धार्मिक ग्रंथाची प्रत आणि हाताने लिहून काढलेला धार्मिक ग्रंथ यांतून प्रक्षेपित होणारी स्पंदने याविषयीचे संशोधन

आज (२७ जानेवारी या दिवशी) ‘दासबोध जयंती’ आहे. त्या निमित्ताने…

‘धार्मिक ग्रंथाची प्रत आणि हाताने लिहून काढलेला धार्मिक ग्रंथ यांतून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा अभ्यास करण्यासाठी ग्रंथाचे मुखपृष्ठ, मलपृष्ठ आणि सहजरीत्या उघडलेले पृष्ठ यांच्या ‘लोलक’ (टीप १) आणि ‘आर्.एफ्.आय्.(रेसोनेंट फिल्ड इमेजिंग)’ (टीप २) या उपकरणांद्वारे चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांतील नोंदी आणि त्यांचे विवेचन पुढे दिले आहे.

पारमार्थिक आणि प्रापंचिक उपदेश करणारा महान ग्रंथ ‘दासबोध’ !

१. ‘लोलक’ आणि ‘आर्.एफ्.आय्. (रेसोनेंट फिल्ड इमेजिंग)’ या उपकरणांद्वारे केलेल्या नोंदी

‘लोलक’ आणि ‘आर्.एफ्.आय्. (रेसोनेंट फिल्ड इमेजिंग)’ उपकरण
टीप १ : लोलकाने वस्तू, वास्तू किंवा व्यक्ती यांच्यातील नकारात्मक अन् सकारात्मक ऊर्जा मोजता येतात.

टीप २ : ‘आर्.एफ्.आय्. (रेसोनेंट फिल्ड इमेजिंग)’ या उपकरणाद्वारे एखाद्या घटकाच्या (वस्तू, व्यक्ती इत्यादींच्या) ऊर्जाक्षेत्राची ‘फ्रिक्वेंसी’ (‘फ्रिक्वेंसी’ – वारंवारता म्हणजे वस्तू, व्यक्ती इत्यादींच्या भोवती असलेल्या ऊर्जेच्या क्षेत्रात होणार्‍या कंपनांची संख्या ‘हर्टज्’ (कंपनांची आवृत्ती मोजण्यासाठी वापरले जाणारे एकक) या एककामध्ये) मोजता येते. या उपकरणासमवेत दिल्या गेलेल्या फ्रिक्वेंसीच्या तक्त्यावरून ‘कोणती फ्रिक्वेंसी कोणत्या विशिष्ट रंगाशी संबंधित आहे ?’, ते समजते.

या प्रयोगात (पू. (प्रा.) के.वि. बेलसरे लिखित) ‘सार्थ श्रीमद्‌दासबोध’ या ग्रंथाची प्रत आणि सनातनच्या साधिका श्रीमती विजया ताकभाते यांनी हाताने लिहिलेला ‘सार्थ श्रीमद्‌दासबोध’ हा ग्रंथ यांच्या लोलक आणि ‘आर्.एफ्.आय्.’ या उपकरणांद्वारे चाचण्या करण्यात आल्या. दोन्ही ग्रंथांतील कोणत्याही पृष्ठात नकारात्मक ऊर्जा आढळली नाही. ग्रंथांच्या पृष्ठांतील सकारात्मक ऊर्जेच्या नोंदी, तसेच पृष्ठांची ‘फ्रिक्वेंसी’ आणि पृष्ठांच्या ‘फ्रिक्वेंसी’शी संबंधित रंग इत्यादी नोंदी पुढील सारणीत दिल्या आहेत.

वरील नोंदींवरून पुढील सूत्रे लक्षात येतात –

सौ. मधुरा धनंजय कर्वे

१. हाताने लिहिलेला ग्रंथ आणि छापील ग्रंथ यांतील पृष्ठांत सकारात्मक ऊर्जा आहे आणि तिचे प्रमाण निरनिराळे आहे.

२. दोन्ही ग्रंथांच्या मुखपृष्ठापेक्षा, मलपृष्ठात आणि त्याहीपेक्षा सहजरित्या उघडलेल्या पृष्ठात सकारात्मक ऊर्जा अधिक आहे.

३. दोन्ही ग्रंथांतील पृष्ठांची फ्रिक्वेंसी निरनिराळी आहे.

४. दोन्ही ग्रंथांच्या मुखपृष्ठांच्या ‘फ्रिक्वेंसी’शी संबंधित रंग सोनेरी, म्हणजे सर्वाेच्च सात्त्विकता असलेला आहे.

५. हाताने लिहिलेला ग्रंथ आणि छापील ग्रंथ यांच्या मलपृष्ठाच्या ‘फ्रिक्वेंसी’शी संबंधित रंग अनुक्रमे पिवळा आणि हिरवा आहे.

६. हाताने लिहिलेला ग्रंथ आणि छापील ग्रंथ यांच्या सहजरीत्या उघडलेल्या पृष्ठाच्या ‘फ्रिक्वेंसी’शी संबंधित रंग अनुक्रमे सोनेरी आणि हिरवा आहे.

७. हिरवा, पिवळा आणि सोनेरी हे रंग चढत्या क्रमाने सात्त्विक स्पंदने दर्शवतात.

१ इ. निष्कर्ष : ‘सार्थ श्रीमद् दासबोध’ या ग्रंथाची हाताने लिहिलेली प्रत आणि त्याच ग्रंथाची छापील प्रत यांतून सकारात्मक (सात्त्विक) स्पंदने प्रक्षेपित झाली अन् त्यांचे प्रमाण निराळे होते. याचे कारण हे की, एखाद्या ग्रंथातून प्रक्षेपित होणारी स्पंदने अनेक घटकांवर अवलंबून असतात, उदा. ग्रंथाचा विषय, भाषा आणि लिपी, व्याकरण, तसेच ग्रंथ लिखाणाचा उद्देश, लेखकाची आध्यात्मिक पातळी, त्याला आध्यात्मिक त्रास असणे किंवा नसणे इत्यादी. थोडक्यात ग्रंथाशी संबंधित घटक जितके सात्त्विक, तेवढी त्या ग्रंथातून अधिक सात्त्विक स्पंदने प्रक्षेपित होतात. प्रयोगातील दोन्ही ग्रंथांचा विषय, भाषा, लिपी, मजकूर, चित्रे इत्यादी साधारण सारखेच आहे; पण लेखक किंवा लिखाण करणारी व्यक्ती मात्र वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे त्यांची आध्यात्मिक पातळी, त्यांचा भाव इत्यादींनुसार त्यांच्या लिखाणातील स्पंदनांचे प्रमाणही निरनिराळे आहे.

सामान्यतः ग्रंथाच्या मुखपृष्ठावर चित्र आणि ग्रंथाचे नाव असते. ग्रंथाच्या आतील पृष्ठांवर अधिकतर लिखाण असते. ग्रंथाच्या मलपृष्ठावर थोडे लिखाण असते किंवा काही वेळा मलपृष्ठ कोरेही असते. त्यानुसार पृष्ठांतून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचे प्रमाणही निरनिराळे असते. प्रयोगातील दोन्ही ग्रंथांच्या मुखपृष्ठापेक्षा, मलपृष्ठात आणि त्याहीपेक्षा सहजरीत्या उघडलेल्या पृष्ठात सकारात्मक ऊर्जा अधिक आढळून आली. याचे कारण हे की, या ग्रंथांच्या मुखपृष्ठातून सगुण, मलपृष्ठातून सगुण-निर्गुण आणि सहजरीत्या उघडलेल्या पृष्ठातून निर्गुण-सगुण स्पंदने प्रक्षेपित झाली. सगुण, सगुण-निर्गुण आणि निर्गुण-सगुण स्तरांवरील स्पंदने अधिकाधिक सूक्ष्म असल्याने अधिकाधिक प्रभावी आहेत. हे लोलक परीक्षणाद्वारे लक्षात येते.’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा (४.१०.२०२५)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. – संपादक