सप्तर्षींनी जीवनाडीपट्टीत सनातनच्या तीन गुरूंविषयी काढलेले गौरवोद्गार !

सनातन संस्थेचे तीन गुरु, म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ ! सनातनच्या साधकांना लाभलेले हे ईश्वरी धन आहे.

श्रीमन्नारायणाचे अवतार परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी साधकांची आर्ततेने आणि कळकळीने प्रार्थना !

आज आम्ही त्या प्रलयकारी आपत्काळाच्या अगदी उंबरठ्याशी उभे आहोत. आम्हाला एकमेव तुझ्या चरणांचाच आधार आहे. तुझे सुंदर हास्यच आमचे दुःख दूर करणारे आहे आणि तुझे बोलच आमचे उत्साहवर्धक आहेत. आम्हा साधकांचे रक्षण कर, हे श्रीजयंता, श्रीजयंता, श्रीजयंता !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या मनमोहक हास्याविषयी साधकांचे हृद्य मनोगत !

साधकांना साधनेसाठी प्रोत्साहित करणारे मधुर स्मितहास्य !
जन्मोजन्मींचा थकवा, ताणतणाव नष्ट करणारे गोड हास्य !

गुरुपदी विराजमान असूनही साधकांची प्रेमाने काळजी घेणारे आणि त्यांची सेवा करण्यात आनंद मानणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

केवळ गुरु म्हणून नव्हे, तर माता, पिता, बंधू, सखा अशा अनेक नात्यांनी परात्पर गुरु डॉक्टर साधकांना आधार देतात. सनातनच्या प्रत्येक साधकाने कोणत्या ना कोणत्या रूपात गुरूंची ही प्रीती अनुभवली आहे. त्यातील काही हृदयस्पर्शी प्रसंगांना येथे उजाळा देत आहोत.

लहान-लहान कृतींतही साधकांचाच विचार करून त्यांची सर्वतोपरी काळजी घेणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

पूर्वी सुखसागर (गोवा) येथे असतांना परात्पर गुरु डॉक्टर खोलीत न जेवता १४ – १५ पायऱ्या चढून भोजनकक्षातच जेवायला यायचे.ते इतरांच्या आधी जेवणही घेत नसत. क्वचित् कधी साधकांच्या जेवणाला विलंब होणार असेल, तर ते म्हणायचे, ‘‘थांबूया १० मिनिटे ! एक दिवस विलंब झाला, तर काय झाले ?’’ त्यांच्या या बोलण्यामुळे साधिकांच्या मनावरील ताण निघून जायचा

सूक्ष्मातून मिळणाऱ्या ज्ञानात किंवा नाडीपट्टीमध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा उल्लेख ‘संत’ असा न करता ‘विष्णूचा अंशावतार’ असा असण्यामागील कारणे !

संत त्यांच्या शिष्यांना त्यांच्या संप्रदायानुसार एकच साधना शिकवतात. सनातनमध्ये संप्रदाय नसून प्रत्येकाला त्याच्या आध्यात्मिक स्थितीप्रमाणे निरनिराळी साधना शिकवतात.

सप्तर्षींनी वर्णिलेला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा महिमा आणि महर्षींच्या कृपेमुळे साधकांना गुरुमाऊलीच्या अवतारत्वाची येत असलेली प्रचीती !

‘सप्तर्षी म्हणतात, ‘साक्षात् भगवान श्रीविष्णूने मनुष्याला ईश्वरप्राप्तीचा मार्ग दाखवण्यासाठीच पृथ्वीवर ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले’ यांच्या रूपात अवतार धारण केला आहे. प.पू. गुरुदेव साक्षात् ईश्वरच आहेत. ते भगवंताचा अवतार आहेत. अनंत कोटी ब्रह्मांडनायक असलेला श्रीमन्नारायण म्हणजे प.पू. गुरुदेवच आहेत.