हिंदुत्व सहिष्णू असल्यामुळे ओवैसींवर भारतात अद्यापपर्यंत आक्रमण झाले नाही ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते
हिंदुत्व हे कधीच कट्टर असू शकत नाही. हिंदुत्व हे सहिष्णू आहे. हिंदुत्वाने कधीच कुणावर आक्रमण केले नाही. त्यामुळेच भारतात सर्व धर्माचे लोक सुख आणि समाधानाने नांदत आहेत.