गुरुपौर्णिमेला १० दिवस शिल्लक
गुरु अध्यात्मविवेचन करतात, तेव्हा महान शक्ती, ऋषिमुनी आणि देवता तेथे येतात. त्यांच्या अस्तित्वाचाही शिष्यांना लाभ होतो.
गुरु अध्यात्मविवेचन करतात, तेव्हा महान शक्ती, ऋषिमुनी आणि देवता तेथे येतात. त्यांच्या अस्तित्वाचाही शिष्यांना लाभ होतो.
गोपींचा श्रीकृष्णाप्रती अनन्यसाधारण भाव होता. असाच गोपीभाव सनातनच्या काही साधिकांमध्येही आहे. गोपीभावाचे दर्शन घडवणारी ही ग्रंथमालिका म्हणजे द्वापरयुगच जणू पुन्हा अवतरल्याची प्रचीती ! ही ग्रंथमालिका वाचा आणि गोपींप्रमाणे श्रीकृष्णभक्त होण्याचा प्रयत्न करा !
आपल्या आवडत्या देवतेला सर्वांच्यात पहावे आणि सर्वांशी आदराने वागावे.
‘मी भगवंताचा दास आहे, म्हणजे ‘माझे’ म्हणून जे काही आहे, ते सर्व भगवंताचे आहे’, अशी वृत्ती बनली पाहिजे. दास होण्यामध्ये लाचारी नाही. दास म्हणजे ज्ञानाचे दास्य. त्यामध्ये तेज आणि आनंद आहे.
कासवी जशी केवळ दृष्टीमात्र पिल्लांचे पोषण करते, तद्वत् गुरु केवळ कृपावलोकनाने शिष्याचा उद्धार करतात.
एक बद्ध जीव दुसर्या बद्ध जीवाचा उद्धार करू शकत नाही. गुरु मुक्त असल्यानेच शिष्यांचा उद्धार करू शकतात !
प.प. टेंब्येस्वामी महाराजांनी अनेक चतुर्मास नर्मदा तिरी केले. अत्यंत कठोर व्रताचरणी आणि सर्व यम-नियम पाळून तपाचरण करणार्या या प.प. टेंब्येस्वामी महाराजांच्या सर्व रचना या मंत्रयुक्त आहेत.
गुरु स्वत:च शिष्याला प्रश्न विचारुन योग्य उत्तरांचे संकेत किंवा सूचना यांच्याद्वारे त्याच्या जीवनाला खऱ्या रस्त्याकडे वळवतात !
चंद्र उगवताच चंद्रकांत मण्याला पाझर फुटतो, त्याप्रमाणे केवळ अंतःकरणातल्या दयाद्रवाने गुरु शिष्याला तारतात.