अनुपम प्रीतीने सर्वांना ईश्‍वरप्राप्तीच्या समान धाग्यात गुंफणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

मानवी जीवनात अनेक समस्या येतात. राष्ट्र आणि धर्म यांसमोरही सद्यःस्थितीत अनेक समस्या आहेत. असे असूनही एकेका समस्येवर कोणता उपाय योजावा, यासाठी वेळ न घालवता साधना केल्यानेच व्यक्तीचे मूलभूत भले होणार आहे, हे परात्पर गुरु डॉक्टर वारंवार मनावर बिंबवतात.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सहज कृतींतूनही व्यक्त होत असलेली साधकांवरील प्रीती !

‘गुरुविना शिष्य नाही आणि शिष्याविना गुरु नाही’, अशी एक म्हण आहे. ‘शिष्याचे जीवन आनंदी असणे’, यातच गुरूंचा आनंद असतो. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचेही तसेच आहे.

प्रीतीस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मकुंडलीतील ‘प्रीती’ हा आध्यात्मिक गुण दर्शवणारे ग्रहयोग !

ज्योतिषशास्त्रानुसार ‘प्रीती’ या गुणाशी संबंधित ग्रहयोग आणि परात्पर गुरु डॉक्टरांच्या जन्मकुंडलीतील ‘प्रीती’ हा गुण दर्शवणारे ग्रहयोग यांचे विश्‍लेषण पुढे दिले आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा देह आणि त्यांच्या वापरातील वस्तू यांवर गुलाबी छटा येणे

‘प.पू. डॉक्टरांची त्वचा, नखे, केस जसे पिवळे, सोनेरी होत आहेत, तसेच त्यांच्या डोळ्यांच्या आतील भाग हाता-पायांचे तळवे, जीभ आणि ओठही गुलाबी होत आहेत.

साधकांना आध्यात्मिक त्रासांतून बाहेर काढण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी रात्रंदिवस घेतलेले अथक परिश्रम !

सनातनच्या माध्यमातून साधना करणार्‍या काही साधकांना वाईट शक्तींचा तीव्र त्रास आहे. साधकांना होणारा वाईट शक्तींचा त्रास, हे सूक्ष्मातून चालणार्‍या देवासुर युद्धाचे लक्षण असते. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगतांना ‘मी कौरवांना सूक्ष्मातून आधीच मारले आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या वापरातील पांढर्‍या रंगाच्या सदर्‍याचा रंग पालटून तो काही ठिकाणी गुलाबी होणे

३१.१२.२००९ या दिवशी प.पू. डॉक्टरांच्या वापरातील पांढर्‍या रंगाच्या एका बंडीचा रंग हाताच्या बाह्या, पोट आणि छाती या ठिकाणी गुलाबी झाल्याचा दिसला.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी अंघोळीसाठी वापरलेल्या ‘मग’मध्ये पुष्कळ चैतन्य निर्माण होणे आणि ‘त्या मगामधून सूक्ष्म नाद ऐकू येणे’, हे त्यांचे कार्य निर्गुण स्तरावर व्यापक होत असल्याचे निदर्शक !

‘उच्च कोटीच्या संतांनी हाताळलेल्या दैनंदिन उपयोगाच्या निर्जीव वस्तूही त्या संतांमधील सत्त्वगुणाने भारित होऊन पावन होतात. संतांनी हाताळलेल्या वस्तूंचा अभ्यास केल्यास अध्यात्मातील अनेक नवीन गोष्टी उलगडतील आणि मिळालेल्या ज्ञानाचा मानवाच्या कल्याणासाठी उपयोग होईल.

‘आज ना उद्या देह सोडायचाच आहे’, या विचाराने वाईट शक्तींच्या या त्रासांतूनही शिकणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉ. आठवले एकदा मार्गदर्शनात मला म्हणाले, ‘‘त्रासाचे प्रमाण वाढतच चालले आहे; पण या त्रासांतूनही आपण काहीतरी शिकूया. ते मानवजातीला उपयोगी पडेल. मानवजात शिकली, तर चांगले आहे. आपल्याला काय आज ना उद्या देह सोडायचाच आहे.’’

मातृवात्सल्याने साधकांची काळजी घेणारे आणि प्रत्येक क्षणी साधकांचाच विचार करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

‘भक्त देवाची सेवा करत नाहीत, तर देवच भक्तांची सेवा कशी करतो’, हे परात्पर गुरु डॉक्टरांच्या सहवासात ठायी ठायी दिसून येते.

स्वसंघटनेच्या कक्षा भेदून हिंदुत्वनिष्ठांना साहाय्य करणारे अन् हिंदूसंघटनासाठी प्रयत्न करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉक्टरांनीही आचार-विचारांतही साधक आणि हिंदुत्वनिष्ठ, स्वतःची आणि इतरांची संघटना असा भेद कधीच केला नाही. त्यामुळे हिंदुत्वनिष्ठांनाही ते साधकांप्रमाणे मार्गदर्शन करू शकले आणि आता बरेच हिंदुत्वनिष्ठ त्या मार्गाचे आचरण करून हिंदुत्वाच्या कार्यात आणि ईश्‍वरप्राप्तीच्या मार्गात अग्रेसर झाले आहेत. याची काही उदाहरणे या लेखात दिली आहेत