मंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे विधानसभेत लक्षवेधी सूचनांचा ५५ मिनिटांचा वेळ वाया !

सभागृहाच्या सकाळच्या सत्रात एकूण १३ लक्षवेधी सूचना चर्चेसाठी घेण्यात आल्या होत्या; परंतु मंत्री उपलब्ध नसल्यामुळे केवळ ५ लक्षवेधी सूचनांवर चर्चा झाली. 

मुक्ताईनगर (जळगाव) येथील गौण खनिज उत्खनानात ४०० कोटी रुपयांचा घोटाळ्याचा आरोप

एकनाथ खडसे यांनी भाजपच्या नेत्यांचे घोटाळे बाहेर काढण्याची सार्वजनिकरित्या वाच्यता केली होती मात्र मुरुम उत्खननाच्या प्रकरणात एकनाथ खडसे हेच अडचणीत येण्याची शक्यता आहे.

अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी १५ जानेवारीपर्यंत राज्यात नवीन धोरण घोषित करणार ! – राधाकृष्ण विखे पाटील, महसूलमंत्री

राज्यात नदी, वाळू, खाणी यांतील वाळूचे अवैध उत्खनन चालू आहे. याला आळा घालण्यासाठी नवीन धोरणामध्ये सामान्य नागरिकांनाही वाळू उत्खननाचा परमिट परवाना सरकारकडून मिळेल.

विधान परिषदेत जनतेचे प्रश्न सोडवण्याऐवजी विविध प्रश्नांवरून मंत्री आणि आमदार यांच्यात अनावश्यक वाद !

गोंधळातच महत्त्वाच्या विधेयकांसह पुरवणी मागण्या संमत झाल्या. विधानसभा आणि विधान परिषद येथे मराठवाडा अन् विदर्भ यांवरील चर्चा अपूर्ण राहिली.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील स्पर्श रुग्णालयात अपव्यवहार !

स्पर्श रुग्णालय आणि प्राथमिकदृष्ट्या दोषी असलेले संबंधित अधिकारी यांची चौकशी चालू आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांनी विधानसभेत विचारलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देतांना दिली.

राज्यातील गायरान भूमीवरील अतिक्रमण प्रकरणी निष्कासनाच्या कारवाईस पुढील आदेशापर्यंत उच्च न्यायालयाकडून स्थगिती ! – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

शासनाच्या यापूर्वीच्या इतर कोणत्याही धोरणानुसार / तरतुदींनुसार संरक्षित होणारी अतिक्रमणे वगळून उर्वरित अतिक्रमणे निष्कासित करावी, अशी – शासनाची भूमिका

वीर सावरकरांचे आंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्यासाठी आमदार सरोज अहिरे यांची १०० कोटींची मागणी !

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सरोज अहिरे यांनी स्वांतत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे जन्मगाव भगूर येथे त्यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करण्याची मागणी शिंदे-फडणवीस सरकारकडे केली आहे.

मागासवर्गीय वसतीगृहातील मुलामुलींना ७ कोटी ५९ लाखांच्या निर्वाह भत्त्याचे वाटप ! – मंत्री संजय राठोड

सदस्या डॉ. मनीषा कायंदे यांनी शासकीय वसतीगृहातील समस्यांविषयी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देतांना ते बोलत होते.

आमदार मुक्ता टिळक यांना विधानसभेत श्रद्धांजली !

मुक्ता टिळक यांच्यासारख्या निष्ठावान, कर्तृत्ववान लोकप्रतिनिधींच्या निधनामुळे केवळ भाजपचीच नव्हे, तर समाजाचीही हानी झाली आहे.

प्रवाशांनी तक्रारी केल्यास वाढीव शुल्क आकारणार्‍या ट्रॅव्हल्सचालकांवर कारवाई करू ! – शंभूराज देसाई, प्रभारी उपप्रादेशिक परिवहन मंत्री

प्रवाशांकडून संबंधित ट्रॅव्हल्स चालकांविरोधाच्या तक्रारी केल्या जात नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करता येत नाही.