‘दुसर्याचे दोष शोधण्यासाठी आपण जितकी बुद्धी व्यय (खर्च) करतो, तेवढी आपण स्वतःचे दोष शोधण्यात व्यय केल्यास आपण दुःख-दौर्बल्यापासून मुक्त होऊ’, असे उपनिषदांनी म्हटले आहे. आपले दोष आपल्याला दिसत नाहीत; पण आपल्याकडून दुसर्याचे दोष मात्र अचूकपणे शोधले जातात. आपले दोष जाणणाराच ‘विवेकी’ होय ! आपले दोष निदर्शनास आणण्याचा प्रयत्न केल्यासच ते नाहीसे होण्याची शक्यता असते; अन्यथा उलटपक्षी ते तसेच राहून जातात. हे चोरांना घरात कोंडून ठेवण्यासारखेच आहे.’
– प.प. भगवान श्रीधरस्वामी
(संदर्भ : ‘श्रीधर संदेश’, मार्च १९९४)