परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘कुठे स्वेच्छेने वागण्यास उत्तेजन देऊन मानवाला अधोगतीला नेणारे बुद्धीप्रामाण्यवादी, तर कुठे मानवाला स्वेच्छेचा त्याग करायला शिकवून ईश्वरप्राप्ती करून देणारे संत !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘कुठे स्वेच्छेने वागण्यास उत्तेजन देऊन मानवाला अधोगतीला नेणारे बुद्धीप्रामाण्यवादी, तर कुठे मानवाला स्वेच्छेचा त्याग करायला शिकवून ईश्वरप्राप्ती करून देणारे संत !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘निवडणुकीसंदर्भात प्रतिदिन येणार्या बातम्या वाचून वाटते, ‘आता निवडणुका हा पोरखेळ झाला आहे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
परात्पर गुरु डॉक्टरांचे साधनेविषयक मार्गदर्शन !
‘तत्त्वशून्य राजकीय पक्ष जनतेला खूश करून निवडून येण्यासाठी काहीही करतात, तर साधक केवळ ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी कठोर प्रयत्न करायला सिद्ध असतात !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘बरेच जण लाच घेऊन काम करतात, तसे बर्याच मतदारांचे झाले आहे. ते पैसे देणार्याला मत देतात. मतदारांना लाच देणारे निवडून येऊन राज्य करतात. त्यामुळे तथाकथित लोकशाहीत देशाची दशा केविलवाणी झाली आहे.
परात्पर गुरु डॉक्टरांचे साधनेविषयक मार्गदर्शन !
‘राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना स्वार्थासाठी त्यांच्या पक्षाचे सरकार हवे असते, तर साधकांना ‘सर्वांचे चांगले व्हावे’, यासाठी ईश्वरी (धर्म) राज्य हवे असते.’
‘राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते कोणीही पैसे किंवा पद दिले, तर दुसर्या पक्षात जातात. याउलट भक्त देवाचा पक्ष सोडून, देवाच्या चरणांशी असलेली जागा सोडून दुसरीकडे कुठेही जात नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘विचारस्वातंत्र्य म्हणजे ‘दुसर्याला दुखवायचे’ किंवा ‘धर्माच्या विरुद्ध बोलायचे स्वातंत्र्य नाही’, हेही स्वातंत्र्यापासून गेली ७४ वर्षे भारतावर राज्य करणार्या एकाही राजकीय पक्षाच्या लक्षात आले नाही !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘राष्ट्रप्रेम आणि धर्मप्रेम नसलेल्या उमेदवाराकडून पैसे घेऊन त्याला मते देणार्या जनतेचे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येण्यापेक्षा ‘ईश्वराने भक्त म्हणून निवडणे अनंत पटींनी महत्त्वाचे आहे’, हे लक्षात घ्या ! ’