‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ निर्विघ्नपणे पार पडावे, यासाठी संतांकडून देवतांच्या चरणी प्रार्थना !

फोंडा (गोवा) येथे १२ जून या दिवशी ‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’स आरंभ होत आहे. हे अधिवेशन निर्विघ्नपणे पार पडावे, यासाठी येथील श्री शांतादुर्गादेवी अन् श्री देव रामनाथ यांच्या चरणी श्रीफळ अर्पण करून प्रार्थना करण्यात आली.

सर्व हिंदु संघटनांना एकत्र आणण्यासाठी ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ हे व्यासपीठ ! – श्री. गंगाधर कुलकर्णी, श्रीराम सेना

हिंदु जनजागृती समितीने सर्व हिंदु संघटनांना हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी एकत्र आणण्यासाठी एक व्यासपीठ सिद्ध केले आहे, असे प्रतिपादन श्रीराम सेनेचे राज्य सचिव श्री.गंगाधर कुलकर्णी यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले.

‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’साठी बेळगाव येथे पत्रकार परिषद पार पडली !

‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’ची माहिती देण्यासाठी बेळगाव येथील कन्नड साहित्य भवन येथे ८ जून या दिवशी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

भारतात हिंदु राष्ट्र स्थापित झाल्यावरच विश्वात शांतता आणि बंधुभाव निर्माण होईल ! – ईश्वरप्रसाद खंडेलवाल, अध्यक्ष, लष्कर-ए-हिंद

एकदा का भारतात धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना झाली की, विश्वभरातील शत्रुत्वाची भावना नष्ट होऊन शांतता प्रस्थापित होणार आहे.

हिंदु जनजागृती समितीकडून गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाचे निमंत्रण

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना १२ जूनपासून चालू होणाऱ्या दशम् अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाला उपस्थित रहाण्याचे निमंत्रण दिले.

हिंदु जनजागृती समितीच्या पाठपुराव्यानंतर पारोळा गडाच्या संवर्धनासाठी जिल्हाधिकार्‍यांनी घेतली बैठक !

संवर्धन करण्यासह गडाचे पावित्र्य भंग करणार्‍यांवर गुन्हे नोंदवण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे प्रशासनाला निर्देश !

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांकडे दुर्लक्ष केल्यानेच शत्रू देश कुरापती काढत आहेत ! – नरेंद्र सुर्वे, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

‘राष्ट्राचा उद्धार’, हेच ध्येय ठेवून आपण समर्पित झाले पाहिजे. राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रनिष्ठा यांचा त्याग करणे म्हणजे राष्ट्रद्रोह आहे.

गोवा येथे होणाऱ्या दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाची माहिती देण्यासाठी पुणे, मुंबई आणि कोल्हापूर येथे पत्रकार परिषदा !

हिंदु राष्ट्राची आवश्यकता का आहे ? आणि ते संवैधानिक मार्गाने कसे निर्माण करायचे ? याविषयी या अधिवेशनात चर्चा करण्यात येणार आहे.

‘जमियत उलेमा-ए-हिंद’च्या वक्तव्यांकडे गांभीर्याने पाहून सरकारने तिच्यावर कठोर कारवाई करावी ! – आनंद जाखोटिया, हिंदु जनजागृती समिती

‘जमियत उलेमा-ए-हिंद’ने पाकिस्तानची निर्मिती झाल्यानंतर तिकडे न जाता भारतात राहून आज हिंदूंनाच भारताबाहेर जाण्याची चेतावणी देत आहे !

श्री तुळजाभवानी मंदिरातील भ्रष्टाचाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी ! – अधिवक्ता दत्ता सणस, हिंदु महासभा

हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलना’द्वारे मागणी !