूर्यकिरणांनी देवीच्या मूर्तीला स्पर्श करण्याच्या आधी मंदिरातील सर्व विद्युत् दीप मालवून मंदिराच्या गाभार्‍यात केवळ दोन समया तेवत ठेवल्या जातात. वर्षातून दोन वेळा होणार्‍या या किरणोत्सवाचे आध्यात्मिक महत्त्व येथे लेखबद्ध केले आहे.

श्री महालक्ष्मीदेवीच्या पूर्ण मूर्तीवर पडलेले सूर्यकिरण

१. ‘किरणोत्सव’, म्हणजे ‘देवतेच्या मूर्तीची तेजतत्त्वाच्या स्तरावरील शुद्धीकरणाची प्रक्रिया’ आणि ‘तत्त्वजागृती’ सोहळा असणे

‘किरणोत्सव’ म्हणजे सूर्यनारायणाच्या दिव्य तेजाने देवतेच्या मूर्तीची केलेली तेजतत्त्वाच्या स्तरावरील शुद्धीकरणाची नैसर्गिक प्रक्रिया आहे’, असे आपण म्हणू शकतो. त्याचप्रमाणे ‘किरणोत्सवामुळे’ देवतेच्या मूर्तीतील देवतेचे तत्त्व जागृत होत असल्याने ‘किरणोत्सवाला’ ‘तत्त्वजागृती सोहळा’, असेही म्हणतात. या सोहळ्यामुळे देवीच्या मूर्तीतील देवीचे तत्त्व पूर्णपणे जागृत होऊन कार्यरत होते. त्यामुळे नेहमीच्या दिवसांच्या तुलनेत किरणोत्सवाच्या वेळी श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीतून दैवी शक्ती आणि चैतन्य यांचे सहस्र पटींनी प्रक्षेपण होते.

२. किरणोत्सवाच्या तीन दिवसांत श्री महालक्ष्मीदेवीच्या जागृत होणार्‍या कुंडलिनीनाड्या आणि संबंधित अन्य घटक

३. किरणोत्सवाच्या ३ दिवसांत श्री महालक्ष्मीदेवीच्या भाविकांना तिच्या विविध स्वरूपांचे दर्शन होऊन मिळणार्‍या शक्तीचा प्रकार आणि भाविकांना होणारे लाभ

सुश्री मधुरा भोसले

३ अ. पहिल्या दिवशी श्री महालक्ष्मीदेवीची सौम्य स्वरूपातील कल्याणात्मक शक्ती कार्यरत होणे : ही देवीची तारक शक्ती आहे. या सौम्य स्वरूपातील कल्याणात्मक शक्तीमुळे भाविकांना असणारे त्वचाविकारांसारखे विविध विकार दूर होतात.

३ आ. दुसर्‍या दिवशी श्री महालक्ष्मीदेवीची उग्र स्वरूपातील संहारात्मक शक्ती कार्यरत होणे : ही देवीची मारक शक्ती आहे. या उग्र स्वरूपातील संहारात्मक शक्तीमुळे भाविकांना त्रास देणार्‍या अतृप्त पितर किंवा भूत, राक्षस, काळे नाग इत्यादी कनिष्ठ स्तरावरील अनिष्ट शक्तींशी युद्ध होऊन त्या नष्ट होतात.

३ इ. तिसर्‍या दिवशी श्री महालक्ष्मीदेवीची कैवल्य स्वरूपातील करुणास्वरूप शक्ती कार्यरत होणे : ही देवीची तारक-मारक स्वरूपातील संमिश्र शक्ती आहे. देवीच्या कैवल्य स्वरूपातील करुणास्वरूप शक्तीमुळे भाविकांच्या जीवनातील मोठमोठी संकटे दूर होतात आणि त्यांचा ऐहिक, तसेच पारमार्थिक उत्कर्ष होतो.

४. किरणोत्सवाच्या वेळी श्री महालक्ष्मीदेवीची कुंडलिनीचक्रे जागृत झाल्यामुळे त्यांचे देवीच्या मूर्तीवर होणारे सुपरिणाम

५. अन्य दिवसांच्या तुलनेत किरणोत्सवाच्या वेळी श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन घेतल्यामुळे भाविकांना कैक पटींनी अधिक लाभ होणे

किरणोत्सवाच्या वेळी देवीच्या मुखावर कधी करुणाभाव, कधी वात्सल्यभाव, तर कधी मारकभाव दिसून येतात. भाविकांच्या भावानुसार त्यांना देवी विविध रूपांमध्ये दर्शन देत असते, तसेच भाविकांच्या श्रद्धेनुसार देवी त्यांच्यावर कृपा करत असते. त्यामुळे अन्य दिवसांच्या तुलनेत किरणोत्सवाच्या वेळी श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन घेतल्यामुळे भाविकांना कैक पटींनी अधिक लाभ होतो.

६. अन्य दिवस आणि किरणोत्सवातील दिवस या कालावधीत श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीतून प्रक्षेपित होणारे विविध घटक अन् त्यांचे प्रमाण !

– सुश्री मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.१.२०२६)

श्री महालक्ष्मीदेवीच्या चरणी वहाते ही भावसुमनांजली !


हे महालक्ष्मीदेवी, तू आहेस संपूर्ण जगाची माऊली ।
तुझी अखंड राहो आम्हा सर्वांवर कृपेची सावली ।।

– सुश्री मधुरा भोसले

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. – संपादक