१४ ऑक्टोबर : नवरात्रोत्सव (आठवा दिवस)

जिच्या विना संपूर्ण जग मूक आणि विवेकशून्य होऊन जाईल, त्या वाणीच्या अधिष्ठात्री असणार्‍या देवी सरस्वतीला नमस्कार असो.

१३ ऑक्टोबर : नवरात्रोत्सव (सातवा दिवस)

शरद ऋतूतील कमलाप्रमाणे मुख असणारी; सर्व गोष्टी मिळवून देणारी सरस्वतीदेवी, नेहमी आमच्या मुखकमलाच्या जवळ उत्तम (ज्ञानाचा) वस्तूंचा संग्रह करो.

१२ ऑक्टोबर : नवरात्रोत्सव (सहावा दिवस)

हे देवी नारायणी, तुला शरण आलेल्या दीन, दुःखी भक्तांचे तू रक्षण करतेस, तसेच त्यांची सर्व दुःखे नाहीशी करतेस, तुला आमचा नमस्कार असो.