रायपूर (छत्तीसगड) – छत्तीसगडच्या मुख्यमंत्रीपदी भाजपकडून विष्णुदेव साय यांची एकमताने निवड करण्यात आली. ३ डिसेंबर या दिवशी राज्याच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराजय होऊन भाजपच्या हातात सत्ता आल्यानंतर गेले ७ दिवस मुख्यमंत्रपदी कोण असणार? हे निश्चित झाले नव्हते.
५९ वर्षीय आदिवासी नेते विष्णुदेव साय यांनी कुनकुरी (अनुसूचित जमातीसाठी राखीव) विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला. त्यांनी छत्तीसगडचे प्रदेशाध्यक्षपद भूषवलेले आहे. त्यानंतर वर्ष २०१४ ते २०१९ या काळात ते केंद्रशासनात मंत्री होते.