कुठे शास्त्रज्ञ, तर कुठे ऋषि-मुनी !

‘कुठे परग्रहावर जाणारे यान शोधले की, विज्ञानाचे कौतुक करणारे बुद्धीप्रामाण्यवादी, तर कुठे सूक्ष्मदेहाने विश्‍वातच नाही, तर सप्तलोक आणि सप्तपाताळ यांतही क्षणार्धात सूक्ष्मातून जाऊ शकणारे ऋषि-मुनी !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले        

देवाच्या कृपेचे महत्त्व !

‘देवाची कृपा अनुभवल्यावर समाजातून कुणी कौतुक केले, तरी त्याची किंमत शून्य वाटते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

सुखासाठी कर्तव्याकडे दुर्लक्ष करणारी सध्याची पिढी !

​‘सांसारिक जीवनात सर्वांत अधिक सुख नवरा-बायको हेच एकमेकांना देतात. त्यामुळे मोठेपेणी ते स्वतःच्या आई-वडिलांना सांभाळण्याचे कर्तव्य सोडून स्वतंत्र रहातात आणि त्यांच्याकडे जातही नाहीत !’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘देव सर्वत्र आहे, प्रत्येकात आहे’, ही हिंदु धर्माची शिकवण असल्यामुळे हिंदूंना इतर धर्मियांचा द्वेष करायला शिकवले जात नाही. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

चिरंतन आनंदप्राप्तीसाठी साधनेला पर्याय नाही !

‘देवावर आणि साधनेवर विश्‍वास नसला, तरी चिरंतन आनंद प्रत्येकालाच हवा असतो. तो केवळ साधनेने मिळतो. एकदा हे लक्षात आले की, साधनेला पर्याय नसल्याने मानव साधनेकडे वळतो.’

‘सर्वधर्मसमभाव’ म्हणणार्‍यांचा फोलपणा !

 ‘ज्यांनी सर्व धर्मांचा अभ्यास काय; पण वाचनही केले नाही, तेच ‘सर्वधर्मसमभाव’ म्हणतात !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

संतांनी समष्टी प्रसारकार्य करण्यामागील कारण !

‘आधीच्या युगांत प्रजा सात्त्विक असल्याने ऋषींना समष्टी प्रसारकार्य करावे लागायचे नाही. आता कलियुगात बहुतेक साधना करत नसल्याने संतांना समष्टी प्रसारकार्य करावे लागते !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

ईश्‍वरप्राप्तीसाठी आयुष्य द्यायला नको का ?

‘नोकरीत थोडासा पगार मिळावा; म्हणून ७ – ८ घंटे नोकरी करावी लागते, तर सर्वज्ञ, सर्वव्यापी आणि सर्व सामर्थ्यवान ईश्‍वराच्या प्राप्तीसाठी आयुष्य द्यायला नको का ?’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले               

देश रसातळाला जाण्यामागील कारण !

‘प्रथम मोगल, नंतर इंग्रज आणि आता राष्ट्रप्रेम नसलेले विविध राजकीय पक्ष यांच्यामुळे देश रसातळाला गेला आहे.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले    

‘साधना’ हीच खरी लस !

‘एखादा रोग होऊ नये; म्हणून लसीकरण (व्हॅक्सिनेशन) करतो, तसेच तिसर्‍या महायुद्धाच्या काळात वाचण्यासाठी साधना हीच लस आहे. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले