१. प्रसंग आठवला की, पुनःपुन्हा भावजागृती होणे
‘२२.५.२०२२ या दिवशी रथोत्सवात रथावर आरूढ झालेल्या प.पू. गुरुदेवांना (परात्पर गुरु डॉ. आठवले यांना) पाहून माझी पुष्कळ भावजागृती झाली. पूर्वी भावजागृतीचा कुठलाही प्रसंग नंतर आठवला, तरी भावजागृती होत नसे; परंतु या प्रसंगात जेव्हा जेव्हा तो प्रसंग आठवतो, तेव्हा तेव्हा भावजागृती होते.
२. रथात तीन गुरूंना पाहिल्यावर ‘हा सोहळा पृथ्वीवर होत नसून कोणत्यातरी उच्च लोकांत होत आहे’, असे वाटणे
रथोत्सवात गुरुमाऊली, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना पाहून कृष्णार्जुनाच्या रथाची आठवण झाली आणि ‘युद्ध अगदी जवळ आले आहे’, असे वाटले. ‘हा सोहळा पृथ्वीवर होत नसून कोणत्यातरी उच्च लोकांत होत आहे’, असे वाटले.
‘गुरुदेवा, तुम्हाला अपेक्षित अशी साधना करून आम्हा सर्व साधकांना या आपत्काळात तरून जाता येऊ दे’, हीच तुमच्या चरणी प्रार्थना.’
– श्रीमती गीता प्रभु, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.५.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |