Bangladesh Hindu Students : बांगलादेशात २ हिंदु विद्यार्थ्यांचा संशयास्पदरित्या मृत्यू

आकाश सरकार (डावीकडे वर्तुळात) व अभि (उजवीकडे वर्तुळात)

ढाका (बांगलादेश) – येथील जगन्नाथ विद्यापिठातील हिंदु विद्यार्थी आकाश सरकार याचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत त्याच्या खोलीत आढळून आला. पोलिसांच्या प्राथमिक अन्वेषणात हा प्रकार आत्महत्येचा असल्याचे सांगितले जात असले, तरी देशात सातत्याने चालू असलेल्या हिंदूंवरील अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर मृत्यूचे हे प्रकरण गंभीर मानले जात आहे.

पोलिसांनी सांगितले की, आकाशच्या खोलीचा दरवाजा आतून बंद होता. बराच वेळ दरवाजा ठोठावल्यानंतर दरवाजा तोडण्यात आला, तेव्हा खोलीत आकाशचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.

नौगांवमध्ये हिंदु मुलाचा आढळला मृतदेह

एका महाविद्यालयीन हिंदु विद्यार्थ्याचा आठवडाभरापूर्वी बेपत्ता झाल्यानंतर त्याचा  मृतदेह आढळून आला आहे. नौगांव येथील कालीतला स्मशान घाटाजवळील नदीत त्या विद्यार्थ्याचा मृतदेह तरंगतांना सापडला. जानेवारीपासून हा विद्यार्थी बेपत्ता झाला होता. या विद्यार्थ्याचे नाव अभि होते आणि तो व्यवस्थापन विषयाचे शिक्षण घेत होता. अभि बेपत्ता झाल्यानंतर त्याचे वडील रमेशचंद्र यांनी मुलाचा शोध घेण्यासाठी सर्व प्रयत्न केले. पोलिसांकडे तक्रारही केली; मात्र काहीही निष्पन्न झाले नाही. मुलाचा मृत्यू कसा झाला ?, हे अद्याप समजू शकलेले नाही.